सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

अहवाल

दर्शनीयता आणि ॲक्टिव्ह व्ह्यू

आमच्या भागीदारांना त्यांच्या साइटची दर्शनीयता समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवण्याकरिता आमच्या सर्व जाहिरात उत्पादनांवर आम्ही अ‍ॅक्टिव्ह व्ह्यू मेट्रिकचा समावेश करण्यासाठी काम करत आहोत. पाहण्यायोग्य इंप्रेशन म्हणजे काय, त्यांचे तुमच्या साइटसाठी काय महत्त्व असते हे समजून घेण्यात आणि तुमच्या साइटने जनरेट केलेल्या पाहण्यायोग्य इंप्रेशनच्या संख्येमध्ये सुधारणा करण्यासाठी काही सूचना पुरवण्यात हा लेख तुम्हाला मदत करेल.

पाहण्यायोग्य इंप्रेशन आणि दर्शनीयता म्हणजे काय?

ॲक्टिव्ह व्ह्यू म्हणजे Google चे जाहिरात दर्शनीयता मापन निराकरण. हे AdSense ने दाखवलेल्या जाहिरातींची दर्शनीयता ट्रॅक करते: म्हणजेच, मापन केलेल्या जाहिरातींच्या एकूण संख्येपैकी पाहण्यायोग्य समजल्या जाणार्‍या जाहिरातींची टक्केवारी.

इंप्रेशन वापरकर्त्याच्या ब्राउझरमध्ये दिसल्यावर आणि त्याला पाहिले जाण्याची संधी मिळाल्यावर ते दर्शनीय इंप्रेशन समजले जाते. दर्शनीय इंप्रेशनची व्याख्या आपण पुढील निकषाची पूर्तता करणारी जाहिरात अशी करतो: जाहिरातीचे ५०% पिक्सेल किमान एका सलग सेकंदासाठी स्क्रीनवर असणे आवश्यक आहे. अ‍ॅक्टिव्ह व्ह्यू अहवाल प्रकाशकांना त्यांच्या साइटने किती दर्शनीय इंप्रेशन जनरेट केली आहेत याबाबत माहिती देण्यासाठी मापन डेटा पुरवतो. प्रकाशक त्यांच्या साइटची दर्शनीयता समजून घेण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हा डेटा वापरू शकतात. 

माझ्यासाठी दर्शनीयता महत्त्वाची का आहे?

प्रकाशकांच्या डिस्प्ले इन्व्हेंटरीचे दीर्घकालीन मूल्य वाढवण्यात दर्शनीयता डेटा त्यांना मदत करू शकतो. जाहिरातदार ठरावीक जाहिरात युनिटची दर्शनीयता पाहू शकतात आणि त्यांच्या दर्शनीयता रेटच्या आधारावर बोली लावण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. जाहिरातदार अधिकाधिक प्रमाणावर दर्शनीय इंप्रेशन खरेदी करण्याबाबत विचारत आहेत आणि सर्वाधिक दर्शनीय इन्व्हेंटरी या ट्रेंडवरून आणखी कमाई करण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत असेल. तुमच्या साइटवरील दर्शनीय इंप्रेशनची संख्या सर्वाधिक केल्याने, अतिरिक्त इन्व्हेंटरी Google Display Network वर दर्शनीय इंप्रेशन खरेदी करणार्‍या ब्रँड जाहिरातदारांसाठी पात्र ठरेल

तुमची जाहिरात दर्शनीयता कशी वाढवायची?

तुम्ही दर्शनीयता आकडेवारीशी परिचित झाल्यावर, परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही तीन बदल करू शकता:

आकर्षक आशय तयार करा

दर्शकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक आशय तयार करण्यावर भर द्या. हे साइटच्या यशाचे गमक असते. आम्ही संशोधन केले आणि आम्हाला असे आढळले की, दर्शकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या गेम, कला व मनोरंजन आणि खरेदी यांसारख्या आशय वर्गवार्‍यांना अधिक दर्शनीयता असते आणि या आशय वर्गवार्‍यांमधील जाहिरातींमध्ये जास्त स्वारस्य असते असे त्या सुचवतात.
आमच्या जाहिरात दर्शनीयतेच्या स्थितीचा अहवाल यामध्ये अधिक जाणून घ्या. तुमचा स्वतःचा आशय तयार करताना तुम्ही हे निष्कर्ष विचारात घ्यावेत अशी आम्ही शिफारस करतो. 

