तुमचा काँप्युटर आणि डिव्हाइस यांदरम्यान फाइल ट्रान्सफर करणे

तुम्ही तुमचा काँप्युटर आणि Android डिव्हाइस यांदरम्यान फोटो, संगीत व इतर फाइल हलवण्यासाठी तुमचे Google खाते किंवा USB केबल वापरू शकता.

महत्त्वाचे: यांपैकी काही पायर्‍या फक्त Android 9 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.

पहिला पर्याय: तुमचे Google खाते वापरून फाइल हलवा

तुमचा काँप्युटर आणि डिव्हाइस या दोन्हींवर फाइल वापरण्यासाठी त्या तुमच्या Google खाते वर अपलोड करा.

दुसरा पर्याय: USB केबल वापरून फाइल हलवा

Windows काँप्युटर
  1. तुमचे डिव्हाइस अनलॉक करा.
  2. USB केबल वापरून, तुमचे डिव्हाइस तुमच्या काँप्युटरशी कनेक्ट करा.
  3. तुमच्या डिव्हाइसवर, "हे डिव्हाइस USB द्वारे चार्ज करत आहे" या सूचनेवर टॅप करा.
  4. "यासाठी USB वापरा" या अंतर्गत, फाइल ट्रान्सफर निवडा.
  5. तुमच्या काँप्युटरवर फाइल ट्रान्सफर विंडो उघडेल. ती फाइल ड्रॅग करण्यासाठी वापरा.
  6. तुमचे पूर्ण झाल्यावर, Windows मधून तुमचे डिव्हाइस बाहेर काढा.
  7. USB केबल अनप्लग करा.
Mac काँप्युटर

तुमचा काँप्युटर Mac OS X 10.5 आणि त्यावरील आवृत्ती वापरत असणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या काँप्युटरवर Android फाइल ट्रान्सफर डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
  2. Android File Transfer उघडा. तुम्ही पुढील वेळी तुमचे डिव्हाइस कनेक्ट करता, तेव्हा ते आपोआप उघडते.
  3. तुमचे डिव्हाइस अनलॉक करा.
  4. USB केबल वापरून, तुमचे डिव्हाइस तुमच्या काँप्युटरशी कनेक्ट करा.
  5. तुमच्या डिव्हाइसवर, "हे डिव्हाइस USB द्वारे चार्ज करत आहे" या सूचनेवर टॅप करा.
  6. "यासाठी USB वापरा" या अंतर्गत, फाइल ट्रान्सफर निवडा.
  7. तुमच्या काँप्युटरवर Android File Transfer विंडो उघडेल. ती फाइल ड्रॅग करण्यासाठी वापरा.
  8. तुमचे पूर्ण झाल्यावर, USB केबल अनप्लग करा.
Chromebook
  1. USB केबल वापरून, तुमचे डिव्हाइस तुमच्या Chromebook शी कनेक्ट करा.
  2. तुमचे डिव्हाइस अनलॉक करा.
  3. तुमच्या डिव्हाइसवर, "हे डिव्हाइस USB द्वारे चार्ज करत आहे" या सूचनेवर टॅप करा.
  4. "यासाठी USB वापरा" या अंतर्गत, फाइल ट्रान्सफर निवडा.
  5. तुमच्या Chromebook वर, Files अ‍ॅप उघडते. ती फाइल ड्रॅग करण्यासाठी वापरा. Chromebook वर कोणते फाइल प्रकार काम करतात ते जाणून घ्या.
  6. तुमचे पूर्ण झाल्यावर, USB केबल अनप्लग करा.

पर्याय ३: Windows साठी Nearby सह शेअरिंग वापरून फाइल हलवणे

Windows साठी Nearby सह शेअरिंग सेट करणे

एकमेकांच्या जवळ असलेल्या Windows कॉंप्युटर आणि Android डिव्हाइसदरम्यान इमेज, व्हिडिओ, दस्तऐवज व आणखी बरेच काही शेअर करण्यासाठी तुम्ही Nearby सह शेअरिंग वापरू शकता.

