Google तुम्हाला केव्हा एसएमएस पाठवू शकते

Google कडून तुम्हाला एसएमएस मिळण्याची काही कारणे खाली दिली आहेत.

तुम्ही तुमचे खाते ॲक्सेस करू शकत नाही आणि तुम्हाला पासवर्ड रीसेट करायचा आहे

तुम्ही तुमच्या खात्यामध्ये रिकव्हरी फोन जोडला असल्यास, Google तुम्हाला एसएमएसद्वारे कोड पाठवू शकते. हा कोड तुमचा पासवर्ड रीसेट करण्यात आणि खाते पुन्हा ॲक्सेस करण्यात मदत करू शकतो. तुमच्या फोनचा वापर रिकव्हरी पर्याय म्हणून करणे याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही २-टप्पी पडताळणी यासाठी साइन अप केले आहे

तुम्ही २-टप्पी पडताळणी वापरल्यास, साइन इन करता तेव्हा, तुम्ही एसएमएसद्वारे पडताळणी कोड मिळवणे निवडले आहे. हा कोड तुमच्या खात्यामध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडतो. २-टप्पी पडताळणी याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही खाते तयार करत आहात आणि आम्हाला तुम्ही रोबोट नसल्याची खात्री करायची आहे

तुम्ही Google खाते तयार करत असल्यास, आम्ही तुमच्या फोनवर जो पडताळणी कोड पाठवतो तो एंटर करण्यास सांगू शकतो. तुमच्या खात्याची एसएमएसद्वारे पडताळणी करणे याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही साइन इन करत आहात आणि हे खरोखरच तुम्हीच आहात याची आम्हाला खात्री करायची आहे

आम्ही काही वेळा तुम्हाला अतिरिक्त साइन इन पायरी पूर्ण करण्यास सांगतो, जसे की जर:

  • तुम्ही अशा ठिकाणावरून साइन इन केले जिथून तुम्ही नेहमी करत नाही.
  • तुम्ही यापूर्वी वापरले नव्हते असे डिव्हाइस वापरले.

अतिरिक्त पायरीमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या फोनवर एसएमएसद्वारे पाठवतो तो पडताळणी कोड एंटर करणे याचा समावेश असू शकतो. नेहमीपेक्षा वेगळी साइन इन याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या खात्यामध्ये बदल केले आहेत

तुमच्या खात्यावर सुरक्षेशी संबंधित कृती केल्यावर तुम्हाला ईमेल मिळेल (उदाहरणार्थ, पासवर्ड बदल). तसेच, तुम्हाला एसएमएसद्वारेही या सूचना मिळू शकतात. सुरक्षेशी संबंधित सूचना यांबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्हाला एसएमएसद्वारे एक कोड मिळाला आहे, ज्याची तुम्ही विनंती केली नव्हती

तुम्ही तुम्हाला एसएमएसद्वारे मिळालेल्या कोडकडे दुर्लक्ष करू शकता आणि तो हटवू शकता. मिळालेला कोणताही कोड कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमचे Google खाते सुरक्षित ठेवण्याच्या संदर्भातील पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी आणि मार्गदर्शनासाठी, नियमितपणे सुरक्षा तपासणी करा.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14704961879401948980
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false