तुमच्या ब्लॉगची सेटिंग्ज व्यवस्थापित करा

तुम्ही वेबवर Blogger वापरता तेव्हा, तुमच्या ब्लॉगची सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता. खालील आशय वेगवेगळ्या प्रकारची ब्लॉग सेटिंग्ज आणि तुम्हाला तुमचा ब्लॉग कस्टमाइझ कसा करता येईल याबाबत माहिती देतो.

मूलभूत

शीर्षक

तुमच्या ब्लॉगचे शीर्षक.

वर्णन

तुमच्या ब्लॉगचे वर्णन.

ब्लॉगची भाषा

तुमच्या ब्लॉगची भाषा.

प्रौढांसाठी असलेला आशय

तुमच्या ब्लॉगच्या आशयामध्ये नग्नता किंवा लैंगिक क्रिया समाविष्ट असलेल्या इमेज आणि व्हिडिओंसह, प्रौढांसाठी असलेला आशय आहे याकडे निर्देश करण्यासाठी हे सेटिंग आहे. निवडल्यास, तुमच्या ब्लॉगच्या दर्शकांना चेतावणी मेसेज दिसेल आणि त्यांना तुमच्या ब्लॉगवर जायचे आहे हे निश्चित करण्यास सांगितले जाईल.

Google Analytics प्रॉपर्टी आयडी

अतिथी तुमच्या साइटशी कसे परस्परसंवाद साधतात ते पाहण्यासाठी, तुमच्या ब्लॉगमध्ये Google Analytics चा अंतर्भाव करा. तुमचा ब्लॉग ट्रॅक करणे सुरू करण्यासाठी, तुमचा Google Analytics वेब प्रॉपर्टी आयडी (उदाहरणार्थ, <code;ua-123456-1< code="">) जोडा. हे सेटिंग विशेषकरून सक्रिय दृश्ये आणि लेआउट थीमसाठी आहे. तुमचा ब्लॉग क्लासिक थीम वापरत असल्यास, तुम्हाला ती तुमच्या नेहमीच्या थीमवर मॅन्युअली जोडावी लागेल.</code;ua-123456-1<>

फेव्हिकॉन

कस्टम फेव्हिकॉन अपलोड करा.

गोपनीयता

Blogger वर सूचीबद्ध केलेले

लोकांना Blogger.com किंवा इतर ब्लॉगवरून तुमच्या ब्लॉगशी लिंक करू द्या.

शोध इंजीनना दृश्यमान

शोध इंजीनना तुमचा ब्लॉग शोधू द्या.

प्रकाशित करणे

ब्लॉग अ‍ॅड्रेस

ब्लॉग अ‍ॅड्रेस किंवा URL निवडा.

महत्त्वाचे: निवडलेले सबडोमेन उपलब्ध असणे आवश्यक आहे.

कस्टम डोमेन

तुमची स्वतःची नोंदवलेली URL तुमच्या ब्लॉगकडे निर्देशित करा. ब्लॉग नेकेड डोमेनवर (उदाहरणार्थ: yourdomain.com) होस्ट केलेले नसू शकतात, परंतु त्यांमध्ये टॉप लेव्हल डोमेन (www.yourdomain.com) किंवा सबडोमेन (blog.yourdomain.com) समाविष्ट असणे आवश्यक आहे. प्रथम तुमच्या डोमेनची योग्य प्रकारे नोंदणी केली जाणे आवश्यक आहे.

  • डोमेन रीडिरेक्ट करा
    हा पर्याय "नेकेड" डोमेनवरून कस्टम डोमेनवर एक रीडिरेक्ट करू देतो (उदाहरणार्थ, "example.com" वरून "www.example.com" वर रीडिरेक्ट करणे).
  • फॉलबॅक सबडोमेन
    तुमचे कस्टम डोमेन तुमच्या ब्लॉगशी संलग्न करण्यासाठी तुम्ही CNAME वापरू शकता. CNAME तयार करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

HTTPS

HTTPS उपलब्धता

ब्लॉगस्पॉट अ‍ॅड्रेस नेहमी HTTPS असल्यामुळे, हे सेटिंग फक्त कस्टम डोमेनसाठी उपलब्ध आहे. HTTPS रीडिरेक्ट सुरू केलेले असल्यास:

  • तुमच्या ब्लॉगचे अतिथी नेहमी https://<your-blog>.blogspot.com वर जातील.

