Google Assistant तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करते

Google मध्ये, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि मजबूत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चर, जबाबदार डेटाविषयक कार्यपद्धती व तुम्हाला नियंत्रण करू देणारी वापरण्यास सोपी टूल वापरून तिचे संरक्षण करतो. Google Assistant यासारख्या सेवा तुमच्याकरिता आणखी उपयुक्त बनवण्यासाठी आणि पर्सनलाइझ करण्यासाठी Google तुमची माहिती वापरते. आम्ही वापरण्यास सोपी नियंत्रणे तयार केली आहेत जेणेकरून, तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता.

Google Assistant तुमचा डेटा खाजगी कसा ठेवते

आम्ही लोकांकडून जे ऐकले आहे त्यानुसार, Google Assistant बाबतीत तुम्हाला असलेल्या गोपनीयता आणि सुरक्षेशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या समस्यांचे आम्हाला स्पष्टपणे निराकरण करायचे आहे.

तुम्ही विचारले: Google हे Google Assistant वरील माझ्या वैयक्तिक माहितीची विक्री करते का?

Google तुमच्या वैयक्तिक माहितीची विक्री कधीही करत नाही -- त्यामध्ये तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग समाविष्ट आहेत. Google Assistant चा गोपनीयतेशी संबंधित दृष्टिकोन आणि वैशिष्ट्ये यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Google चे सुरक्षितता केंद्र वर जा.

तुम्ही विचारले: Google हे Google Assistant वरील माझी वैयक्तिक माहिती शासनाला देते का?

Google ला वापरकर्त्याच्या माहितीसाठी शासनाकडून विनंती केली जाते तेव्हा, प्रत्येक विनंती लागू कायद्यांची पूर्तता करते याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रत्येक विनंतीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करतो. एखाद्या विनंतीमध्ये बऱ्याच माहितीची मागणी केली असल्यास, आम्ही ती कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि काही प्रकरणांमध्ये आम्ही कोणतीही माहिती देण्यास हरकत घेतो. तुम्ही policies.google.com/terms/information-requests येथे संपूर्ण धोरण पाहू शकता. Google चा पारदर्शकता अहवाल यामध्ये अधिक जाणून घ्या.

तुम्ही विचारले: Google Assistant माझ्या लहान मुलाच्या वैयक्तिक माहितीची विक्री तृतीय पक्षाला करते का?

Family Link द्वारे व्यवस्थापित केली जाणारी लहान मुलांची Google खाती यांमधील तुमच्या लहान मुलाचे नाव, ईमेल अ‍ॅड्रेस, व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा अचूक स्थान यांसारखी वैयक्तिक माहिती Google Assistant तृतीय पक्षांसोबत शेअर करत नाही. कुटुंबांसाठी कृती याचे डेव्हलपरदेखील वापरकर्त्यांकडून वैयक्तिक माहिती न मागण्याशी सहमत आहेत. Family Link द्वारे व्यवस्थापित केलेले Google खाते वापरणारी लहान मुले फक्त "कुटुंबांसाठी" प्रोग्राममध्ये भाग घेणाऱ्या Google च्या नसलेल्या कृती वापरू शकतात. Google ची नसलेली अ‍ॅप्स तुमच्या लहान मुलाच्या Google खातेसह कशी काम करतात याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google Assistant तुमचा डेटा सुरक्षित कसा ठेवते

तुमची माहिती खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी Google Assistant डिझाइन केले आहे.

तुम्ही विचारले: Google Assistant ने माझ्याबद्दल गोळा केलेला डेटा किती सुरक्षित आहे?

Google Assistant यासारखी Google उत्पादने आणि सेवा यांमध्ये मजबूत, बिल्ट-इन सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत जी विविध ऑनलाइन धोक्यांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आपोआप काम करतात. बिल्ट-इन सुरक्षितता वैशिष्ट्ये कशी काम करतात याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही विचारले: माझी Google Assistant सोबतची संभाषणे एंक्रिप्ट केलेली आहेत का?

तुमची Google Assistant सोबतची संभाषणे यासारखा तुमचा डेटा खाजगी आणि सुरक्षित आहे. हा डेटा तुमचे डिव्हाइस, Google सेवा आणि आमची केंद्रे यांमध्ये वापरला जात असताना, एंक्रिप्ट केलेला असतो. Google उत्पादने आणि सेवा या अग्रेसर एंक्रिप्शन तंत्रज्ञानासह सुरक्षिततेचे एकाहून अधिक स्तर वापरून तुमची माहिती संरक्षित करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत. आमचे सुरक्षितता केंद्र येथे इतर वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6690490835947183823
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1633398
false
false