तुम्ही तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसदरम्यान किंवा Nearby सह शेअरिंग वापरणाऱ्या तुमच्या आसपासच्या लोकांसोबत फाइल शेअर करू शकता. इतर लोक तुम्हाला फाइल पाठवतात, तेव्हा तुम्हाला विनंती मंजूर करण्यास सांगितले जाते. तुम्ही फाइल शेअर करता, तेव्हा त्या एंक्रिप्ट केल्या जातात.

महत्त्वाचे:

  • तुम्ही Google खात्याशिवाय Windows साठी Nearby सह शेअरिंग वापरल्यास, काही पर्याय उपलब्ध नसू शकतात.
  • अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून अ‍ॅप उघडू नका.
  • इंस्टॉलर धोकादायक असू शकतो अशी तुम्हाला डाउनलोड केल्यावर चेतावणी मिळू शकते. तुम्ही फाइल Google वरून डाउनलोड करता तोपर्यंत, ती सुरक्षित असावी.
  1. तुमच्या Windows डिव्हाइसवर Nearby सह शेअरिंग डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
    • इंस्टॉल केल्यावर, अ‍ॅप उघडा आणि साइन इन करा.
  2. “इतरांना असे दृश्यमान असेल” अंतर्गत, तुमच्या डिव्हाइसचे नाव निवडा.
  3. “मिळवणे” अंतर्गत, तुमच्यासोबत कोण शेअर करू शकते ते निवडा.
  4. पूर्ण झाले निवडा.
तुमच्यासोबत कोण शेअर करू शकते ते निवडणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Windows अ‍ॅपसाठी Nearby सह शेअरिंग उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर डिव्हाइस दृश्यमानता निवडा.
  3. तुमची दृश्यमानता निवडा:
    • सर्वांसाठी: Nearby सह शेअरिंग सुरू असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी तुमचे डिव्हाइस दृश्यमान असते.
    • संपर्क: तुमच्या जवळपासच्या संपर्कांना तुमचे डिव्हाइस दृश्यमान असते. तुमचे डिव्हाइस सर्व संपर्कांसाठी दृश्यमान करण्याचे तुम्ही निवडू शकता किंवा विशिष्ट संपर्क निवडू शकता.
    • तुमची डिव्हाइस: तुमचे डिव्हाइस हे एकच Google खाते असलेल्या तुमच्या डिव्हाइसवर दृश्यमान असते.
    • कोणीही नाही: तुमचे डिव्हाइस दृश्यमान नसते आणि इतर कोणीही तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही.
टीप: आणखी खाजगी आणि सुरक्षित शेअरिंगसाठी, तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा व संपर्क किंवा तुमची डिव्हाइस निवडा.
इतर डिव्हाइसवर आशय पाठवणे
  1. तुमच्या Windows कॉंप्युटरवर, Windows साठी Nearby सह शेअरिंग अ‍ॅप उघडा.
  2. तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल निवडा.
    • तुम्ही फाइल निवडा किंवा फोल्डर निवडा देखील निवडू शकता आणि तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल अथवा फोल्डर शोधू शकता.
  3. अ‍ॅप विंडोमध्ये फाइल ड्रॅग करा.
  4. तुम्हाला फाइल ज्या डिव्हाइससह शेअर करायची आहे ते डिव्हाइस निवडा.
    • तुम्हाला पिन मिळाल्यास, तो मिळवणाऱ्याच्या डिव्हाइसवर असलेल्या पिनशी जुळत असल्याची खात्री करा.
    • तुम्हाला तो मिळत नसल्यास, तुम्हाला ज्या डिव्हाइसवर फाइल पाठवायची आहे ते डिव्हाइस तुमच्या डिव्हाइसला दृश्यमान असल्याची खात्री करा.
  5. शेअर करा निवडा.
  6. मिळवणाऱ्याने शेअर करणे कंफर्म केल्यावर, तुमची फाइल पाठवली जाते.