HTTPS रीडिरेक्ट बंद केलेले असल्यास:

HTTPS रीडिरेक्‍ट

तुम्ही HTTPS रीडिरेक्ट सुरू केल्यावर, अतिथी नेहमी https://<your-blog>.blogspot.com वरील सुरक्षित आवृत्तीवर पोहोचतात.

परवानग्या

ब्लॉग ॲडमिन आणि लेखक

ब्लॉगचे अ‍ॅडमिन आणि लेखक यांची सूची डिस्प्ले करते. येथे तुम्ही त्यांचे सदस्यत्वदेखील बदलू किंवा रद्द करू शकता.

प्रलंबित लेखक आमंत्रणे

लेखक बनण्यासाठीचे तुमचे आमंत्रण अद्याप न स्वीकारलेले वापरकर्ते डिस्प्ले करते.

आणखी लेखकांना आमंत्रित करा

ब्लॉग लेखक जोडण्यासाठी, तुम्हाला जोडायच्या असलेल्या व्यक्तीचा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा. त्यांनी आमंत्रण स्वीकारल्यानंतर, त्यांना लेखक म्हणून सूचीबद्ध केले जाईल. तुमच्या ब्लॉगवर तुम्ही कमाल १०० एकूण सदस्य (लेखक, अ‍ॅडमिनिस्ट्रेटर किंवा वाचक) जोडू शकता.
महत्त्वाचे: ब्लॉग व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यांवर पोस्ट करण्यासाठी Google खाते आवश्यक आहे.

वाचक ॲक्सेस

बाय डीफॉल्ट, तुमचा ब्लॉग सार्वजनिक असतो आणि कोणालाही ऑनलाइन वाचता येतो. तुमचा ब्लॉग कोण पाहू शकते ते मर्यादित करण्यासाठी, “वाचक अ‍ॅक्सेस” विभागामध्ये, सार्वजनिक, लेखकांसाठी खाजगी किंवा कस्टम वाचक निवडा.

कस्टम वाचक

ब्लॉगच्या वाचकांची सूची डिस्प्ले करते.

प्रलंबित कस्टम वाचक आमंत्रणे

तुमचे वाचक बनण्यासाठीचे आमंत्रण अद्याप न स्वीकारलेले वापरकर्ते डिस्प्ले करते.

आणखी वाचकांना आमंत्रित करा

तुम्हाला तुमचा ब्लॉग वाचायला हव्या असलेल्या व्यक्तीचा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा.

पोस्ट

मुख्य पेजवर दाखवल्या जाणार्‍या कमाल पोस्ट

तुम्हाला तुमच्या मुख्य पेजवर कमाल किती पोस्ट दाखवायच्या आहेत ती संख्या निवडा.

पोस्ट टेम्पलेट (पर्यायी)

तुम्ही प्रत्येक वेळी नवीन पोस्ट तयार करता तेव्हा दिसणाऱ्या मजकूर किंवा कोडने पोस्ट टेम्पलेट पोस्ट संपादक फॉरमॅट करतात. पोस्ट टेम्पलेटबद्दल अधिक जाणून घ्या.

इमेज लाइटबॉक्स

निवडलेला असताना, क्लिक केल्यावर, तुमच्या इमेज तुमच्या ब्लॉगच्या वर असलेल्या ओव्हरलेमध्ये उघडतील. तुमच्या पोस्टमध्ये एकाहून अधिक इमेज असल्यास, त्या स्क्रीनच्या तळाशी थंबनेल म्हणून दिसतील.

टिप्पण्या

टिप्पणीचे स्थान

  • एम्बेड केलेले: वापरकर्त्यांना पोस्टवर उत्तर देऊ देते.
  • पूर्ण पेज आणि पॉपअप विंडो: वापरकर्त्यांना त्यांची टिप्पणी देण्यासाठी नवीन पेजवर नेते.

