तुमच्या खात्यामधील अ‍ॅक्टिव्हिटी पाहणे आणि ती नियंत्रित करणे

तुम्ही Google साइट, ॲप्स आणि सेवा वापरता तेव्हा, तुमची काही अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाते. तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये ही अ‍ॅक्टिव्हिटी पाहू व हटवू शकता आणि तुम्ही बहुतांश अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करणे कधीही थांबवू शकता.

माझी अ‍ॅक्टिव्हिटी याविषयी

माझी अ‍ॅक्टिव्हिटी हे तुम्ही केलेले शोध, तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट आणि तुम्ही पाहिलेले व्हिडिओ यांसारखी ॲक्टिव्हिटी पाहण्याचे आणि व्यवस्थापित करण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

अ‍ॅक्टिव्हिटी कशी काम करते

तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी, Search, YouTube किंवा Chrome यांसारख्या विशिष्ट Google सेवांवरील तुमची ॲक्टिव्हिटी ही तुमच्या खात्यामध्ये डेटा म्हणून सेव्ह केली जाऊ शकते. ही अ‍ॅक्टिव्हिटी Google वरील तुमचा अनुभव जलद आणि आणखी उपयुक्त बनवण्यात मदत करते.

माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये दिसणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये स्थानासारखी संबंधित माहिती समाविष्ट असू शकते आणि तुम्ही कोणती Google उत्पादने वापरता व कोणती अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल सुरू केली आहेत यावर ती अवलंबून असू शकते.

तुमच्या खात्यामध्ये अ‍ॅक्टिव्हिटी केव्हा सेव्ह केली जाते

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असते तेव्हा, अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह केली जाते.

तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेली बहुतांश अ‍ॅक्टिव्हिटी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल नियंत्रित करतात.

अ‍ॅक्टिव्हिटी शोधा आणि पहा

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ही सर्वात अलीकडील यानुसार स्वतंत्र आयटम म्हणून सूचीबद्ध केली आहे.

अ‍ॅक्टिव्हिटी शोधणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडील नेव्हिगेशन पॅनलवर, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" अंतर्गत, माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर क्लिक करा.
  4. तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ॲक्सेस करण्यासाठी:
    • दिवस आणि वेळेनुसार संगतवार लावलेली तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ब्राउझ करा.
    • विशिष्ट अ‍ॅक्टिव्हिटी शोधण्यासाठी, सर्वात वरती असलेला शोध बार आणि फिल्टर वापरा.

अ‍ॅक्टिव्हिटीविषयी तपशील मिळवणे

एखाद्या आयटमचे तपशील पाहण्यासाठी: आयटमच्या तळाशी, तपशील निवडा. तुम्हाला अ‍ॅक्टिव्हिटीची तारीख आणि वेळ व ती का सेव्ह केली होती ते दिसेल. तुम्हाला स्थान, डिव्हाइस आणि अ‍ॅपशी संबंधित माहितीदेखील मिळू शकते.

अ‍ॅक्टिव्हिटी हटवा

माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये मागील शोध, ब्राउझिंग इतिहास आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी हटवणे हे कसे करावे ते जाणून घ्या. तुम्ही जुन्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी ऑटोमॅटिक हटवणे सेट करणे हेदेखील करू शकता.

माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर तुमचा पूर्ण इतिहास पाहण्यासाठी अतिरिक्त पायरी आवश्यक करा

शेअर केलेल्या डिव्हाइसवर तुमची गोपनीयता मजबूत करण्यासाठी, तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर तुमचा पूर्ण इतिहास पाहण्याकरिता अतिरिक्त पडताळणी पायरी आवश्यक करणे निवडू शकता.

  1. activity.google.com वर जा.
  2. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या वर, माझी अ‍ॅक्टिव्हिटी पडताळणी व्यवस्थापित करा हे निवडा.
  3. अतिरिक्त पडताळणी सुरू किंवा बंद करा.

अ‍ॅक्टिव्हिटी बंद करणे आणि हटवणे

तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये बहुतांश माहिती नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडे, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, तुम्हाला सेव्ह करायच्या नसलेल्या ॲक्टिव्हिटी किंवा इतिहास सेटिंग्जवर क्लिक करा.
  4. तुम्हाला सेव्ह करायचे नसलेले सेटिंग या अंतर्गत, बंद करा निवडा.
  5. सेटिंग बंद करण्यासाठी किंवा बंद करा अथवा अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा आणि हटवा हा पर्याय निवडण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.
    • तुम्ही अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा आणि हटवा हा पर्याय निवडल्यास, तुम्हाला कोणती अ‍ॅक्टिव्हिटी हटवायची आहे ती निवडण्यासाठी आणि कंफर्म करण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.

टीप: काही ॲक्टिव्हिटीचा माझी ॲक्टिव्हिटी मध्ये समावेश केला जात नाही.

ॲक्टिव्हिटी तात्पुरती सेव्ह करणे थांबवणे

तुम्ही वेबवर खाजगीरीत्या शोधणे आणि ब्राउझ करणे हे करू शकता.

टीप: तुम्ही खाजगी ब्राउझिंग विंडोमधून तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केल्यास, तुमची शोध ॲक्टिव्हिटी त्या खात्यामध्ये स्टोअर केली जाऊ शकते.

