तुमच्या चॅनलचा किंवा व्हिडिओचा प्रेक्षकवर्ग सेट करणे

तुमचे स्थान कोणतेही असले, तरीही तुम्ही कायदेशीररीत्या Children’s Online Privacy Protection Act आणि/किंवा इतर कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही मुलांसाठी आशय तयार करत असल्यास, तुमचे व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेले आहेत हे तुम्ही आम्हाला सांगणे आवश्यक आहे.

YouTube निर्माणकर्ता म्हणून, तुम्हाला भविष्यातील आणि सध्याचे व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेले आहेत की नाहीत हे सेट करणे आवश्यक आहे. मुलांसाठी आशय तयार न करणाऱ्या निर्माणकर्त्यांनीही त्यांचा प्रेक्षकवर्ग सेट करणे आवश्यक आहे. यामुळे, आम्ही तुमच्या आशयावर योग्य वैशिष्ट्ये देऊ करत असल्याची खात्री करण्यात मदत होईल.

Important Update for All Creators: Complying with COPPA

याचे पालन करण्यात तुम्हाला मदत व्हावी, यासाठी YouTube Studio मध्ये मुलांसाठी तयार केलेले यासंबंधित प्रेक्षक सेटिंग्ज आहेत. तुम्ही तुमचा प्रेक्षकवर्ग पुढे दिल्यानुसार सेट करू शकता:

  • चॅनल पातळीवर, ज्यामुळे तुमचा भविष्यातील आणि सध्याचा सर्व आशय मुलांसाठी तयार केलेला किंवा केलेला नाही म्हणून सेट केला जाईल
  • किंवा व्हिडिओ पातळीवर. तुम्ही हा पर्याय निवडल्यास, तुम्हाला सध्याचा आणि भविष्यातील प्रत्येक व्हिडिओ हा मुलांसाठी तयार केलेला किंवा केलेला नाही म्हणून सेट करावा लागेल.

टीप:

  • आम्ही तृतीय पक्ष अ‍ॅप्लिकेशनसाठी आणि YouTube API सेवा यांसाठी प्रेक्षकवर्ग निवडीचे टूल लवकरच उपलब्ध करू. मुलांसाठी तयार केलेला आशय अपलोड करण्यासाठी सध्यापुरते कृपया YouTube Studio वापरा.

महत्त्वाचे: प्रत्येक निर्माणकर्त्याने त्याचा प्रेक्षकवर्ग का सेट केला पाहिजे

US Federal Trade Commission (FTC) आणि न्यूयॉर्क अटर्नी जनरल यांसोबतच्या सेटलमेंटचा भाग म्हणून हे बदल आवश्यक आहेत व तुम्हाला Children’s Online Privacy Protection Act (COPPA) आणि/किंवा लागू असलेल्या इतर कायद्यांचे पालन करण्यात ते मदत करतील. तुमचे स्थान कोणतेही असले, तरीही तुमचे व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेले आहेत की नाहीत हे तुम्ही आम्हाला सांगणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा प्रेक्षकवर्ग अचूकपणे सेट न केल्यास, FTC किंवा इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत पालन करण्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि आम्ही तुमच्या YouTube खात्यावर कारवाई करू शकतो. FTC ने केलेल्या COPPA च्या अंमलबजावणीबद्दल अधिक जाणून घ्या.