महत्त्वाचे: तुम्ही "लपवा" निवडल्यावर, त्यामुळे सध्याच्या टिप्पण्या हटवल्या जात नाहीत. दुसरा पर्याय निवडून तुम्ही त्या कधीही दाखवू शकता.

टिप्पणी कोण देऊ शकते?

Blogger मध्ये तुमच्या ब्लॉग पोस्टवर टिप्पणी कोण देऊ शकते ते तुम्ही व्यवस्थापित करू शकता. "टिप्पणी कोण देऊ शकते" मध्ये, निवडा:

  • कोणीही (निनावींसह)
  • Google खाते असलेले वापरकर्ते
  • फक्त या ब्लॉगचे सदस्य

टिप्पणी नियंत्रण

प्रकाशित केल्या जाण्याआधी टिप्पण्यांचे पुनरावलोकन करा. टिप्पण्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी टिप्पण्या दृश्यावर जा. टिप्पणी नियंत्रणाबद्दल अधिक जाणून घ्या..

  • यापेक्षा जुन्या पोस्टसाठी
    टिप्पणी नियंत्रण विभागामध्ये तुम्ही "काही वेळा" निवडले असल्यास, फक्त त्या वेळेच्या श्रेणीमधील टिप्पण्या नियंत्रण विभागामध्ये जातील.
  • परीक्षण विनंत्या यांना ईमेल करा
    तुमच्या ब्लॉगवर नवीन टिप्पणी मिळाल्यावर, तुम्हाला ईमेल सूचना मिळेल.

वाचक टिप्पणी कॅप्चा

एखाद्या व्यक्तीला तुमच्या ब्लॉगवर टिप्पणी द्यायची असल्यास, त्यांना शब्द पडताळणी पायरी पूर्ण करावी लागेल. नको असलेल्या टिप्पण्या कशा रोखायच्या ते जाणून घ्या. ब्लॉग लेखक टिप्पण्यांसाठी शब्द पडताळणी पाहू शकणार नाहीत.

महत्त्वाचे: हे सेटिंग बंद केलेले असले तरीदेखील, काही टिप्पणी करणार्‍यांना पोस्ट करण्याआधी कोड एंटर करण्यास सांगितले जाऊ शकते.

टिप्पणी फॉर्म मेसेज

हा मेसेज टिप्पणी बॉक्सच्या खाली डिस्प्ले केला जातो.

ईमेल

ईमेल वापरून पोस्ट करा

ईमेलला Mail2Blogger म्हणूनदेखील ओळखले जाते. तुमच्या ब्लॉगवर मजकूर आणि इमेज थेट पोस्ट करण्यासाठी हा अ‍ॅड्रेस वापरा.

टिप्पणी सूचना ईमेल

एखाद्या व्यक्तीने तुमच्या ब्लॉगवर टिप्पणी दिल्यास आम्ही या अ‍ॅड्रेसवर सूचित करू.

प्रलंबित टिप्पणी सूचना ईमेल

तुमचे टिप्पणी सूचना ईमेल मिळवण्याचे आमंत्रण अद्याप न स्वीकारलेले वापरकर्ते डिस्प्ले करते.

टिप्पणी सूचना ईमेलवर आणखी लोकांना आमंत्रित करा

तुम्ही स्वल्पविरामांनी विभक्त केलेले कमाल दहा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करू शकता.

यांना पोस्टचा ईमेल करा

तुम्ही नवीन पोस्ट प्रकाशित करता तेव्हा, या अ‍ॅड्रेसवर ईमेल पाठवला जाईल.

प्रलंबित पोस्ट सूचना ईमेल

तुमचे पोस्ट सूचना ईमेल मिळवण्याचे आमंत्रण अद्याप न स्वीकारलेले वापरकर्ते डिस्प्ले करते.

पोस्ट सूचनांवर आणखी लोकांना आमंत्रित करा

तुम्ही स्वल्पविरामाने विभक्त केलेले कमाल दहा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करू शकता.

