तुमची साइट AdSense च्या बाबतीत यशस्वी व्हावी, यासाठी त्यावर तुमच्या अतिथींसाठी सुसंबद्ध ठरेल आणि सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव पुरवेल असा युनिक आशय असणे आवश्यक आहे.
तुम्ही AdSense मध्ये साइन अप करणे हे करण्यापूर्वी, तुमची पेज सुस्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी त्यांचे पुनरावलोकन करावे अशी आम्ही शिफारस करतो:
- तुमच्या पेजबद्दल विशेष काय आहे?
- तुमच्या पेजवर स्पष्ट, वापरण्यासाठी सोपे नेव्हिगेशन आहे का?
- तुमच्या पेजवर युनिक आणि स्वारस्यपूर्ण आशय आहे का?
- AdSense वापरण्यासाठी तयार आहात का?
तुमच्या पेजबद्दल विशेष काय आहे?
आधीपासून बऱ्याच साइट असल्यामुळे, तुम्हाला वापरकर्त्यांना गुंतवून ठेवेल आणि त्यांना आणखी वाचन करण्यास प्रोत्साहित करेल असा युनिक, मूळ आणि उपयुक्त आशय तयार करणे आवश्यक आहे.
- तुमच्या पेजवरील (मजकूर, इमेज, इ.) घटकांची रचना विचारात घ्या. तुमचा लेआउट आकर्षक असल्याची आणि त्यामुळे अतिथींना ते शोधत असलेली गोष्ट सहजरीत्या मिळण्यात मदत होत असल्याची खात्री करा. टिपांसाठी AdSense ब्लॉगवरील ही पोस्ट पहा: ३ पायऱ्यांमध्ये तुमच्या वेबसाइट वापरकर्ता अनुभवाची गुणवत्ता वाढवणे.
- तुमच्या अतिथींसाठी एखादा टिप्पणी विभाग पुरवण्याचा विचार करा. तुमची साइट कालांतराने आणखी लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा ती ज्यांनी वापरली आहे आणि तुमचा आशय वाचला आहे अशा वापरकर्त्यांच्या फीडबॅकमुळे साइटमध्ये सुधारणा करण्यात खूप मदत होऊ शकते.
तुमच्या पेजवर स्पष्ट, वापरण्यासाठी सोपे नेव्हिगेशन आहे का?
ॲक्सेस करण्यायोग्य, वापरण्यास सोपे नेव्हिगेशन बार (किंवा मेनू बार) हा सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव पुरवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमचा नेव्हिगेशन बार तयार कराल तेव्हा पुढील गोष्टी विचारात घ्या:
- अलाइनमेंट - सर्व घटक योग्य पद्धतीने अलाइन केले आहेत का?
- वाचनीयता - मजकूर वाचण्यासाठी सोपा आहे का?
- कार्यक्षमता - तुमच्या ड्रॉप-डाउन सूची योग्य पद्धतीने काम करत आहेत का?
उदाहरणे:
तुमच्या साइटनुसार तुमचा नेव्हिगेशन बार पुढीलपैकी एका प्रकारचा दिसू शकतो:
शेवटी तुमच्या साइटशी कसा संवाद साधावा हे झटपट समजण्यासाठी तुमच्या नेव्हिगेशन बारमुळे वापरकर्त्यांना झटपट मदत मिळणे आवश्यक आहे.
वापरकर्ता अनुभवासंबंधित आमच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी अधिक जाणून घ्या, ज्यासाठी वापरकर्त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी स्पष्ट रचना वापरणे हे वाचा.
तुमच्या पेजवर युनिक आणि स्वारस्यपूर्ण आशय आहे का?
सशक्त आणि निष्ठावान वापरकर्ता वर्ग तयार करण्यासाठी मौल्यवान व मूळ आशय असणे महत्त्वाचे आहे. वापरकर्त्यांना तुमचा आशय आवडतो, तेव्हा ते तो अनुभव इतरांसोबत शेअर करतात आणि यामुळे तुमच्या साइटची प्रगती करण्यात तुम्हाला मदत होते.
तुम्ही इतर साइटवरील लेख किंवा एंबेड केलेले व्हिडिओ यांसारखे बाह्य स्रोत वापरता, तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ञांसाठीचे ज्ञान, सुधारणांसंबंधित कल्पना, परीक्षणे किंवा तुमचे वैयक्तिक विचार या गोष्टींपैकी कोणत्याही पद्धतीने असले, तरीही तुम्ही तुमच्या मूळ आशयाचे योगदान देणे महत्त्वाचे आहे.
Google प्रकाशक धोरणे यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे Google जाहिराती या स्क्रॅप किंवा कॉपीराइट केलेला आशय असलेल्या साइटवर दाखवल्या जाऊ शकत नाहीत. हे धोरण उल्लंघन आहे आणि त्यामुळे तुमच्या जाहिराती किंवा तुमचे खाते बंद केले जाऊ शकते.
तुमच्या साइटसाठीच्या आणखी चांगल्या पद्धती जाणून घ्या, ज्याकरिता Google वेब शोधासाठी स्पॅम धोरणे पहा.
AdSense वापरण्यासाठी तयार आहात का?
तुम्ही या प्रश्नांना दिलेल्या तुमच्या उत्तरांबाबत समाधानी असाल, तेव्हा AdSense मध्ये साइन अप करणे हे करू शकता.