तुमच्या ब्लॉगवर जाहिरात दाखवा

महत्त्वाचे: प्रौढांसाठी असलेल्या ब्लॉगवर जाहिरातींना अनुमती नाही. Blogger चे आशय धोरण आणि सेवा अटी याविषयी अधिक जाणून घ्या.

Blogger वरून पैसे कमवण्यासाठी, तुम्ही तुमच्या पेजवर AdSense आणि इतर जाहिराती दाखवू शकता. AdSense वापरण्यासाठी, तुमच्या ब्लॉगने AdSense ची धोरणे आणि निर्बंध यांचे पालन करणे आवश्यक आहे.

टीप: तुमच्या Blogger च्या वापरावर Blogger चे आशय धोरण आणि सेवा अटी तरीही लागू होतात.

AdSense साठी साइन अप करा

महत्त्वाचे: तुम्ही रीडिरेक्ट करा वर क्लिक करण्यापूर्वी तुम्ही सर्व पायऱ्या पूर्ण केल्याची खात्री करा.

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, ब्लॉग निवडा.
  3. डावीकडे मेनूमधून, कमाईआणि त्यानंतर AdSense खाते तयार करा वर क्लिक करा.
  4. तुमच्या Blogger खात्याशी संबंधित Google ईमेल निवडा.
  5. AdSense फॉर्म भरा आणि खाते तयार करा वर क्लिक करा.
  6. तुमचे पेमेंट तपशील एंटर करा आणि तुमच्या फोन नंबरची पडताळणी करा.
  7. सबमिट करा वर क्लिक करा.
    • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सिस्टम तुम्हाला आपोआप Blogger वर घेऊन जाईल. असे न झाल्यास, रीडिरेक्ट करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही सर्व पायऱ्या पूर्ण करण्याआधी व्यत्यय आल्यास, पायरी एक ते पाच पुन्हा पूर्ण करा. तुमचे AdSense होम पेज "आम्ही तुमच्यासाठी सेट करत आहोत" असे बरेच दिवस दाखवत असल्यास, सहयोग स्वीकारा वर क्लिक करा.

तुमच्या पोस्टच्या दरम्यान जाहिराती दाखवा

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला जाहिराती दाखवायच्या असतील तो ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, लेआउट वर क्लिक करा.
  4. तुमच्या टेम्पलेटवर आधारित:
    • "ब्लॉग पोस्ट" मधील "पेज बॉडी" मध्ये, संपादित करा वर क्लिक करा.
    • "ब्लॉग पोस्ट" मधील "मुख्य" मध्ये, संपादित करा वर क्लिक करा.
  5. "पोस्ट दरम्यान जाहिराती दाखवा" च्या शेजारी असलेल्या बॉक्सवर खूण करा.
  6. जाहिरातीचा फॉरमॅट, रंग आणि तुम्हाला जाहिराती किती वेळा दाखवायच्या आहेत ते निवडा.
  7. सेव्ह करा वर क्लिक करा. 
  8. मांडणी सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे सेव्ह करा सेव्ह करा वर क्लिक करा.

स्तंभांमध्ये जाहिराती दाखवा

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला जाहिराती दाखवायच्या असतील तो ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, लेआउट वर क्लिक करा.
  4. "साइडबार" मध्ये, गॅजेट जोडा वर क्लिक करा.
  5. AdSense च्या बाजूला, जोडा जोडा वर क्लिक करा.
  6. AdSense कॉंफिगर करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
  7. मांडणी सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे सेव्ह करा सेव्ह करा वर क्लिक करा.

इतर जाहिरात सेवांवरील जाहिराती दाखवा

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला जाहिराती दाखवायच्या असतील तो ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, लेआउट वर क्लिक करा.
  4. तुम्हाला जाहिराती दाखवायच्या असलेल्या जागेवर पॉईंट करा आणि गॅजेट जोडा वर क्लिक करा.
  5. "HTML/JavaScript" च्या बाजूला पॉप-अप विंडोमध्ये आणि जोडाजोडा वर क्लिक करा.
  6. पर्यायी: शीर्षक एंटर करा.
  7. "आशय" विभागामध्ये, जाहिरात सेवा वेबसाइटवरून कोड कॉपी आणि पेस्ट करा.
  8. सेव्ह करा वर क्लिक करा. 
  9. मांडणी सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे सेव्ह करा सेव्ह करा वर क्लिक करा.

तुमच्या Blogger उत्पन्नाच्या अहवालाचे पुनरावलोकन करा

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, पुनरावलोकन करण्यासाठी ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, कमाई and then कमाई पाहा वर क्लिक करा.

टीप: तुमच्या अहवालामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी AdSense शब्दार्थसूची वापरा.

AdSense सुरू न झाल्यास काय करावे

महत्त्वाचे: तुमचे खाते अद्याप सुरू आहे का हे तपासण्यासाठी, AdSense वर जा.

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, लेआउट वर क्लिक करा.
  4. AdSense गॅजेटमध्ये, संपादित कराand then सेव्ह करा वर क्लिक करा.
  5. तुमच्या ब्लॉगवरील प्रत्येक AdSense गॅजेटकरिता चौथी पायरी रिपीट करा.
  6. "ब्लॉग पोस्ट" गॅजेटच्या खाली, संपादित कराand then सेव्ह करा वर क्लिक करा.
  7. मांडणी सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे सेव्ह करा सेव्ह करा वर क्लिक करा .

ads.txt फाइल सेट करा

तुमचा ब्लॉग तृतीय पक्षाच्या पुरवठादारांसोबत कमाई करत असल्यास किंवा तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये मॅन्युअली AdSense इंटिग्रेट केले असल्यास, तुम्हाला मॅन्युअली ads.txt फाइलचा आशय सेट करण्याची आवश्यकता आहे. AdSense साठी ads.txt विषयी अधिक जाणून घ्या.

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला सेट करायचा असलेला ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. "कमाई" मध्ये कस्टम ads.txt सुरू करणे सुरू करा.
  5. कस्टम ads.txt वर क्लिक करा.
  6. तुमच्या तृतीय पक्ष कमाई पुरवठादाराच्या सेटिंग्ज कॉपी करा आणि त्या मजकूर बॉक्समध्ये पेस्ट करा.
  7. सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: तुमच्या ads.txt फाइलचा आशय तपासण्याकरिता http://<your blog address>/ads.txt वर जा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10335909673856869341
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
74
false
false