व्हॉइस शोध वापरून व्हिडिओ शोधणे

व्हिडिओ शोधण्यासाठी व्हॉइस शोध वापरा.

YouTube व्हॉइस शोधामधील ऑडिओ रेकॉर्डिंग व्यवस्थापित करा

महत्त्वाचे: इतर सेटिंग्जच्या आधारावर, ऑडिओ रेकॉर्डिंग इतर जागी सेव्ह केली जाऊ शकतात.

तुम्ही YouTube व्हॉइस शोध या Google सेवेशी बोलता, तेव्हा Google तुमच्या ऑडिओवर प्रक्रिया करण्यासाठी आणि तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी त्याची ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञाने वापरते.

YouTube ऑडिओ रेकॉर्डिंग सेटिंग हे तुमचा YouTube इतिहास वापरून तुमच्या YouTube व्हॉइस शोध संवादांमधील तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. खालील तपशिलांनुसार, Google च्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google तुमचा YouTube इतिहास वापरू शकते. तुम्ही सुरू करत नाही, तोपर्यंत हे ऑडिओ रेकॉर्डिंग सेटिंग बंद असते.

ऑडिओ रेकॉर्डिंग कशी वापरली जातात

तुम्ही तुमचा YouTube इतिहास वापरून ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करण्याचे निवडल्यास, Google त्याची ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञाने आणि YouTube व्हॉइस शोध यांसारख्या तो ऑडिओ वापरणाऱ्या Google सेवा विकसित करण्यासाठी व त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा ऑडिओ वापरते.

काही ऑडिओ तंत्रज्ञान सुधारणांसाठी, प्रशिक्षित परीक्षणकर्ते सेव्ह केलेले ऑडिओ सँपल ऐकतात, ट्रान्स्क्राइब करतात आणि त्यावर भाष्य करतात, जेणेकरून Google सेवा ऑडिओचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकतील. Google हे तुमची गोपनीयता संरक्षित करण्यासाठी पावले उचलते, ज्यामध्ये परीक्षणकर्ते ऑडिओचे विश्लेषण करत असताना तो ऑडिओ तुमच्या खात्यापासून वेगळा करणे याचा समावेश आहे.

व्हॉइस शोधाची सुरुवात करणे

  1. YouTube वर साइन इन करा.
  2. शोधा Search वर टॅप करा.
  3. माइक वर टॅप करा. रेकॉर्डिंग लगेच सुरू होते.
    • रेकॉर्डिंग समाप्त करण्यासाठी: पल्सिंग लाल मायक्रोफोनवर टॅप करा.
    • मागे जाण्यासाठी: काढून टाका काढून टाका वर टॅप करा.

मायक्रोफोनच्या परवानग्या बदलणे

तुम्ही याआधी मायक्रोफोनच्या परवानग्या नाकारल्या असल्यास, तुम्हाला तुमच्या फोन सेटिंग्जमधून मायक्रोफोनच्या परवानग्यांना अनुमती देण्याची विनंती मिळू शकते.

  1. iPhone किंवा iPad च्या सेटिंग्ज मेनूमधून, गोपनीयता सेटिंग्ज अ‍ॅक्सेस करा.
  2. मायक्रोफोन शोधा आणि YouTube साठी मायक्रोफोनची परवानगी सुरू करा.
  3. YouTube अ‍ॅपवर परत जा.

तुम्ही आता तुमचा आवाज वापरून शोधू शकता.

ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google खाते वर टॅप करा.
    • तुम्ही Gmail वापरत नसल्यास: तुमच्या ब्राउझरमध्ये, myaccount.google.com वर जा.
  3. डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, YouTube इतिहास वर टॅप करा.
  5. रेकॉर्डिंग सुरू किंवा बंद करण्यासाठी, "ऑडिओ रेकॉर्डिंग समाविष्ट करा" या चौकटीत खूण करा किंवा चौकटीतली खूण काढून टाका.

ऑडिओ रेकॉर्डिंग सेटिंग सुरू असते आणि तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असताना YouTube मधून व्हॉइस शोध अ‍ॅक्टिव्हेट करता, तेव्हा Google तुमचा YouTube इतिहास वापरून ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. तुम्ही YouTube वर शोधण्यासाठी Google Search किंवा Assistant वापरता, तेव्हा हे सेटिंग ऑडिओ सेव्ह करत नाही.

