पाहण्याचा इतिहास पाहणे, हटवणे किंवा सुरू अथवा बंद करणे

YouTube पाहण्याचा इतिहास तुम्ही अलीकडे पाहिलेले व्हिडिओ शोधणे सोपे करते आणि ते सुरू केल्यावर, आम्हाला संबंधित व्हिडिओ शिफारशी देण्याची अनुमती देते. तुम्ही तुमचा इतिहास हटवून किंवा बंद करून तुमचा पाहण्याचा इतिहास नियंत्रित करू शकता. तुम्ही तुमचा काही किंवा सर्व पाहण्याचा इतिहास हटवल्यास, YouTube भविष्यातील व्हिडिओ शिफारशी त्या आशयाच्या आधारावर दाखवणार नाही. इतिहास बंद असताना तुम्ही पाहत असलेले कोणतेही व्हिडिओ तुमच्या इतिहासामध्ये दिसणार नाहीत.

पाहण्याचा इतिहास पाहणे

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. 
  2. myactivity.google.com वर जा. 
  3. YouTube इतिहास वर क्लिक करा.
  4. तुम्ही पाहिलेले व्हिडिओ पाहण्यासाठी, इतिहास व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
टीप: साइन आउट केलेले असताना तुम्ही तुमचा पाहण्याचा इतिहास पाहू शकत नाही.

पाहण्याचा इतिहास हटवणे

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. 
  2. myactivity.google.com वर जा. 
  3. YouTube इतिहास वर क्लिक करा. 
  4. इतिहास व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला हटवायच्या असलेल्या व्हिडिओसाठी टाइमफ्रेम निवडण्याकरिता हटवा वर क्लिक करा.

तुम्ही थेट YouTube वरून इतिहास टॅबला भेट दिल्यास, तुम्हाला तुमचा पाहण्याचा इतिहास साफ करण्याची क्षमता म्हणूनदेखील हा पर्याय दिसू शकतो.

तुमच्याकडे पूर्वीचा कोणताही महत्त्वाचा पाहण्याचा इतिहास नसल्यास, YouTube होमपेजवरील शिफारशींसारख्या व्हिडिओ शिफारशी दाखवण्यासाठी तुमच्या पाहण्याच्या इतिहासावर अवलंबून असलेली YouTube वैशिष्ट्ये काढून टाकली जातात. उदाहरणार्थ, तुम्ही पूर्वी कोणतेही व्हिडिओ न पाहिलेले नवीन वापरकर्ता असल्यास किंवा तुमचा पाहण्याचा इतिहास साफ करणे आणि बंद करणे निवडले असल्यास, हे लागू होते.

पाहण्याचा इतिहास सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. 
  2. myactivity.google.com वर जा. 
  3. YouTube इतिहास वर क्लिक करा. 
  4. सुरू करा किंवा बंद करा वर क्लिक करा.

या पेजवर, तुमचा पाहण्याचा इतिहास सुरू असताना तुम्हाला त्यामध्ये कशाचा समावेश करायचा आहे हेदेखील तुम्ही निवडू शकता. पर्यायांच्या सूचीमधून निवडून, तुम्ही पुढील गोष्टी निवडू शकता:

टीप: तुम्ही YouTube वरून थेट इतिहास टॅबला भेट दिल्यास, तुमचा पाहण्याचा इतिहास थांबवण्याची क्षमता म्हणून सादर केलेला हा पर्यायदेखील तुम्हाला दिसेल.

पाहण्याच्या इतिहासामधून व्हिडिओ काढून टाकणे 

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. 
  2. myactivity.google.com वर जा. 
  3. YouTube इतिहास वर क्लिक करा. 
  4. इतिहास व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  5. तुम्ही काढून टाकायच्या असलेल्या व्हिडिओच्या बाजूला असलेल्या हटवा बटण वर क्लिक करा.
टीप: तुमचे डिव्हाइस ऑफलाइन असताना तुम्ही तुमच्या पाहण्याच्या इतिहासामधून कोणतेही व्हिडिओ काढून टाकल्यास, ते बदल होण्यासाठी काही तास लागू शकतात.

पाहण्याचा इतिहास शोधणे

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. 
  2. myactivity.google.com वर जा. 
  3. YouTube इतिहास वर क्लिक करा. 
  4. इतिहास व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  5. शोधा वर क्लिक करा.

तुमचा YouTube इतिहास आपोआप हटवणे

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  2. myactivity.google.com वर जा. 
  3. YouTube इतिहास वर क्लिक करा. 
  4. इतिहास व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  5. ऑटो-डिलीट वर क्लिक करा.
  6. तुमची प्राधान्य दिलेली वेळेची रेंज निवडा, त्यानंतर पुढील वर क्लिक करा.
  7. पूर्ण झाल्यानंतर कंफर्म करा वर क्लिक करा.

साइन आउट केले असताना थांबवणे आणि पाहण्याचा इतिहास साफ करणे 

तुम्ही साइन आउट केले असतानादेखील, त्या डिव्हाइसवर पाहता त्या व्हिडिओच्या आधारे YouTube तुमच्या शिफारशींमध्ये सुधारणा करते.

साइन आउट केले असताना तुमचा पाहण्याचा इतिहास बंद करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी:

  1. YouTube वर जा.
  2. इतिहास निवडा.
  3. सर्व पाहण्याचा इतिहास साफ करा किंवा पाहण्याचा इतिहास थांबवा निवडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7458038348095282856
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false