काही टिपा:
  • स्पष्टपणे अल्पवयीन प्रेक्षकांना उद्देशून असलेले व्हिडिओ ओळखण्यात आम्हाला मदत व्हावी, यासाठी आम्ही मशीन लर्निंग वापरतो. तुमचा प्रेक्षकवर्ग अचूकपणे सेट करण्याबाबत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण एरर किंवा गैरवापराच्या बाबतीत तुमची प्रेक्षक सेटिंगची निवड आम्ही ओव्हरराइड करू शकतो.
  • तुमचा प्रेक्षकवर्ग सेट करण्यासाठी आमच्या सिस्टीमवर अवलंबून राहू नका, कारण FTC किंवा इतर अधिकारी हे मुलांसाठी तयार केलेला असल्याचे मानत असलेला तुमचा आशय कदाचित आमच्या सिस्टीम ओळखणार नाहीत.
  • तुमचा आशय मुलांसाठी तयार केलेला आहे की नाही हे निर्धारित करण्यात तुम्हाला मदत हवी असल्यास, हा मदत केंद्र लेख पहा किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या.
  • “मुलांसाठी तयार केलेला” म्हणून तुम्ही सेट केलेल्या व्हिडिओची शिफारस ही मुलांकरिताच्या इतर व्हिडिओच्या बाजूला दिसण्याची शक्यता जास्त आहे.
  • तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी तुमचा प्रेक्षकवर्ग आधीच सेट केला असल्यास आणि YouTube ला एरर किंवा गैरवापर आढळल्यास, तुम्हाला तुमचा व्हिडिओ “मुलांसाठी तयार केलेला यावर सेट केला आहे" म्हणून सेट केलेला दिसेल. तुम्हाला तुमचे प्रेक्षक सेटिंग बदलता येणार नाही. आम्ही चुकलो आहोत असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन करणे हे करू शकता.

तुमच्या चॅनलचे प्रेक्षक सेट करणे

चॅनल सेटिंग निवडून तुमचा वर्कफ्लो सोपा करा. या सेटिंगचा परिणाम सध्याच्या आणि भविष्यातील व्हिडिओवर होईल.. तुम्ही चॅनल सेटिंग न निवडल्यास, तुम्हाला मुलांसाठी तयार केलेला तुमच्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ ओळखावा लागेल. स्वतंत्र व्हिडिओची सेटिंग्ज ही चॅनल सेटिंगला ओव्हरराइड करतील.
यामुळे तुमच्या चॅनलवरील ठरावीक वैशिष्ट्ये प्रतिबंधित करणे हेदेखील केले जाईल. तुमचे व्हिडिओ हे मुलांसाठी तयार केलेले आहेत की नाहीत याबाबत तुम्हाला खात्री नसल्यास, हा मदत केंद्र लेख पहा.
  1. studio.youtube.com मध्ये साइन इन करा (फक्त वेब स्टुडिओ).
  2. डावीकडील मेनूवर, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. चॅनल वर क्लिक करा.
  4. प्रगत सेटिंग्ज टॅबवर क्लिक करा. 
  5. प्रेक्षक या अंतर्गत, निवडा:
    1. “होय, हे चॅनल मुलांसाठी तयार केलेले म्हणून सेट करा. मी नेहमी मुलांसाठी तयार केलेला आशय अपलोड करतो/ते.” 
    2. “नाही, हे चॅनल मुलांसाठी तयार केलेले नाही म्हणून सेट करा. मी मुलांसाठी तयार केलेला आशय कधीही अपलोड करत नाही.”
    3. “मला प्रत्येक व्हिडिओसाठी या सेटिंगचे पुनरावलोकन करायचे आहे.” 
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमच्या व्हिडिओचे प्रेक्षक सेट करणे
तुम्ही स्वतंत्र व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेले म्हणून सेट करू शकता. तुमचे फक्त काही व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेले असल्यास, हा चांगला पर्याय आहे. तुमचा आशय हा मुलांसाठी तयार केलेला आहे की नाही याबाबत तुम्हाला खात्री नसल्यास, हा मदत केंद्र लेख पहा. 

अपलोडदरम्यान तुमचा प्रेक्षकवर्ग सेट करणे

  1. studio.youtube.com वर जा. टीप: तुमचे प्रेक्षक हे मुलांसाठी तयार केलेला यावर सेट करण्यासाठी, तुम्हाला YouTube Studio वापरावे लागेल. तुम्हाला Creator Studio Classic मध्ये तसे करता येणार नाही. 
  2. वरच्या उजवीकडील कोपऱ्यामध्ये, अपलोड करा आयकनवर क्लिक करा. 
  3. व्हिडिओ अपलोड करा (बीटा) वर क्लिक करा. तुम्हाला हे दिसत नसल्यास, व्हिडिओ अपलोड करा वर क्लिक करा.
  4. मूलभूत माहिती टॅबवर, प्रेक्षक वर स्क्रोल करा. 
  5. निवडा:
    • “होय, तो मुलांसाठी तयार केलेला आहे".
    • “नाही, तो मुलांसाठी तयार केलेला नाही"
  6. तुमचा आशय अपलोड करणे पुढे सुरू ठेवण्यासाठी, पुढील वर क्लिक करा. 

तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यावर, तुमच्या अपलोड सूची मध्ये त्याला “मुलांसाठी तयार केलेला - तुम्ही सेट केला आहे” असे लेबल लावले जाईल. 

सध्याच्या व्हिडिओवरील प्रेक्षक सेटिंग अपडेट करणे

YouTube ने आधीपासून काही व्हिडिओना “मुलांसाठी तयार केलेले” असे सेट केल्याचे तुम्हाला दिसू शकते. तुम्हाला अद्याप तुमचे व्हिडिओ किंवा चॅनल हे मुलांसाठी तयार केलेले आहे की नाही हे सेट करण्याची संधी मिळाली नसल्यास, तुम्हाला आता असे करता येईल:

  1. studio.youtube.com मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमधून, आशय निवडा.
  3. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या व्हिडिओच्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा. टीप: तुमच्या अपलोड सूचीच्या सर्वात वरती “व्हिडिओ” च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करून तुम्ही तुमचे सर्व व्हिडिओ निवडू शकता. 
  4. संपादित करा आणि त्यानंतर प्रेक्षक आणि त्यानंतर “होय, तो मुलांसाठी तयार केलेला आहे” निवडा.
  5. व्हिडिओ अपडेट करा निवडा.
काही टिपा: 
  • स्पष्टपणे अल्पवयीन प्रेक्षकांना उद्देशून असलेले व्हिडिओ ओळखण्यात आम्हाला मदत व्हावी, यासाठी आम्ही मशीन लर्निंग वापरतो. तुमचे प्रेक्षक अचूकपणे सेट करण्याबाबत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण एरर किंवा गैरवापराच्या बाबतीत तुमची प्रेक्षक सेटिंगची निवड आम्ही ओव्हरराइड करू शकतो. 
  • तुमचे प्रेक्षक सेट करण्यासाठी आमच्या सिस्टीमवर अवलंबून राहू नका, कारण आमच्या सिस्टीम कदाचित FTC किंवा इतर प्राधिकार हे मुलांसाठी तयार केलेला असल्याचे समजत असलेला तुमचा आशय ओळखणार नाहीत. 
  • तुमचा आशय मुलांसाठी तयार केलेला आहे की नाही हे निर्धारित करण्यात तुम्हाला मदत हवी असल्यास, हा मदत केंद्र लेख पहा किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या.
  • “मुलांसाठी तयार केलेला” म्हणून तुम्ही सेट केलेल्या व्हिडिओची शिफारस ही मुलांसाठीच्या इतर व्हिडिओच्या बाजूला दिसण्याची शक्यता जास्त आहे. 
  • तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी तुमचा प्रेक्षकवर्ग आधीच सेट केला असल्यास आणि YouTube ला एरर किंवा गैरवापर आढळल्यास, तुम्हाला तुमचा व्हिडिओ “मुलांसाठी तयार केलेला यावर सेट केला आहे" म्हणून सेट केलेला दिसेल. तुम्हाला तुमचे प्रेक्षक सेटिंग बदलता येणार नाही. आमच्याकडून चूक झाली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन करणे हे करू शकता.

तुमच्या लाइव्ह स्ट्रीमचे प्रेक्षक सेट करणे

लाइव्ह स्ट्रीम तयार करत असताना तुमचे प्रेक्षक सेट करणे

तुमचा आशय हा मुलांसाठी तयार केलेला आहे की नाही याबाबत तुम्हाला खात्री नसल्यास, हा मदत केंद्र लेख पहा. 