ऑडिओ रेकॉर्डिंग सेटिंग बंद असते आणि तुम्ही साइन इन केलेले असले, तरीही YouTube मधून व्हॉइस शोध अ‍ॅक्टिव्हेट करता, तेव्हा Google तुमचा YouTube इतिहास वापरून ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करणार नाही. तुम्ही Google सेवांशी बोलता, तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, Google तुमच्या ऑडिओवर प्रक्रिया करणे पुढे सुरू ठेवते.

YouTube व्हॉइस शोध ऑडिओ सेटिंगचा परिणाम Google Search आणि Assistant यांसारख्या तुमचा आवाज वापरून YouTube व्हिडिओ शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर Google सेवांनी सेव्ह केलेल्या किंवा व्यवस्थापित केलेल्या ऑडिओवर होत नाही. activity.google.com येथे तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वापरून Google Search, Assistant व Maps यांमधील ऑडिओ सेव्ह केला जातो की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग बंद केल्यास, याआधी सेव्ह केलेला ऑडिओ हटवला जात नाही. तुम्ही तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग कधीही हटवणे हे करू शकता.

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग शोधणे किंवा हटवणे

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग शोधा

महत्त्वाचे: तुम्हाला "ट्रान्स्क्रिप्ट उपलब्ध नाही" असा मेसेज मिळाल्यास, रेकॉर्डिंगमध्ये बॅकग्राउंडमधील आवाज खूपच असू शकतो.

तुमच्या Google खाते सेटिंग्जच्या आधारावर, ऑडिओ रेकॉर्डिंग इतर जागी सेव्ह केली जाऊ शकतात.

  1. Gmail ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google खाते वर टॅप करा.
    • तुम्ही Gmail वापरत नसल्यास: तुमच्या ब्राउझरमध्ये, myaccount.google.com वर जा.
  3. डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, YouTube इतिहास आणि त्यानंतर इतिहास व्यवस्थापित करा वर टॅप करा. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • तुमच्या मागील अ‍ॅक्टिव्हिटीच्या सूचीचे पुनरावलोकन करणे. ऑडिओ असलेल्या आयटममध्ये रेकॉर्डिंग आहे.
    • रेकॉर्डिंग प्ले करण्यासाठी: ऑडिओ च्या बाजूला, तपशील आणि त्यानंतर रेकॉर्डिंग पहा आणि त्यानंतर प्ले कराPlay वर टॅप करा.
टीप: आणखी सुरक्षितता जोडण्यासाठी, तुम्ही तुमचा पूर्ण इतिहास पाहण्याकरिता अतिरिक्त पडताळणी पायरी आवश्यक करणे हे करू शकता.

तुमचा YouTube इतिहास यामधून रेकॉर्डिंग हटवणे

एका वेळी एक आयटम हटवणे

  1. Gmail ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google खाते वर टॅप करा.
    • तुम्ही Gmail वापरत नसल्यास: तुमच्या ब्राउझरमध्ये, myaccount.google.com वर जा.
  3. डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, YouTube इतिहास आणि त्यानंतर इतिहास व्यवस्थापित करा वर टॅप करा.
    • तुम्हाला मागील अ‍ॅक्टिव्हिटीची सूची दिसेल.
    • ऑडिओ असलेल्या आयटममध्ये रेकॉर्डिंग आहे.
  5. तुम्हाला हटवायच्या असलेल्या आयटमच्या बाजूला, हटवा काढून टाका आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.

सर्व आयटम एकाच वेळी हटवणे

या पायऱ्यांमध्ये तुमचा YouTube इतिहास यामधील फक्त रेकॉर्डिंगचा समावेश असलेले नाही, तर सर्व आयटम हटवले जातात.

  1. Gmail ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google खाते वर टॅप करा.
    • तुम्ही Gmail वापरत नसल्यास: तुमच्या ब्राउझरमध्ये, myaccount.google.com वर जा.
  3. डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, YouTube इतिहास आणि त्यानंतर इतिहास व्यवस्थापित करा वर टॅप करा.
    • तुम्हाला मागील अ‍ॅक्टिव्हिटीची सूची दिसेल.
    • ऑडिओ असलेल्या आयटममध्ये रेकॉर्डिंग आहे.
  5. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या वरती, हटवा Down Arrow निवडा.
  6. सर्व वेळ निवडा.
  7. तुमची अ‍ॅक्टिव्हिटी हटवण्यासाठी, सूचना फॉलो करा.

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग आपोआप हटवणे

ऑटो-डिलीटच्या पर्यायामुळे तुमचा YouTube इतिहास यामधील फक्त ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश असलेले नाही, तर सर्व आयटम हटवले जातात.

