तुम्ही मीटिंगमध्ये वेळ कसा घालवता हे पाहणे

तुम्ही ऑफिस किंवा शाळेच्या खात्यासाठी Google Calendar वापरत असल्यास, तुम्ही मीटिंगमध्ये तुमचा वेळ कसा घालवता हे जाणून घेण्यासाठी "वेळेसंबंधित इनसाइट" वापरू शकता. तुम्हाला वेळेसंबंधित इनसाइट हा पर्याय दिसत नसल्यास, तुमच्या ॲडमिनने तुमच्या संस्थेसाठी तो बंद केलेला असू शकतो. माझा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कोण आहे?

वेळेसंबंधित इनसाइट पाहण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे

  • तुम्ही फक्त कॉंप्युटरवर वेळेसंबंधित इनसाइट पाहू शकता.
  • तुम्ही इतर लोकांची कॅलेंडर व्यवस्थापित करत असल्यास आणि तुमच्याकडे त्या कॅलेंडरसाठी "शेअर करण्याचा अ‍ॅक्सेस व्यवस्थापित करणे" याची परवानगी असल्यास, तुम्ही त्यांचे वेळेसंबंधित इनसाइट पाहू शकता.

वेळेसंबंधित इनसाइट पहा

महत्त्वाचे: वेळेसंबंधित इनसाइट ची माहिती तुमच्या प्राथमिक कॅलेंडरवर उपलब्ध आहे. पुढील लोक ती अ‍ॅक्सेस करू शकतात:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, आणखी इनसाइट वर क्लिक करा.
  • पर्यायी: तुमच्या वेळेच्या ब्रेकडाउनशी संबंधित अधिक माहितीसाठी, मदत वर क्लिक करा.

टीप: वेळेसंबंधित इनसाइट हे तारीख श्रेणीवर आधारित आहे. वेगळ्या तारीख श्रेणीसाठी वेळेसंबंधित इनसाइट पाहण्याकरिता, तुमच्या कॅलेंडरचा व्ह्यू बदलणे हे करा.

विशिष्ट व्यक्तीसोबत घालवलेला वेळ पहा

तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत मीटिंगमध्ये किती वेळ घालवता हे पाहण्यासाठी, तो संपर्क तुमच्या वेळेसंबंधित इनसाइट डॅशबोर्डवर पिन करा:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, आणखी इनसाइट वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, “तुम्ही भेटता ते लोक” यावर स्क्रोल करा. पिन केलेल्या लोकांना व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. नाव एंटर करा.
  5. पूर्ण झाले वर क्लिक करा.

टीप: तुम्ही कमाल १० संपर्क पिन करू शकता.

वेळेसंबंधित इनसाइट साठी कोणत्या मीटिंग मोजल्या जातात ते पहा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, आणखी इनसाइट वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, तुम्हाला पुनरावलोकन करायचा असलेला आलेख निवडा:
    • वेळेचे ब्रेकडाउन.
    • मीटिंगमध्ये घालवलेला वेळ.
    • तुम्ही भेटता ते लोक.
  4. आलेखामध्ये, हायलाइट केलेल्या विभागांपैकी एखाद्या विभागावर फिरवा.
    • संबंधित मीटिंग तुमच्या कॅलेंडरवर एकाच रंगामध्ये हायलाइट केली जाते आणि तुमच्या वेळेसंबंधित इनसाइट साठी मोजली जाते.

वेळेसंबंधित इनसाइट याबद्दल

वेळेसंबंधित इनसाइट यासाठी मोजले जाणारे इव्‍हेंट

वेळेसंबंधित इनसाइट यासाठी मोजले जाण्यासाठी, इव्हेंट हा पुढील गोष्टींची पूर्तता करणारी Google Calendar मीटिंग असणे आवश्यक आहे:

  • तुम्ही उपस्थित राहण्यासाठी "होय" असे उत्तर दिले.
  • किमान इतर एक अतिथी आहे.
  • तुमच्या कॅलेंडरवर "व्यस्त" म्हणून खूण केली आहे.
  • आठ तासांपेक्षा कमी वेळेचा आहे.