  1. studio.youtube.com वर जा.
  2. वरच्या उजवीकडील कोपऱ्यामध्ये, अपलोड करा आयकनवर क्लिक करा.
  3. लाइव्ह जा वर क्लिक करा. टीप: यावर क्लिक केल्याने तुम्हाला लाइव्ह कंट्रोल रूम वर पाठवले जाईल. आमची क्लासिक लाइव्ह स्ट्रीमिंग टूल वापरून तुम्हाला तुमच्या लाइव्ह स्ट्रीमचे प्रेक्षक सेट करता येणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला लाइव्ह कंट्रोल रूम वापरून तसे करावे लागेल.
  4. तुम्ही मूलभूत माहिती भरल्यानंतर आणि गोपनीयता सेटिंग निवडल्यानंतर, प्रेक्षक वर स्क्रोल करा. 
  5. निवडा:
    • “होय, तो मुलांसाठी तयार केलेला आहे”.
    • “नाही, तो मुलांसाठी तयार केलेला नाही”.
  6. तुमचे लाइव्ह स्ट्रीम सेट करणे सुरू ठेवण्यासाठी पुढील वर क्लिक करा.

संग्रहित केलेल्या लाइव्ह स्ट्रीमवरील प्रेक्षक सेटिंग अपडेट करणे

YouTube ने आधीपासून काही संग्रहित केलेली लाइव्ह स्ट्रीम “मुलांसाठी तयार केलेली” म्हणून सेट केल्याचे तुम्हाला आढळू शकते. तुम्हाला अद्याप तुमची संग्रहित केलेली लाइव्ह स्ट्रीम मुलांसाठी तयार केलेली आहेत किंवा नाहीत म्हणून सेट करण्याची संधी मिळाली नसल्यामुळे, तुम्ही आता हे करू शकाल:

  1. studio.youtube.com मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमधून, आशय निवडा.
  3. लाइव्ह टॅबवर क्लिक करा.
  4. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या व्हिडिओच्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा. टीप: सूचीच्या सर्वात वरती “लाइव्ह स्ट्रीम” च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करून तुम्ही तुमचे सर्व व्हिडिओ निवडू शकता. 
  5. तो मुलांसाठीचा आशय असल्यास, संपादित करा आणि त्यानंतर प्रेक्षक आणि त्यानंतर “होय, तो मुलांसाठी तयार केलेला आहे" निवडा. किंवा, तो मुलांसाठीचा आशय नसल्यास, “नाही, तो मुलांसाठी तयार केलेला नाही” निवडा.
  6. व्हिडिओ अपडेट करा निवडा.
काही टिपा
  • स्पष्टपणे अल्पवयीन प्रेक्षकांना उद्देशून असलेले व्हिडिओ ओळखण्यात आम्हाला मदत व्हावी, यासाठी आम्ही मशीन लर्निंग वापरतो. तुमचे प्रेक्षक अचूकपणे सेट करण्याबाबत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण एरर किंवा गैरवापराच्या बाबतीत तुमची प्रेक्षक सेटिंगची निवड आम्ही ओव्हरराइड करू शकतो. 
  • तुमचे प्रेक्षक सेट करण्यासाठी आमच्या सिस्टीमवर अवलंबून राहू नका, कारण आमच्या सिस्टीम कदाचित FTC किंवा इतर प्राधिकार हे मुलांसाठी तयार केलेला असल्याचे समजत असलेला तुमचा आशय ओळखणार नाहीत. 
  • तुमचा आशय मुलांसाठी तयार केलेला आहे की नाही हे निर्धारित करण्यात तुम्हाला मदत हवी असल्यास, हा मदत केंद्र लेख पहा किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या.
  • “मुलांसाठी तयार केलेला” म्हणून तुम्ही सेट केलेल्या व्हिडिओची शिफारस ही मुलांकरिताच्या इतर व्हिडिओच्या बाजूला दिसण्याची शक्यता जास्त आहे.
  • तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी तुमचा प्रेक्षकवर्ग आधीच सेट केला असल्यास आणि YouTube ला एरर किंवा गैरवापर आढळल्यास, तुम्हाला तुमचा व्हिडिओ “मुलांसाठी तयार केलेला यावर सेट केला आहे" म्हणून सेट केलेला दिसेल. तुम्हाला तुमचे प्रेक्षक सेटिंग बदलता येणार नाही. आमच्याकडून चूक झाली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन करणे हे करू शकता.

