इतर लोक तुमच्या Google Meet कॉंफरन्सिंग अपॉइंटमेंटमध्ये कसे सामील होतात

तुम्ही अपॉइंटमेंट शेड्युलमध्ये Google Meet चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जोडता, तेव्हा पुढील गोष्टींचा समावेश असणारा अपॉइंटमेंट ईमेल आपोआप पाठवला जातो:

  • मीटिंगची लिंक
  • मीटिंग पिनसह फोन नंबर

टिपा:

  • तुम्ही किंवा तुमच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करणाऱ्या व्यक्तीने अपॉइंटमेंटचा कंफर्मेशन ईमेल एखाद्या व्यक्तीला फॉरवर्ड केल्यास, मिळवणारा बुक केलेली अपॉइंटमेंट रद्द करू शकतो.
  • तुम्हाला तृतीय पक्ष व्हिडिओ कॉलिंगची सेवा वापरायची असल्यास, तुम्ही अपॉइंटमेंट तयार करता, तेव्हा "स्थान आणि कॉंफरन्सिंग" साठी, कोणतेही नाही/नंतर नमूद केले जाईल निवडा. अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर, मीटिंगची माहिती जोडण्यासाठी बुक केलेला इव्‍हेंट संपादित करा. Google Workspace Marketplace अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करणे याची शिफारस करतो.

इतरांना तुमच्या कॅलेंडरवर कोणत्याही शुल्काशिवाय अमर्यादित अपॉइंटमेंट शेड्यूल करता येण्यासाठी तुम्ही एकच बुकिंग पेज तयार करू शकता. तुमच्याकडे पात्र Google Workspace किंवा Google One सदस्यत्व असल्यास, अपॉइंटमेंट शेड्यूलसोबत प्रीमियम वैशिष्‍ट्य मिळतात. अपॉइंटमेंट शेड्यूलसाठी असलेल्या प्रीमियम वैशिष्‍ट्यांबद्दल जाणून घ्या.

Google Calendar इव्‍हेंटमधून व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील व्हा

महत्त्वाचे: तुम्हाला कदाचित व्हिडिओ कॉलसाठी तुमच्या ब्राउझरला तुमचा मायक्रोफोन आणि कॅमेरा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.

  1. Google Calendar मध्ये, तुम्हाला सामील व्हायच्या असलेल्या इव्‍हेंटवर क्लिक करा.
  2. Google Meet वापरून सामील व्हा वर क्लिक करा.
  3. उघडणार्‍या विंडोमध्ये आता सामील व्हा वर क्लिक करा. 

Google Meet वरून व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील व्हा

महत्त्वाचे: तुम्हाला कदाचित व्हिडिओ कॉलसाठी तुमच्या ब्राउझरला तुमचा मायक्रोफोन आणि कॅमेरा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.

  1. वेब ब्राउझरमध्ये https://meet.google.com/ एंटर करा.
  2. तुमच्या शेड्युल केलेल्या इव्हेंटच्या सूचीमधून मीटिंग निवडा. Google Meet वर फक्त Google Calendar मधून शेड्युल केलेल्या मीटिंग दिसतात.
  3. आता सामील व्हा वर क्लिक करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6937251185405175947
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false