टीप: तुम्ही फाइल ड्रॅग करून ड्रॉप करू शकत नसल्यास:

  • तुम्ही हेदेखील करू शकता:
    1. फाइल शोधा.
    2. फाइलवर राइट-क्लिक करा.
    3. Nearby सह शेअरिंग वापरून पाठवा निवडा.
  • तुम्ही कदाचित अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून अ‍ॅप उघडले असेल. तुम्ही अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून अ‍ॅप उघडले नसल्याची खात्री करा.
एखाद्या व्यक्तीकडून आशय मिळवणे

महत्त्वाचे: एखाद्या व्यक्तीकडून फाइल मिळवण्यासाठी, तुमचे डिव्हाइस त्यांना डिटेक्ट करता येणे आवश्यक आहे. तुम्ही सेटिंग्ज मधून डिव्हाइसची दृश्यमानता बदलू शकता.

  1. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला आशय पाठवण्यासाठी Nearby सह शेअरिंग वापरल्यास, तुम्हाला सूचना मिळेल.
    • तुमच्या Android डिव्हाइसवर “जवळपासचे डिव्हाइस शेअर करत आहे” अशी सूचना मिळाल्यास: तुमचे डिव्हाइस डिटेक्ट करता यावे, यासाठी सुरू करा निवडा आणि पायरी २ वर पुढे सुरू ठेवा.
    • त्यावर पाठवणाऱ्याचे तपशील दिसत असल्यास: स्वीकारा किंवा नकार द्या निवडा.
  2. शेअर करण्याच्या विनंतीचे पुनरावलोकन करा.
    • तुम्हाला पिन मिळाल्यास, तो पाठवणाऱ्याच्या डिव्हाइसवर असलेल्या पिनशी जुळत असल्याची खात्री करा.
  3. आशय मिळवण्यासाठी, स्वीकारा निवडा.
    • फाइल तुमच्या “डाउनलोड” फोल्डरमध्ये सेव्ह केली जाते.
टीप: एकच Google खाते वापरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसदरम्यान आशय शेअर करत असल्यास, मिळवणाऱ्याचे डिव्हाइस आपोआप ट्रान्सफर स्वीकारते.

USB द्वारे फाइल हलवणे ट्रबलशूट करा

Windows काँप्युटर
  • तुमचा काँप्युटर ट्रबलशूट करा
    • Windows नवीन हार्डवेअर आपोआप डिटेक्ट करत असल्याची खात्री करण्यासाठी, तुमच्या काँप्युटरची सेटिंग्ज तपासा.
    • तुमचा कॉंप्युटर रीस्टार्ट करा.
  • तुमचे डिव्हाइस ट्रबलशूट करणे
  • तुमची USB कनेक्शन ट्रबलशूट करणे
    • वेगळी USB केबल वापरून पहा. सर्व USB केबल फाइल ट्रान्सफर करू शकत नाहीत.
    • तुमच्या डिव्हाइसवर USB पोर्टची चाचणी घेण्यासाठी, तुमचे डिव्हाइस वेगळ्या काँप्युटरशी कनेक्ट करा.
    • तुमच्या काँप्युटरवर USB पोर्टची चाचणी घेण्यासाठी, तुमच्या काँप्युटरशी वेगळे डिव्हाइस कनेक्ट करा.
Mac काँप्युटर
  • तुमचा काँप्युटर ट्रबलशूट करणे
    • तुमचा काँप्युटर Mac OS X 10.5 आणि त्यावरील आवृत्ती वापरत आहे का ते तपासा.
    • तुमच्या काँप्युटरमध्ये Android File Transfer इंस्टॉल केलेले आणि उघडे आहे का ते तपासा.
    • तुमचा कॉंप्युटर रीस्टार्ट करा.
  • तुमचे डिव्हाइस ट्रबलशूट करणे
  • तुमची USB कनेक्शन ट्रबलशूट करणे
    • वेगळी USB केबल वापरून पहा. सर्व USB केबल फाइल ट्रान्सफर करू शकत नाहीत.
    • तुमच्या डिव्हाइसवर USB पोर्टची चाचणी घेण्यासाठी, तुमचे डिव्हाइस वेगळ्या काँप्युटरशी कनेक्ट करा.
    • तुमच्या काँप्युटरवर USB पोर्टची चाचणी घेण्यासाठी, तुमच्या काँप्युटरशी वेगळे डिव्हाइस कनेक्ट करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9032178378969464882
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false