तुमचा आशय मुलांसाठी तयार केलेला म्हणून सेट केला गेल्यावर काय होते

कायद्याचे पालन करण्याकरिता, मुलांसाठी तयार केलेल्या आशयावरील डेटा संग्रह आणि वापर आम्ही मर्यादित करतो. याचा अर्थ असा आहे, की आम्ही टिप्पण्या, सूचना आणि यांसारखी इतर ठरावीक वैशिष्ट्ये प्रतिबंधित किंवा बंद करतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, Children’s Online Privacy Protection Act (COPPA) आणि/किंवा इतर लागू कायद्यांच्या आवश्यकतेनुसार, आम्ही मुलांच्या आशयावर पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवत नाही. मुलांसाठीच्या आशयावर पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती न दाखवल्याने, आशयावर मुलांसाठी तयार केलेला म्हणून मार्क करणाऱ्या काही निर्माणकर्त्यांच्या कमाईमध्ये घट होऊ शकते. आम्ही ओळखतो, की काही निर्माणकर्त्यांसाठी हे सोपे नसेल, पण COPPA आणि इतर लागू कायद्यांचे पालन करत असल्याची खात्री करण्याकरिता या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.

परिणाम झालेल्या वैशिष्ट्यांची सूची पाहण्यासाठी खाली वाचा:

तुम्ही व्हिडिओ किंवा लाइव्ह स्ट्रीम हे मुलांसाठी तयार केलेले म्हणून सेट केल्यास

तुम्ही तुमचा प्रेक्षकवर्ग “मुलांसाठी तयार केलेला” म्हणून सेट केल्यावर, Children’s Online Privacy Protection Act (COPPA) आणि इतर लागू कायद्यांचे पालन करण्याकरिता आम्ही ठरावीक वैशिष्ट्ये प्रतिबंधित करू. असे झाल्यावर, पुढील वैशिष्ट्ये स्वतंत्र व्हिडिओवर किंवा लाइव्ह स्ट्रीमवर उपलब्ध नसतील:

  • होमवर ऑटोप्‍ले करणे
  • कार्ड किंवा एंड स्क्रीन
  • व्हिडिओ वॉटरमार्क
  • चॅनल सदस्यत्वे
  • टिप्पण्या
  • देणगी द्या बटण
  • YouTube Music वरील लाइक आणि डिसलाइक
  • लाइव्ह चॅट किंवा लाइव्ह चॅट देणग्या
  • व्यापारी माल आणि तिकिटांसंबंधित वैशिष्ट्ये
  • नोटिफिकेशन बेल
  • पर्सनलाइझ केलेले जाहिरात तंत्र
  • मिनीप्लेअरमधील प्लेबॅक
  • सुपर चॅट किंवा सुपर स्टिकर्स
  • प्लेलिस्टमध्ये सेव्ह करणे आणि नंतर पहा मध्ये सेव्ह करणे
तुम्ही तुमचे चॅनल हे मुलांसाठी तयार केलेले म्हणून सेट केले असल्यास

तुमचे चॅनल मुलांसाठी तयार केलेले असल्यास, तुमच्या व्हिडिओ किंवा लाइव्ह स्ट्रीममध्ये वरीलपैकी कोणतीही वैशिष्ट्ये असणार नाहीत. तुमच्या चॅनलवर पुढील गोष्टीदेखील नसतील: 

  • चॅनल सदस्यत्वे
  • नोटिफिकेशन बेल
  • पोस्ट

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मुलांसाठी तयार केलेला म्हणून सेट केलेल्या आशयावरील सूचना, टिप्पण्या आणि इतर वैशिष्ट्ये बंद का केलेली असतात?

