उपलब्ध अपॉइंटमेंट हटवणे आणि बुक केलेल्या अपॉइंटमेंट रद्द करणे

तुम्हाला तुमच्या उपलब्धतेमध्ये बदल करायचे असल्यास, तुमच्या कॅलेंडरवर तुम्ही वेळेचे स्लॉट हटवू शकता आणि अपॉइंटमेंट रद्द करू शकता.

इतरांना तुमच्या कॅलेंडरवर कोणत्याही शुल्काशिवाय अमर्यादित अपॉइंटमेंट शेड्यूल करता येण्यासाठी तुम्ही एकच बुकिंग पेज तयार करू शकता. तुमच्याकडे पात्र Google Workspace किंवा Google One सदस्यत्व असल्यास, अपॉइंटमेंट शेड्यूलसोबत प्रीमियम वैशिष्ट्य मिळतात. अपॉइंटमेंट शेड्यूलसाठी असलेल्या प्रीमियम वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या.

वेळेचे उपलब्ध स्लॉट हटवा

महत्त्वाचे: तुम्ही अपॉइंटमेंट शेड्युल हटवता तेव्हा:

  • तुमच्या कॅलेंडरमधून अपॉइंटमेंट शेड्युल काढून टाकले जाते.
  • बुक केलेल्या अपॉइंटमेंट या तुमच्या कॅलेंडरमध्ये आणि अपॉइंटमेंट बुक करणाऱ्या व्यक्तीच्या कॅलेंडरमध्ये राहतील.
  • तुम्ही शेअर केलेल्या बुकिंग पेजच्या लिंक आता काम करत नाहीत.
  1. कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. तुम्हाला हटवायच्या असलेल्या अपॉइंटमेंट शेड्युलवर क्लिक करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, अपॉइंटमेंट विंडोमध्ये, अपॉइंटमेंट शेड्युल हटवा  वर क्लिक करा.
टीप: तुमच्या अपॉइंटमेंट शेड्युलमध्ये वेळ ब्लॉक काढून टाकणे यांसारखे बदल करण्यासाठी, तुम्हाला अपॉइंटमेंट संपादित करावी लागेल.

बुक केलेली अपॉइंटमेंट रद्द करा

महत्त्वाचे: तुम्ही बुक केलेली अपॉइंटमेंट रद्द करता तेव्हा:

  • तुमच्या कॅलेंडरमधून अपॉइंटमेंट काढून टाकली जाते.
  • अपॉइंटमेंट बुक करणाऱ्या व्यक्तीला ती रद्द केल्याचा ईमेल पाठवला जातो. 
  • रद्द केलेल्या अपॉइंटमेंटची वेळ तुमच्या बुकिंग पेजवर उपलब्ध असल्याचे दिसेल.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar वर बुक केलेली अपॉइंटमेंट उघडा.
    • तुम्ही तृतीय पक्ष कॅलेंडर वापरत असल्यास, तुमच्या कंफर्मेशन ईमेलवरून तुमची अपॉइंटमेंट रद्द करू शकता. किंवा अपॉइंटमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कॅलेंडर आमंत्रणाला कृपया उत्तर द्या यावर “नाही” असे कळवू शकता.
  2. अपॉइंटमेंट रद्द करा वर क्लिक करा.
  3. उघडणाऱ्या बुकिंग पेजवर, तुमची अपॉइंटमेंट रद्द करा वर क्लिक करा.
टीप: तुम्ही किंवा तुमच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करणाऱ्या व्यक्तीने अपॉइंटमेंटचा कंफर्मेशन ईमेल एखाद्या व्यक्तीला फॉरवर्ड केल्यास, मिळवणारा बुक केलेली अपॉइंटमेंट रद्द करू शकतो.

अपॉइंटमेंट रद्द केल्याच्या परताव्याबद्दल जाणून घ्या

तुम्ही पात्र Google Workspace प्लॅनचे सदस्यत्व घेतल्यास, ग्राहकाने तुमच्या कॅलेंडरवर अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर तुम्ही आगाऊ पेमेंटची विनंती करू शकता. अपॉइंटमेंटसाठी पेमेंटबद्दल जाणून घ्या.

सर्व पेमेंट आणि परतावे Stripe द्वारे हाताळले जातात. Google Calendar पुढील गोष्टी करत नाही:

  • कोणत्याही पेमेंटशी संबंधित माहितीवर प्रक्रिया करणे किंवा ती स्टोअर करणे (जसे की क्रेडिट कार्डचा नंबर)
  • कोणतीही प्लॅटफॉर्म शुल्के घेणे
  • परतावे किंवा पेमेंटसंबंधित समस्यांसाठी मदत करणे

आयोजक किंवा ग्राहक म्हणून तुम्ही अपॉइंटमेंट रद्द केल्यास, परताव्यावर आपोआप प्रक्रिया केली जात नाही.

  • तुम्ही आयोजक असल्यास: ग्राहकाला परतावा देण्यासाठी, तुमच्या Stripe डॅशबोर्ड वर जा.
  • तुम्ही ग्राहक असल्यास: अपॉइंटमेंट रद्द केल्याच्या परताव्याची विनंती करण्यासाठी, आधी आयोजकाच्या रद्द करण्यासंबंधित धोरणाचे पुनरावलोकन करा, त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून परताव्याची विनंती करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2950347600459782284
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false