समस्यांचे निराकरण करणे

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी दिसत नाही

माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये तुमचे शोध, तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटी दिसत नसल्यास, पुढील गोष्टींची खात्री करा:

  • तुम्ही साइन इन केलेले आहे. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असतानाच अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह केली जाते.
  • तुमचे डिव्हाइस ऑनलाइन आहे. तुमचे डिव्हाइस जोपर्यंत इंटरनेटशी कनेक्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही ऑफलाइन अ‍ॅक्टिव्हिटी माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये दिसणार नाही.
  • योग्य सेटिंग्ज सुरू केलेली आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या प्रकारची अ‍ॅक्टिव्हिटी तुम्ही सेव्ह करत असल्याची खात्री करण्यासाठी, तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल याचे पुनरावलोकन करा.
  • तुम्ही फक्त एका खात्यामध्ये साइन इन केले आहे. एकाच वेळी एकाच ब्राउझर किंवा डिव्हाइसवर एकाहून अधिक खात्यांमध्ये साइन इन केले असल्यास, तुमची अ‍ॅक्टिव्हिटी डीफॉल्ट खात्यावर सेव्ह केली जाऊ शकते.

टीप: काही Google सेवा तुमच्या खात्यामध्ये अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करण्याला सपोर्ट करत नाहीत.

तुम्ही ओळखत नसलेली अ‍ॅक्टिव्हिटी तुम्हाला दिसते

तुम्हाला माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटीचे हे प्रकार दिसू शकतात.

Google सेवा वापरणाऱ्या वेबसाइट आणि अ‍ॅप्सवरील अ‍ॅक्टिव्हिटी

काही वेबसाइट आणि अ‍ॅप्स Search, Maps किंवा Ads यांसारख्या Google सेवा वापरतात. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असताना या वेबसाइट आणि अ‍ॅप्सना भेट दिल्यास, तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये दिसू शकते. तुम्ही शेअर केलेले डिव्हाइस वापरत असल्यास किंवा एकाहून अधिक खाती वापरून साइन इन करत असल्यास, तुम्हाला दुसर्‍या साइन इन केलेल्या खात्यामधील अ‍ॅक्टिव्हिटी दिसू शकते.

काही वेबसाइट आणि अ‍ॅप्स ठरावीक अ‍ॅक्टिव्हिटी Google सोबत शेअर करू शकतात.

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी याविषयी अधिक जाणून घ्या.

पूर्वानुमान केलेली अ‍ॅक्टिव्हिटी

काही वेळा Google हे तुम्हाला पुढे काय पाहायचे आहे याचा अंदाज लावते आणि तुम्हाला हा आशय दाखवते.

  • उदाहरणार्थ, YouTube ऑटोप्ले सुरू केले असल्यास, तुम्ही काय पाहिले आहे त्याच्या आधारे माझी अ‍ॅक्टिव्हिटी आपोआप प्ले केले गेलेले व्हिडिओ दाखवू शकते.

इतर अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटी

पुढील बाबतीत तुम्हाला अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटी आढळू शकते:

  • तुम्ही एकाच वेळी एकाच ब्राउझर किंवा डिव्हाइसवरील एकाहून अधिक खात्यांमध्ये साइन इन केले आहे.
    • दुसर्‍या साइन इन केलेल्या खात्यामधील अ‍ॅक्टिव्हिटी ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये सेव्ह केलेली असू शकते.
  • तुम्हाला करायचे नव्हते असे अ‍ॅक्टिव्हेशन आढळले आहे आणि Google Assistant ने ते डिटेक्ट केले.
  • तुम्ही सार्वजनिक काँप्युटरसारख्या एखाद्या शेअर केलेल्या डिव्हाइसमधून साइन आउट केले नाही.
  • तुमचे डिव्हाइस वेगळ्या तारीख आणि वेळेवर सेट केले आहे.
    • या डिव्हाइसवरील अ‍ॅक्टिव्हिटी चुकीच्या तारखेसह दिसू शकेल.
  • एखाद्या व्यक्तीने तुमच्या परवानगीशिवाय तुमचे खाते ॲक्सेस केले आहे.

तुमच्या खात्यावरील अ‍ॅक्टिव्हिटी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने केली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचे खाते सुरक्षित ठेवणे यात मदत करण्यासाठी पावले उचला.

इतर अ‍ॅक्टिव्हिटी पाहणे

तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेला सर्व डेटा माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये दाखवला जात नाही. उदाहरणार्थ, तुम्ही स्थान इतिहास सुरू केला असल्यास, तो डेटा त्याऐवजी तुमच्या Maps टाइमलाइन वर सेव्ह केला जातो.

तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेली इतर प्रकारची अ‍ॅक्टिव्हिटी शोधण्यासाठी:

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडे, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" वर, माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर क्लिक करा.
  4. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या वरती, शोध बारमध्ये आणखी आणखी आणि त्यानंतर इतर Google अ‍ॅक्टिव्हिटी वर क्लिक करा.
  5. तुम्हाला पाहायच्या असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीखाली, तुमचा पर्याय निवडा.

आम्ही कोणती माहिती गोळा करतो आणि का याविषयी अधिक जाणून घ्या.

इतर खाते माहिती पाहण्यासाठी आणि ती नियंत्रित करण्यासाठी, तुमचे Google खाते उघडा.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
182922529001231258
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false