Children’s Online Privacy Protection Act आणि इतर लागू कायद्यांचे पालन करण्यासाठी, मुलांसाठी तयार केलेला म्हणून नियुक्त केलेल्या आशयावरील डेटा संग्रह आम्ही मर्यादित करतो. परिणामी, सूचना आणि टिप्पण्यांच्या समावेशासह या आशयावरील ठरावीक वैशिष्ट्ये प्रतिबंधित किंवा बंद केली जाऊ शकतात.

मी माझ्या व्हिडिओचा प्रेक्षकवर्ग चुकीचा सेट केल्यास काय होते?

US Federal Trade Commission (FTC) आणि न्यूयॉर्क अटर्नी जनरल यांसोबतच्या सेटलमेंटचा भाग म्हणून हे बदल आवश्यक आहेत व तुम्हाला Children’s Online Privacy Protection Act (COPPA) आणि/किंवा लागू असलेल्या इतर कायद्यांचे पालन करण्यात ते मदत करतील. तुमचे स्थान कोणतेही असले, तरीही तुमचे व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेले आहेत की नाहीत हे तुम्ही आम्हाला सांगणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे प्रेक्षक अचूकपणे सेट करता न आल्यास, FTC किंवा इतर प्राधिकारांच्या पालन करण्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि आम्ही तुमच्या YouTube खात्यावर कारवाई करू शकतो. FTC ने केलेल्या COPPA च्या अंमलबजावणीबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: स्पष्टपणे अल्पवयीन प्रेक्षकांना उद्देशून असलेले व्हिडिओ ओळखण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही मशीन लर्निंगदेखील वापरू. तुमचे प्रेक्षक अचूकपणे सेट करण्यासाठी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण एरर किंवा गैरवापराच्या बाबतीत तुमची प्रेक्षक सेटिंगची निवड आम्ही ओव्हरराइड करू शकतो. मात्र, तुमचे प्रेक्षक सेट करण्यासाठी आमच्या सिस्टीमवर अवलंबून राहू नका, कारण आमच्या सिस्टीम कदाचित FTC किंवा इतर प्राधिकार हे मुलांसाठी तयार केलेला असल्याचे समजत असलेला तुमचा आशय ओळखणार नाहीत. तुम्ही तुमचे प्रेक्षक हे मुलांसाठी तयार केलेला वर अचूकपणे सेट न केल्यास, तुम्हाला कायदेशीर कारवायांना किंवा YouTube वरील कारवायांना तोंड द्यावे लागू शकते. तुमचा आशय मुलांसाठी तयार केलेला आहे की नाही हे निर्धारित करण्याकरिता तुम्हाला मदत हवी असल्यास, हा मदत केंद्र लेख पहा किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या.

मी माझ्या व्हिडिओचा प्रेक्षकवर्ग योग्यरीत्या सेट केला आहे की नाही हे मला कसे कळते?

दुर्दैवाने, तुम्ही तुमचे प्रेक्षक मुलांसाठी तयार केलेले म्हणून अचूकपणे सेट केले आहेत की नाहीत याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू शकत नाही, पण FTC ने मुलांसाठी निर्देशित (किंवा "मुलांसाठी तयार केलेला") म्हणजे काय, याबद्दल काही मार्गदर्शन केले आहे. FTC सध्या COPPA च्या विविध अपडेटवर विचार करत आहे, ज्यामध्ये या समस्येवर अधिक मार्गदर्शन करण्याचा समावेश असू शकतो.