  1. Gmail ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google खाते वर टॅप करा.
    • तुम्ही Gmail वापरत नसल्यास: तुमच्या ब्राउझरमध्ये, myaccount.google.com वर जा.
  3. डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, YouTube इतिहास आणि त्यानंतर ऑटो-डिलीट वर टॅप करा.
  5. तुमचा YouTube इतिहास यासाठी ऑटो-डिलीटचा पर्याय निवडा.
  6. पेक्षा जुनी अ‍ॅक्टिव्हिटी ऑटो-डिलीट करा वर टॅप करा.
  7. तुम्हाला तुमची अ‍ॅक्टिव्हिटी किती काळासाठी ठेवायची आहे ते निवडा.
  8. पुढील वर टॅप करा.
  9. कंफर्म करा वर टॅप करा.

विकास आणि सुधारणा यांसाठी यापुढे आवश्यक नसल्यास, Google आणखी लवकर ऑडिओ हटवू शकते. उदाहरणार्थ, काळानुसार काही भाषांसाठी कमी ऑडिओची गरज असू शकते.

ऑडिओ रेकॉर्डिंग व्यवस्थापित करणे

तुम्ही YouTube इतिहास वापरून सेव्ह केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग activity.google.com येथे, व्यवस्थापित करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • YouTube इतिहास सेटिंग या अंतर्गत, ऑडिओ रेकॉर्डिंग सेटिंग कधीही सुरू किंवा बंद करणे.
  • तुमचा ऑडिओ ऐकणे.
  • ऑटो-डिलीटचा पर्याय. निवडणे किंवा ऑडिओ मॅन्युअली हटवणे.
    • विकास आणि सुधारणा यांसाठी यापुढे आवश्यक नसल्यास, Google आणखी लवकर ऑडिओ हटवू शकते. उदाहरणार्थ, काळानुसार काही भाषांसाठी कमी ऑडिओची गरज असू शकते.
  • takeout.google.com येथून तुमचा ऑडिओ डाउनलोड करणे.

Google सेव्ह करते त्या इतर डेटाबद्दल आणि आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी डेटा का व कसा वापरला जातो याबद्दल तुम्ही policies.google.com येथे जाणून घेऊ शकता. तंत्रज्ञाने तुमची माहिती कशी सुरक्षित ठेवतात आणि आमच्या सर्व सेवांवर तुमची गोपनीयता व्यवस्थापित करण्याकरिता नियंत्रणे कशी मदत करतात या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करता येणाऱ्या इतर जागा

YouTube व्हॉइस शोध ऑडिओ सेटिंगचा परिणाम Google Search आणि Assistant यांसारख्या तुमचा आवाज वापरून YouTube व्हिडिओ शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर Google सेवांनीदेखील सेव्ह केलेल्या किंवा व्यवस्थापित केलेल्या ऑडिओवर होत नाही. activity.google.com येथे तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वापरून Google Search, Assistant व Maps यांमधील ऑडिओ सेव्ह केला जातो की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

या सेटिंगचा परिणाम तुमचे वैयक्तिक Voice Match रिफाइन करणे किंवा तुमच्या डिव्हाइसवरील ऑडिओ तंत्रज्ञाने इतर प्रकारे पर्सनलाइझ करणे यांसारख्या उद्देशांसाठी तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केलेल्या ऑडिओवरदेखील होत नाही.

फेडरेटेड लर्निंग किंवा इफेमेरल लर्निंग वापरून ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google इतर मशीन लर्निंग प्रक्रिया वापरू शकते ज्या या सेटिंगद्वारे नियंत्रित केल्या जात नाहीत. उदाहरणार्थ:

  • Gboard मध्ये सुधारणा करा सेटिंग सुरू असताना, प्रत्येकासाठी स्पीच रेकग्निशनमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, Gboard तुमच्या डिव्हाइसवर ऑडिओ सेव्ह करू शकते आणि त्यावर प्रक्रिया करू शकते. तुम्ही जे म्हणता ते सर्व्हरला पाठवत नाही. Gboard आणखी चांगले कसे बनते हे जाणून घ्या.
  • इफेमेरल लर्निंग वापरणाऱ्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google तुमच्या ऑडिओवर रीअल टाइममध्ये प्रक्रिया करू शकते आणि त्याचे विश्लेषण करू शकते. ही प्रक्रिया YouTube इतिहास वापरून तुमचा ऑडिओ सेव्ह करत नाही. yt.be/speechlearningmodels येथे अधिक जाणून घ्या .
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14773588636595894338
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false