रिकव्हरी फोन नंबर किंवा ईमेल अ‍ॅड्रेस सेट करा

तुम्ही कधीही साइन इन करू शकत नसल्यास, तुम्हाला तुमच्या Google खाते मध्ये पुन्हा साइन इन करता येईल याची खात्री करण्यासाठी, रिकव्हरीसंबंधी माहिती जोडा.

रिकव्हरी पर्याय जोडणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या ऑफिस, शाळा किंवा इतर गटाचे खाते वापरत असल्यास, या पायऱ्या कदाचित काम करणार नाहीत. मदतीसाठी तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर याच्याशी संपर्क साधा.

रिकव्हरीसंबंधी माहिती तुम्हाला कशी मदत करते

रीकव्हरी फोन नंबर किंवा ईमेल अ‍ॅड्रेस पुढील बाबतीत तुमचा पासवर्ड रीसेट करण्यात मदत करतो:

  • तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास
  • तुमचे खाते दुसरी एखादी व्यक्ती वापरत असल्यास
  • तुम्ही दुसर्‍या कारणाने तुमच्या खात्याच्या बाहेर लॉक झाला असल्यास

टीप: तुम्ही तुमचा रिकव्हरी फोन किंवा ईमेल बदलल्यास, Google कदाचित अजूनही सात दिवसांसाठी तुमच्या मागील रिकव्हरी फोन नंबर किंवा ईमेल अ‍ॅड्रेसवर पडताळणी कोड पाठवू शकते. तुमच्या परवानगीशिवाय एखाद्या व्यक्तीने तुमचे खाते वापरण्यास सुरुवात केल्यास, यामुळे तुम्हाला झटपट तुमची सेटिंग्ज सुरक्षित करता येतात.

रिकव्हरी फोन नंबर जोडणे किंवा बदलणे

    1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
    2. सर्वात वर उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google खाते वर टॅप करा. तुम्ही Gmail वापरत नसल्यास, myaccount.google.com वर जा.
  1. सर्वात वर, सुरक्षा वर टॅप करा.
  2. "ते तुम्हीच असल्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही वापरू शकणाऱ्या पद्धती" या अंतर्गत, रिकव्हरी फोन वर टॅप करा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  3. येथून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • रिकव्हरी फोन जोडा.
    • तुमचा रिकव्हरी फोन बदला: तुमच्या नंबरच्या बाजूला, संपादित करा Edit वर टॅप करा.
    • तुमचा रिकव्हरी फोन हटवा: तुमच्या नंबरच्या बाजूला, हटवा Delete वर टॅप करा.
  4. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

टीप: तुम्ही तुमचा रिकव्हरी फोन नंबर हटवल्यास, तो तरीही इतर Google सेवांसाठी वापरला जाऊ शकतो. तुमचे फोन नंबर व्यवस्थापित करण्यासाठी, तुमच्या खात्यावर जाणे हे करा.

कोणता नंबर वापरायचा

पुढील गोष्टींची पूर्तता करणारा मोबाइल फोन वापरा:

  • एसएमएस मिळवण्याची सुविधा असलेला
  • फक्त तुमच्या मालकीचा असलेला
  • तुम्ही नियमितपणे वापरत असलेला आणि तुमच्यासोबत ठेवत असलेला

रिकव्हरी ईमेल अ‍ॅड्रेस जोडणे किंवा बदलणे

    1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
    2. सर्वात वर उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google खाते वर टॅप करा. तुम्ही Gmail वापरत नसल्यास, myaccount.google.com वर जा.
  1. सर्वात वर, सुरक्षा वर टॅप करा.
  2. "ते तुम्हीच असल्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही वापरू शकणाऱ्या पद्धती" या अंतर्गत, रिकव्हरी ईमेल वर टॅप करा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  3. येथून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • रिकव्हरी ईमेल जोडा.
    • तुमचा रिकव्हरी ईमेल बदला किंवा हटवा.
  4. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

कोणता ईमेल वापरायचा

पुढील गोष्टींची पूर्तता करणारा ईमेल अ‍ॅड्रेस वापरा:

  • तुम्ही नियमितपणे वापरत असलेला
  • तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्यासाठी वापरता त्यापेक्षा वेगळा असलेला

रिकव्हरी माहिती कशी वापरली जाते

रिकव्हरी माहिती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पुन्हा साइन इन करण्यात आणि तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करते.

रिकव्हरी फोन नंबर

तुमचा रिकव्हरी फोन नंबर पुढील काही गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो:

  • तुम्ही कधीही तुमच्या खात्याच्या बाहेर लॉक झाल्यास, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पुन्हा साइन इन करता येण्यासाठी कोड पाठवणे
  • एखाद्या व्यक्तीला तुमच्या परवानगीशिवाय तुमचे खाते वापरण्यापासून ब्लॉक करणे
  • खाते तुमचेच आहे हे सिद्ध करणे तुमच्यासाठी सोपे करणे
  • तुमच्या खात्यावर संशयास्पद ॲक्टिव्हिटी आढळल्यास, तुम्हाला कळवणे

तुमचा रिकव्हरी फोन नंबर आणि तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जोडलेला दुसरा फोन नंबर एकच असल्यास, तो इतर उद्देशांसाठी वापरला जाऊ शकतो. फोन नंबर कसे वापरले जातात त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

रिकव्हरी ईमेल ॲड्रेस

तुमचा रिकव्हरी ईमेल ॲड्रेस पुढील काही गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो:

  • तुम्ही ईमेल अ‍ॅड्रेस तयार केल्यानंतर तुमचे वापरकर्ता नाव कंफर्म करणे
  • तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास किंवा दुसऱ्या कारणामुळे साइन इन करू शकत नसल्यास, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये साइन इन करण्यात मदत करणे
  • तुमची स्टोरेज जागा संपत आली असल्यास, तुम्हाला कळवणे
  • तुमच्या खात्यावर संशयास्पद ॲक्टिव्हिटी आढळल्यास, तुम्हाला कळवणे

समस्यांचे निराकरण करणे

साइन इन करू शकत नाही

खाते रिकव्हरी पेज वर जा आणि प्रश्नांची शक्य तितकी योग्य उत्तरे द्या. या टिपा मदत करू शकतात.

पुढील परिस्थितीमध्ये, खाते रिकव्हरी पेज वापरा:

  • तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास.
  • कोणीतरी तुमचा पासवर्ड बदलल्यास.
  • कोणीतरी तुमचे खाते हटवल्यास.
  • तुम्ही दुसऱ्या कारणामुळे साइन इन करू शकत नसल्यास.

टीप: तुम्ही योग्य खात्यामध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्री करण्यासाठी, तुमचे वापरकर्ता नाव रिकव्हर करण्याचा प्रयत्न करणे हे करा.

रिकव्हरी माहिती बदलू शकत नाही

तुम्ही एखाद्या वेगळ्या पद्धतीने साइन इन करत असल्यास, तुमच्याकडे तुमची रिकव्हरी माहिती बदलण्याचा पर्याय नसू शकतो. तुम्ही पुढील प्रकारे पुन्हा प्रयत्न करू शकता:

  • तुम्ही साइन इन करण्यासाठी सामान्यतः वापरता त्या डिव्हाइसवरून.
  • तुम्ही सामान्यतः साइन इन करता त्या स्थानावरून.
  • पुढील आठवड्यात, तुम्ही सध्या वापरत असलेल्या डिव्हाइसवरून.
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9271211034712501878
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false