फॉरमॅटिंग

टाइमझोन

तुमचा टाइमझोन सेट करा.

तारीख हेडरचा फॉरमॅट

तुमच्या पोस्टच्या वर तारीख अशी दिसेल.

टाइमस्टॅंपचा फॉरमॅट

पोस्टचा टाइमस्टँप असा दिसेल.

टिप्पणी टाइमस्टँपचा फॉरमॅट

टिप्पणीचा टाइमस्टँप असा दिसेल.

मेटा टॅग

शोध वर्णन सुरू करा

ब्लॉगचे शोध वर्णन सेट करा. तुमचा ब्लॉग एकंदर कशाबद्दल आहे याचा सारांश लिहून शोध परिणामांमध्ये तुमचा ब्लॉग निवडण्यात वापरकर्त्यांना मदत करा. ब्लॉग वर्णनांबद्दल अधिक जाणून घ्या.

एरर आणि रीडिरेक्ट

कस्टम ४०४

ब्लॉगचा ४०४ पेज सापडले नाही मेसेज सेट करा. जेनेरिक मेसेजऐवजी ४०४ पेजवर डिस्प्ले करण्यासाठी मेसेज एंटर करा.

कस्टम रीडिरेक्ट

ब्लॉगची कस्टम रीडिरेक्ट सेट करा. तुमच्या ब्लॉगच्या पेजकडे निर्देश करणार्‍या URL साठी कस्टम रीडिरेक्ट जोडा.

  • यापासून
    हटवलेली URL जोडा. मूळ लेख हटवला गेला असल्यास, कायमचा निवडा.
  • यावर
    तुम्हाला निर्देश करायची असलेली URL जोडा.

क्रॉलर आणि अनुक्रमित करणे

कस्टम robots.txt सुरू करा

तुमच्या ब्लॉगचा कस्टम robots.txt आशय सेट करा. शोध इंजीनसाठी डीफॉल्ट robots.txt आशयाऐवजी हा मजकूर वापरला जाईल. robots.txt आशयाबद्दल अधिक जाणून घ्या.

कस्टम रोबोट हेडर टॅग सुरू करा

ब्लॉगचे कस्टम रोबोट हेडर टॅग सेट करा. शोध इंजीनना दिले जाणारे रोबोट हेडर टॅग सेट करण्यासाठी हे फ्लॅग वापरले जातात. रोबोट हेडर टॅगबद्दल अधिक जाणून घ्या.

Google Search Console

शोध कन्सोलशी लिंक करा.

कमाई

कस्टम ads.txt सुरू करा

ब्लॉगचा कस्टम ads.txt आशय सेट करा. ads.txt फाइल तुम्हाला तुमच्या डिजिटल जाहिरात इन्व्हेंटरीच्या पुनर्विक्रेत्यांना नेमके ओळखू देते आणि त्यांना परवानगी देऊ देते. कस्टम जाहिरातींबद्दल अधिक जाणून घ्या.

ब्लॉग व्यवस्थापित करा

आशय इंपोर्ट करा

तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुमच्या पोस्ट आणि टिप्पण्यांच्या .xml फाइल इंपोर्ट करू शकता.

आशयाचा बॅकअप घ्या

तुम्ही तुमच्या ब्लॉगचा बॅकअप घेतल्यावर, तुम्हाला पोस्ट आणि टिप्पण्यांची .xml फाइल मिळते.

तुमच्‍या ब्‍लॉगमधील व्हिडिओ

तुमच्या ब्लॉगमधील व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू किंवा हटवू शकता.

तुमचा ब्लॉग काढून टाका

तुम्ही ब्लॉग हटवल्यावर, तो रिस्टोअर करण्यासाठी तुमच्याकडे थोडा कालावधी असतो. तुम्ही ब्लॉग कायमचा हटवल्यावर, तुमची सर्व ब्लॉग माहिती, पोस्ट आणि पेज हटवली जातील आणि तुम्हाला ते रिस्टोअर करता येणार नाही.