वेळेसंबंधित इनसाइट यासाठी मोजले न जाणारे इव्‍हेंट

पुढील कारणांमुळे इव्‍हेंट वेळेसंबंधित इनसाइट यासाठी मोजले जात नाहीत:

  • इव्‍हेंटसाठी फक्त तुम्हाला आमंत्रित केले आहे.
  • तुम्ही इव्‍हेंटसाठी "होय" असे उत्तर दिले नाही.

वेळेसंबंधित इनसाइट कसे मोजले जाते

वेळेच्या ब्रेकडाउनबद्दल

तुमच्या वेळेच्या ब्रेकडाउनमध्ये या प्रकारच्या वेळा दिसतात.

  • राखीव वेळ: परस्परविरोधी मीटिंग नसलेली नियोजित राखीव वेळ.
    • राखीव वेळ सेट करण्यासाठी, राखीव वेळ शेड्युल करा वर क्लिक करा.
  • १:१: इतर एका अतिथीसह मीटिंग.
  • ३+ अतिथी: किमान इतर दोन अतिथींसह मीटिंग.
  • प्रतिसाद देण्याची आवश्यकता: तुम्ही अद्याप न स्वीकारलेल्या किंवा नकार दिलेल्या मीटिंग. “कदाचित” हा प्रतिसाद असलेल्या मीटिंग येथे समाविष्ट केलेल्या नाहीत.
  • शिल्लक कालावधी: तुमच्या कामाच्या तासांमधील मीटिंग नसलेला किंवा ऑफिसमध्ये नाही असा कालावधी. तुम्ही तुमचे कामाचे तास सेट करणे हे केले असेल तरच हे दिसते. तुमच्या संस्थेसाठी कामाचे तास उपलब्ध नसू शकतात.

मीटिंगमध्ये घालवलेला वेळ

  • मीटिंगमधील वेळ सरासरी म्हणून मोजला जातो. 
    • तुमचे कॅलेंडर दिवस, आठवडा, शेड्युल किंवा पाच दिवसाच्या व्ह्यूमध्ये असते तेव्हा: तुम्ही मागील तीन आठवड्यांमधील मीटिंगमध्ये घालवलेल्या वेळेवरून सरासरी मोजली जाते.
    • तुमचे कॅलेंडर मासिक व्ह्यूमध्ये असते तेव्हा: तुम्ही मागील तीन महिन्यांमधील मीटिंगमध्ये घालवलेल्या वेळेवरून सरासरी मोजली जाते.
    • तुम्ही कार्यालयाबाहेर असल्यास, तुम्ही मीटिंगमध्ये घालवलेल्या वेळेची सरासरी कमी असू शकते.
  • तुमच्या दोन मीटिंग एकाच वेळेला शेड्युल केल्या असल्यास, गट मीटिंगच्या वेळेऐवजी 1:1 मीटिंगची वेळ मोजली जाते. एकाहून अधिक, ओव्हरलॅप होणाऱ्या 1:1 यांसाठी, एकूण वेळ मोजली जाते.
  • मीटिंगमधील तुमची वेळ सर्व कालावधीसाठी फक्त एकदाच मोजली जाते. 
    • उदाहरणार्थ, तुम्ही एकाच वेळी शेड्युल केलेल्या एक तासाच्या दोन मीटिंगसाठी "होय" असा प्रतिसाद दिल्यास, तुम्ही मीटिंगमध्ये घालवलेल्या वेळेसाठी फक्त एक तास मोजला जातो.

तुम्ही भेटता ते लोक

  • ठरावीक कालावधीमध्ये तुम्ही ज्या पाच लोकांसोबत सर्वात जास्त वेळ घालवता ते लोक दाखवले जातात. 
  • तुम्ही मुख्य संपर्क पिन करणे हे करू शकता आणि तुम्ही मीटिंगमध्ये एकत्र किती वेळ घालवता हे पाहू शकता. तुम्ही कमाल १० संपर्क पिन करू शकता.
  • तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत १५ किंवा त्यापेक्षा कमी इतर लोक असलेल्या मीटिंगमध्ये एकत्र असता फक्त तेव्हा, त्या व्यक्तीसोबत घालवलेला वेळ मोजला जातो.
  • दुसऱ्या व्यक्तीने मीटिंगला नकार दिल्यास मीटिंगचा वेळ मोजला जात नाही.
  • तुम्ही मीटिंगसाठी "होय" असे उत्तर न दिल्यास मीटिंगचा वेळ मोजला जात नाही.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5257318850520557874
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false