सत्वर प्रतिसाद जाहिरात युनिट वापरा 

सत्वर प्रतिसाद जाहिरात युनिट ज्या स्क्रीन/डिव्हाइसवर पाहिली जातात त्यांच्या प्रॉपर्टीनुसार कमाल जाहिरात परफॉर्मन्स देण्यासाठी ऑप्टिमाइझ केली जातात. सत्वर प्रतिसाद जाहिराती पाहण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट ब्राउझरमध्ये त्या योग्य प्रकारे बसतील अशा प्रकारे वापरा. तुमचा आशय आणि जाहिराती पाहण्यासाठी ते कोणते डिव्हाइस (मोबाइल, टॅबलेट किंवा डेस्कटॉप) वापरतात हे लक्षात न घेता, हे चांगला वापरकर्ता अनुभव पुरवते. सत्वर प्रतिसाद जाहिराती याबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही जास्त पाहण्यायोग्य जाहिरात युनिट वापरण्याचा प्रयत्नदेखील करू शकता: जाहिरातीचा फॉरमॅट विन्येट आणि अँकर. 

जाहिरातींच्या जागा बदला

तुमच्या जाहिरात युनिटच्या जागेचा पुन्हा विचार केल्यामुळेदेखील तुमच्या दर्शनीयता रेटमध्ये सुधारणा करण्यात मदत होऊ शकते. जाहिराती पाहिल्या जाण्याची जास्त संधी असेल अशा जागी त्या ठेवा.
प्रथम, तुमच्या साइटवर दर्शक वेळ कुठे घालवतात ते लक्षात घ्या आणि त्या विभागांमध्ये जाहिराती ठेवा.
सर्वाधिक दर्शनीय जाहिरातीची जागा ही प्रत्यक्षात घडीच्या अगदी वर असते, पेजच्या सर्वात वर नसते, त्यामुळे तुमच्या वापरकर्त्याचे वर्तन समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या. त्याचप्रमाणे घडीच्या खालील जाहिरातींची शक्यता फेटाळू नका. घडीच्या खाली ४७% डिस्प्ले जाहिराती दर्शनीय असतात.
दुसरे, ठरावीक पेजवर दर्शक त्यांचा वेळ कुठे घालवत आहेत हे ओळखणे आणि त्या स्थानांमध्ये जाहिरात युनिट ठेवणे विचारात घ्या.
याची चाचणी घेण्यासाठी, दर्शनीयता रेट बदलतो का हे समजून घेण्याकरिता तुम्ही तुमच्या पेजवर जाहिरात युनिट आणखी वर हलवूनदेखील पाहू शकता. कृपया लक्षात घ्या की, वैयक्तिक जाहिरात युनिट तत्त्वावर केलेले बदल त्या पेजवरील इतर जाहिरात युनिटवर परिणाम करत असल्यास, ते बदल एकंदरीत नकारात्मक असू शकतात. तुमच्या साइटवर काय सर्वोत्तम काम करते याबाबत काळजीपूर्वक प्रयोग करा.
तुमच्या अ‍ॅक्टिव्ह व्ह्यू संख्येवर बारकाईने लक्ष दिल्याने, तुमच्या अतिथींनी ज्या जाहिराती पहाव्यात असे तुम्हाला वाटते त्या लक्ष्यित जाहिरातींवर त्यांना आणण्यात मदत होईल आणि दर्शनीय नसलेल्या जाहिरातींबाबतची अनिश्चितता दूर होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही दर्शनीयता सर्वोत्तम पद्धती पाहू शकता. 

ॲक्टिव्ह व्ह्यू आणि दर्शनीयता यांबद्दल अधिक जाणून घ्या

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18104116719138906721
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false