खाते अ‍ॅक्सेस असलेली डिव्हाइस पाहणे

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये ज्यावरून साइन इन केले आहे किंवा अलीकडे साइन इन केले होते असे कॉंप्युटर, फोन आणि इतर डिव्हाइस पाहू शकता. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तुमच्या खात्यामध्ये साइन इन केले नसल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही google.com/devices वर पाहू शकता.

डिव्हाइसचे पुनरावलोकन करणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डाव्या नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
  3. तुमची डिव्हाइस पॅनलवर, सर्व डिव्हाइस व्यवस्थापित करा निवडा.
  4. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये ज्यावरून सध्या साइन इन केले आहे किंवा मागील काही आठवड्यांमध्ये साइन इन केले आहे अशी डिव्हाइस तुम्हाला दिसतील. अधिक तपशिलांसाठी, डिव्हाइस किंवा सेशन निवडा.
  5. तुम्ही ज्या डिव्हाइस किंवा सेशनमधून साइन आउट केले आहे, त्यांवर “साइन आउट केले आहे” असे दाखवले जाईल.
  6. डिव्हाइसच्या एकाच प्रकारासाठी एकाहून अधिक सेशन दिसत असल्यास, ती सर्व एकाच डिव्हाइसवरील किंवा एकाहून अधिक डिव्हाइसवरील असू शकतात. त्यांच्या तपशिलांचे पुनरावलोकन करा आणि सर्व सेशन तुमच्या डिव्हाइसवरील आहेत की नाहीत याविषयी तुम्हाला खात्री नसल्यास, त्यांमधून साइन आउट करा.

सेशन म्हणजे काय?

काही बाबतींमध्ये तुम्हाला स्वतंत्र डिव्हाइसऐवजी सेशन दिसू शकतात. सेशन हा असा कालावधी असतो, ज्या दरम्यान तुम्ही एखाद्या डिव्हाइसवरील ब्राउझर, ॲप किंवा सेवेमधून आमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असते. एकाच डिव्‍हाइसवर एकाहून अधिक सेशन असणे ही सामान्य गोष्ट आहे. 

पुढील बाबतींमध्ये डिव्हाइसवर स्वतंत्र सेशन तयार केले जाऊ शकते:

  • तुम्ही नवीन डिव्हाइसवर साइन इन केल्यावर
  • ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही तुमचा पासवर्ड पुन्हा एंटर केल्यावर
  • तुम्ही नवीन ब्राउझर, अ‍ॅप किंवा सेवेमध्ये साइन इन केल्यावर
  • तुम्ही एखाद्या अ‍ॅपला तुमच्या खात्यामधील डेटाचा अ‍ॅक्सेस दिल्यावर
  • तुम्ही गुप्त विंडो किंवा खाजगी ब्राउझर विंडोमध्ये साइन इन केल्यावर

तुमच्या सुरक्षेसाठी, पेजवर प्रत्येक सेशन दाखवले जाईल, जेणेकरून तुम्ही त्याचे तपशील पाहू शकाल आणि ते तुमचे सेशन असल्याची तुम्हाला खात्री नसल्यास, त्यातून बाहेर पडू शकाल.

दाखवलेल्या वेळेचा अर्थ काय आहे

पेजवर सूचीबद्ध केलेल्या वेळा या डिव्हाइस किंवा सेशन आणि Google च्या सिस्टीम यांदरम्यान प्रत्येक स्थानावर शेवटचा संवाद कधी झाला हे दाखवतात.

या संवादामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • तुम्ही Google खाते किंवा Google अ‍ॅप्स वापरणे यांसारख्या वापरकर्ता कृती
  • एखादी सेवा आणि Google यांदरम्यान बॅकग्राउंडमध्ये होणारे ऑटोमॅटिक सिंकिंग

त्यामुळे, तुम्ही ते डिव्हाइस शेवटचे वापरले त्यापेक्षा अलीकडची वेळ तुम्हाला दिसू शकते.

तुम्ही आता वापरत नसलेल्या डिव्हाइसवरून साइन आउट करणे

तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, पुढील डिव्हाइसवरून साइन आउट करा:

  • हरवलेली किंवा तुम्ही आता वापरत नसलेली
  • तुमची नसलेली

महत्त्वाचे: तुम्ही एखादे डिव्हाइस ओळखत नसल्यास किंवा तुमच्या खात्यामध्ये अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटी असल्यास, तुमचे खाते सुरक्षित करणे यासाठी पायऱ्या फॉलो करा.

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डाव्या नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
  3. तुमची डिव्हाइस पॅनलवर, सर्व डिव्हाइस व्यवस्थापित करा निवडा.
  4. डिव्हाइस and then साइन आउट करा निवडा.
  5. एकाच डिव्हाइसच्या नावासह एकाहून अधिक सेशन दिसत असल्यास, ती सर्व एकाच डिव्हाइसवरील किंवा एकाहून अधिक डिव्हाइसवरील असू शकतात. एखाद्या डिव्हाइसवरून कोणताही खाते अ‍ॅक्सेस नसल्याची तुम्हाला खात्री करायची असल्यास, डिव्हाइसचे हे नाव असलेल्या सर्व सेशनमधून साइन आउट करा.

तुम्हाला अनोळखी डिव्हाइस दिसल्यास, तुमचे खाते सुरक्षित करणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डाव्या नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
  3. तुमची डिव्हाइस पॅनलवर, सर्व डिव्हाइस व्यवस्थापित करा निवडा.

तुमचे खाते दुसरी एखादी व्यक्ती वापरत आहे हे सूचित करणाऱ्या या गोष्टी तुम्ही पाहू शकता:

  • डिव्हाइस तुमच्या ओळखीचे नाही. पुढील गोष्टी असल्यास, ती अ‍ॅक्टिव्हिटी तुम्हीच केली आहे हे तुम्ही ओळखू शकणार नाही:
    • तुम्ही नवीन डिव्हाइस वापरायला सुरुवात केली.
    • तुम्ही लायब्ररी यांसारख्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचेतरी डिव्हाइस किंवा सार्वजनिक कॉंप्युटर वापरला. तुम्ही जवळ नसलेल्या सार्वजनिक डिव्हाइसवरून साइन आउट करणे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.
    • तुम्ही तुमचे डिव्हाइस अलीकडे फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केले. तरीही डिव्हाइस दिसेल.
  • तुम्ही सूचीबद्ध केलेल्या वेळी स्थानावर उपस्थित नव्हता. पुढील गोष्टी घडल्यास, तुम्ही नक्की कुठे होतात ते स्थान तुम्ही ओळखू शकणार नाही:
  • तुम्हाला ठरावीक दिवशी आणि वेळी तुमचे खाते वापरल्याचे लक्षात नाही. तुमच्याकडे Gmail किंवा Calendar यांसारखी तुमच्या Google खाते शी कनेक्ट केलेली अ‍ॅप्स असल्यास, तुम्हाला ठरावीक दिवस आणि वेळ आठवत नाही कारण तुम्हाला आठवत आहे त्यापेक्षा तो कालावधी अलीकडील असू शकतो.
  • तुम्ही सामान्यतः वापरत असलेल्या ब्राउझरव्यतिरिक्त (Chrome किंवा Safari यांसारखा) वेगळा ब्राउझर तुम्हाला दिसल्यास.

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11016147367989634652
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false