महत्त्वाचे: हटवलेले ब्लॉग कायमचे काढून टाकले जाण्यापूर्वी ९० दिवसांच्या आत रिस्टोअर केले जाऊ शकतात. तुम्ही सध्या जे Google खाते वापरून लॉग इन केले आहे ते वापरून या अ‍ॅड्रेसवर दुसरा ब्लॉग तयार करू शकता. तुमचा ब्लॉग हटवण्यापूर्वी तुम्ही तो एक्सपोर्ट करू शकता.

साइट फीड

ब्लॉग फीडला अनुमती द्या

  • पूर्ण: तुमच्या पोस्टचे संपूर्ण आशय वितरित करते.
  • जंप ब्रेक पर्यंत: तुमच्या जंप ब्रेकपूर्वीचा सर्व पोस्ट आशय दाखवते. जंप ब्रेक बद्दल अधिक जाणून घ्या.
  • संक्षिप्त: अंदाजे पहिले ४०० वर्ण वितरित करते.
  • काहीही नाही: तुम्ही "काहीही नाही" निवडल्यास, तुमच्या ब्लॉगचे XML फीड बंद केले जाईल.
  • कस्टम: ब्लॉग पोस्ट, टिप्पणी फीड किंवा प्रति पोस्ट टिप्पणी फीड यांसाठी प्रगत पर्याय सेट करा.
    • ब्लॉग पोस्ट फीड
      तुमच्या पोस्टचा किती आशय तुम्हाला शेअर करायचा आहे ते निवडा.
    • ब्लॉग टिप्पणी फीड
      तुमच्या टिप्पण्यांचा किती आशय तुम्हाला शेअर करायचा आहे ते निवडा.
    • प्रति पोस्ट टिप्पणी फीड
      तुमच्या प्रति पोस्ट टिप्पण्यांचा किती आशय तुम्हाला शेअर करायचा आहे ते निवडा.

पोस्ट फीड रीडिरेक्ट URL

तुम्ही तुमचे पोस्ट फीड FeedBurner ने बर्न केले असल्यास किंवा तुमच्या फीडवर प्रक्रिया करण्यासाठी दुसरी सेवा वापरली असल्यास, येथे पूर्ण फीड URL एंटर करा. Blogger सर्व पोस्ट फीड ट्रॅफिक या अ‍ॅड्रेसवर रीडिरेक्ट करेल. रीडिरेक्ट न करण्यासाठी हे रिकामे राहू द्या.

पोस्ट फीड फूटर

तुमच्या पोस्ट फीड मध्ये हे प्रत्येक पोस्टनंतर दिसेल. तुम्ही जाहिराती किंवा इतर तृतीय पक्ष फीड जोडण्या वापरत असल्यास, तो कोड तुम्ही येथे एंटर करू शकता. तुम्ही “ब्लॉग फीडला अनुमती द्या” पूर्ण वर सेट करणेदेखील आवश्यक आहे.

शीर्षक आणि एंक्लोजर लिंक

हे पोस्ट संपादकामध्ये शीर्षक लिंक आणि एंक्लोजर लिंकचे पर्याय जोडते.

  • शीर्षक लिंक तुमच्या पोस्टच्या शीर्षकासाठी तुम्हाला कस्टम URL सेट करू देतात.
  • एंक्लोजर लिंक तुमच्या पोस्टमधील पॉडकास्ट, MP3 आणि इतर आशय RSS आणि Atom यांसारख्या फीडमध्ये प्ले करता येण्यासारखा बनवण्यासाठी वापरल्या जातात.

सर्वसाधारण

Blogger मसुदा वापरा

Blogger मसुदा म्हणजे बीटा व्हर्जनमधील Blogger. सर्व Blogger वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये रोल-आउट केली जाण्यापूर्वी त्यांची चाचणी घेण्यासाठी तो सुरू करा.

वापरकर्ता प्रोफाइल

तुमच्या वापरकर्त्याची प्रोफाइल व्यवस्थापित करण्यासाठी, "वापरकर्ता प्रोफाइल" लिंक वर क्लिक करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7190611729436025432
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
74
false
false