सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

अहवाल

तुमचा डेटा चार्टमध्ये प्रेझेंट करणे

चार्ट तुमच्या डेटाचे ग्राफिकल सादरीकरण देतात. तुमच्या मेट्र्रिकमध्ये काळानुसार होणार्‍या बदलांचे उदाहरण देण्यासाठी तुम्ही चार्ट वापरू शकता.

चार्ट प्रकार

प्रत्येक चार्ट प्रकार वेगळ्या पद्धतीने डेटा हाताळतो. तुम्हाला तुमच्या अहवालामधून काय शिकायचे आहे त्यानुसार तुम्ही तुमचा चार्ट प्रकार निवडायला हवा. प्रत्येक चार्ट प्रकार कधी वापरायचा याविषयीची ही काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत:

चार्ट प्रकार तुम्ही हे केलेले असताना वापरण्यासाठी उत्तम...
टाइमलाइन वेळेची (तारखा) तुलना करणे. टाइमलाइन कमाल दोन वेगळ्या तारीख रेंजसाठी एकल मेट्रिकमधील बदल दाखवते (उदा, अंदाजे कमाई) किंवा एका तारीख रेंजसाठी एकापेक्षा अधिक मेट्रिक दाखवते.
बार चार्ट एकापेक्षा अधिक वर्गवार्‍यांच्या परफॉर्मन्सची तुलना करणे. बार चार्ट एक वर्गवारी दुसर्‍या वर्गवारीच्या तुलनेत कशी परफॉर्म करत आहे याची तुलना दाखवतो.
पाय चार्ट एकापेक्षा अधिक वर्गवार्‍यांची टक्केवारीच्या स्वरूपात तुलना करणे. पाय चार्ट संपूर्ण वर्गवारीच्या तुलनेत भागांमधील टक्केवारीचा संबंध दाखवतो.

चार्ट प्रकारांदरम्यान स्विच करणे

तुम्ही अहवाल रन केल्यावर, आम्ही तुमच्या डेटासाठी डीफॉल्ट चार्ट प्रकार आपोआप दाखवतो. काही वेळा असे अनेक चार्ट प्रकार असतात, जे तुम्ही विश्लेषण करत असलेल्या माहितीच्या प्रकाराशी जुळणारे असतात.

  • दुसऱ्या चार्ट प्रकारावर स्विच करण्यासाठी, चार्टचे पर्यायChart options वर क्लिक करा आणि नवीन चार्टचा प्रकार निवडा.

चार्टमध्ये डेटा बदलणे

मेट्रिक

तुम्ही अहवालामधील चार्टमध्ये प्रदर्शित केलेली मेट्रिक बदलू शकता.

  • मेट्रिक दाखवण्यासाठी, चार्टवरील भागामधील मेट्रिक नावावर क्लिक करा. ते मेट्रिक दाखवणे थांबवण्यासाठी, मेट्रिक नावावर पुन्हा क्लिक करा.

तुम्ही चार्टमध्ये एकापेक्षा अधिक मेट्रिक दाखवल्यावर, प्रत्येक मेट्रिक वेगळा रंग वापरते.

टीप: तुम्ही चार्टमध्ये दोनपेक्षा जास्त मेट्रिक दाखवल्यास, चार्टमध्ये व्हर्टिकल स्केल नसेल, पण निवडलेल्या मेट्रिकची मूल्ये पाहण्यासाठी तुम्ही डेटा पॉइंटवर कर्सर फिरवू शकता.

Google AdSense मधील अंदाजे कमाई आणि पेज व्ह्यू दाखवणारे चार्ट डेटाचे उदाहरण.

डेटा मालिका

सारणीमधील डेटाचे प्रत्येक पंक्तीमध्ये नियंत्रण आहे जे तुम्हाला ती डेटा मालिका चार्टमध्ये जोडू देते किंवा चार्टमधून काढून टाकू देते. तुम्ही कोणत्या डेटा मालिका चार्टमध्ये दाखवल्या जातात हे त्वरित बदलण्यासाठी ही नियंत्रणे वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या टॉप तीन देशांचा डेटा पाहायचा असल्यास, तुम्ही देश अहवाल रन करून सारणीमधील पहिल्या तीन देशांच्या बाजूला असलेल्या टॉगलवर क्लिक करू शकता.

  • डेटा मालिका जोडण्यासाठी, सारणीमधील त्याच्या पंक्तीच्या बाजूच्या डोळ्यावर क्लिक करा. ती डेटा मालिका काढून टाकण्यासाठी, पुन्हा डोळा यावर क्लिक करा.
टीप: तारीख यांसारख्या काही ब्रेकडाउन साठी डोळे उपलब्ध नाहीत.
AdSense मधील डेटा मालिका सारणीचे उदाहरण.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12157964195746475715
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false