सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

धनादेशाद्वारे पेमेंट मिळवणे

तुमच्या स्थानानुसार, तुम्हाला कदाचित तुमची AdSense पेमेंट ही धनादेशाद्वारे मिळवता येतील. धनादेश कसे पाठवले जातात आणि ते कसे वटवावेत या गोष्टींविषयी खाली अधिक जाणून घ्या.
मला माझा धनादेश कुठे वटवता येईल?
डिलिव्हरीचे पर्याय
धनादेश वटवण्याची अंतिम तारीख

मला माझा धनादेश कुठे वटवता येईल?

बॅंकनुसार धोरणे बदलत असल्यामुळे, एखाद्या विशिष्ट बॅंकला तुमचे AdSense धनादेश स्वीकारता येतात की नाही हे आम्ही निर्धारित करू शकत नाही. धनादेशाद्वारे केली जाणारी सर्व पेमेंट ही Citibank द्वारे जारी केली जातात. तुम्हाला यू.एस. डॉलरमध्ये धनादेश मिळाल्यास, कृपया तुमच्या बॅंकचा Citibank सोबत याबाबतीत संबंध आहे का यासंदर्भात त्यांच्याकडे चौकशी करा. यू.एस. डॉलरमधील आमच्या धनादेशांवर प्रक्रिया करण्यासाठी हा संबंध आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या, की Google AdSense चे धनादेश हे फक्त जमा करण्यासाठी असतात आणि ते रोख रकमेच्या स्वरूपात वटवले जाऊ शकत नाहीत.

तसेच कृपया लक्षात ठेवा, की कोणताही धनादेश वटवण्यासाठी वेगवेगळ्या बॅंकना बरेचदा वेगवेगळा कालावधी लागतो. अधिक माहितीसाठी थेट तुमच्या बॅंकशी संपर्क साधावा असे आम्ही सुचवतो.

डिलिव्हरीचे पर्याय

सर्व धनादेश साधारण डिलिव्हरीमार्फत पाठवले जातात. सहसा पाठवल्याच्या तारखेनंतर सुमारे दोन ते चार आठवड्यांनी प्रकाशकांना त्यांचे धनादेश मिळतात. मात्र, तुमच्या स्थानावरील पोस्ट सेवेनुसार त्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

खाली सूचीबद्ध केलेल्या देशांमध्ये साधारण डिलिव्हरीमार्फत पाठवलेली पेमेंट ही स्थानिक कुरियर सेवेद्वारे पोस्टाने पाठवली जातील. अशा प्रकारे पेमेंट पोस्टाने पाठवण्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे, की धनादेशाच्या तारखेपासून १० ते ३० दिवसांच्या आत पेमेंट मिळतील.

  • अर्जेंटिना
  • बोलिव्हिया
  • चिली
  • कोलंबिया
  • इक्वेडोर
  • मेक्सिको
  • पॅराग्वे
  • उरुग्वे
  • व्हेनेझुएला

लॅटिन अमेरिकेमधील (वरती सूचीबद्ध केलेल्या) निवडक देशांमधील AdSense प्रकाशकांना Ocasa या स्थानिक कुरियर सेवेमार्फत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय साधारण डिलिव्हरीमार्फत पाठवलेली पेमेंट डिलिव्हर केली जातील. Ocasa मार्फत केलेल्या धनादेशाच्या पेमेंटसाठी ट्रॅकिंग क्रमांक उपलब्ध नाहीत.

टीप: तुमच्या पेमेंट सेटिंग्जमधील पत्ता ज्या देशामध्ये आहे, त्याच देशात तुमच्या धनादेशाच्या डिलिव्हरीचा पत्ता असणे आवश्यक आहे. धनादेश एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये पाठवले जाऊ शकत नाहीत.

धनादेश वटवण्याची अंतिम तारीख

तुम्हाला ६० दिवसानंतरही तुमचा धनादेश मिळाला नसल्यास, तुम्ही थेट तुमच्या AdSense खात्यामधून नवीन धनादेश पुन्हा जारी करू शकता. मूळ पेमेंटची तारीख आणि सध्याचे स्टेटस पाहण्यासाठी, तुमच्या "व्यवहार" पेजला भेट द्या. ६० दिवसांनंतरही धनादेश वटवला गेला नसल्यास, तुम्हाला तुमच्या "व्यवहार" पेजवर धनादेशाच्या स्टेटसच्या बाजूला "पेमेंट पुन्हा जारी करा" ही लिंक दिसेल. पेमेंट पुन्हा जारी करा वर क्लिक करा आणि त्यानंतर थोड्याच वेळात धनादेश थांबवला गेला आहे व तुमचा परतावा प्रगतीपथावर आहे हे दाखवणारा नवीन लाइन आयटम दिसेल.

धनादेश जारी करून ६० पेक्षा जास्त दिवस झाले असतील, तरच तुम्ही तुमच्या खात्यामधून धनादेश पुन्हा जारी करू शकता.

तुमचा धनादेश जारी केल्यानंतर १२ महिन्यांच्या आत तुम्ही तो जमा न केल्यास, तुमची कमाई पुन्हा तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल आणि तुमची पेमेंट होल्डवर ठेवली जातील.

एक्स्पायर झालेल्या धनादेशासाठीची तुमची पेमेंट होल्डवर ठेवली गेल्यावर, तुमच्या पेमेंट सेटिंग्ज पेजला भेट द्या आणि तुमच्या धनादेशाच्या डिलिव्हरीचा पत्ता अपडेट करा. तुमच्या डिलिव्हरीचा पत्ता तुम्ही अपडेट केला असला किंवा नसला, तरीही तुम्हाला धनादेश या पेमेंट पद्धतीच्या विजेटवरील 'पुन्हा सुरू करा' या बटणावर क्लिक करावे लागेल (किंवा नवीन पेमेंट पद्धत निवडावी लागेल). तुम्ही तुमची पेमेंट पद्धत संपादित आणि/किंवा पुन्हा सुरू केल्यानंतर, तुमचे होल्डवर असलेले पेमेंट काढून टाकले जाईल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17579394218387556549
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false