स्पष्टपणे मुलांसाठी तयार केलेला आशय शोधण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही मशीन लर्निंग सिस्टमदेखील वापरू. मात्र, तुमच्या वतीने आशय सेट करण्यासाठी कृपया आमच्या सिस्टीमवर अवलंबून राहू नका -- सर्व ऑटोमेटेड सिस्टीमप्रमाणे आमच्या सिस्टीमदेखील परिपूर्ण नाहीत. आम्‍हाला एरर किंवा गैरवापर आढळल्‍यास, त्या बाबतींमध्ये तुमच्या प्रेक्षक सेटिंगची निवड आम्हाला ओव्हरराइड करावी लागू शकते. मात्र बहुतांश बाबतींमध्ये, एखादा व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेला आहे की नाही हे निर्धारित करण्याकरिता आम्ही तुमच्या प्रेक्षक सेटिंगवर अवलंबून राहू.

तुम्ही तुमचे प्रेक्षक मुलांसाठी तयार केलेले वर सेट न केल्यास आणि त्यावर सेट करायला हवे होते असे FTC किंवा इतर प्राधिकारांना वाटल्यास, तुम्हाला कायदेशीर कारवायांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, हा मदत केंद्र लेख पहा किंवा तुमचा आशय मुलांसाठी तयार केलेला म्हणून सेट केलेला असावा की नाही याबद्दल तुम्हाला अजूनही खात्री नसल्यास, कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधा.

माझा व्हिडिओ हा मुलांसाठी तयार केलेला आहे असे YouTube ने म्हटल्यास, पण मी त्याच्याशी सहमत नसल्यास, काय करावे?

तुम्ही अद्याप तुमच्या व्हिडिओचा प्रेक्षकवर्ग सेट केला नसल्यास: YouTube ने कदाचित तुमच्या वतीने तुमचा प्रेक्षकवर्ग सेट केला असेल. हे तुम्हाला COPPA आणि/किंवा इतर लागू कायद्यांचे पालन करण्यात मदत करण्यासाठी आहे. तथापि, YouTube ने तुमचा आशय जसा सेट केला आहे, त्याच्याशी तुम्ही सहमत नसल्यास, तुम्ही तरीही बहुतांश बाबतींमध्ये व्हिडिओचे प्रेक्षक सेटिंग बदलू शकता.

तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी तुमचा प्रेक्षकवर्ग आधीच सेट केला असल्यास: आणि YouTube ला एरर किंवा गैरवापर आढळल्यास, तुम्हाला तुमचा व्हिडिओ “मुलांसाठी तयार केलेला यावर सेट केला आहे” म्हणून सेट केलेला दिसेल. असे झाल्यावर तुम्हाला तुमचे प्रेक्षक सेटिंग बदलता येणार नाही.

तथापि, आम्हाला समजते, की आम्ही काही वेळा चुका करतो. असे झाले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही या निर्णयावर आवाहन करू शकता.

 तुमच्या कॉंप्युटरवर आवाहन करण्यास सुरुवात करण्यासाठी:

  1. काँप्युटरवर, studio.youtube.com वर जा.
  2. डावीकडील मेनूमधून, आशय निवडा.
  3. तुम्हाला आवाहन करायच्या असलेल्या व्हिडिओवर जा.
  4. “मुलांसाठी तयार केलेला यावर सेट केला आहे” वर कर्सर फिरवा आणि आवाहन करा वर क्लिक करा.
  5. आवाहन करण्याचे तुमचे कारण एंटर करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.

तुमच्या फोनवर आवाहन करण्यास सुरुवात करण्यासाठी:

  1. YouTube Studio अ‍ॅप उघडा.
  2. मेनू आणि त्यानंतर व्हिडिओ वर टॅप करा.
  3. अपलोड टॅबमध्ये, तुम्हाला आवाहन करायच्या असलेल्या व्हिडिओवर टॅप करा.
  4. निर्बंध या अंतर्गत, मुलांसाठी तयार केलेला यावर सेट करा.
  5. आवाहन करा वर टॅप करा आणि आवाहन करण्यासाठीचे तुमचे कारण एंटर करा.
  6. सबमिट करा वर टॅप करा.

तुम्ही आवाहन सबमिट केल्यानंतर

तुम्हाला YouTube कडून तुमच्या आवाहनाच्या विनंतीचा निकाल कळवणारा ईमेल मिळेल. पुढीलपैकी एक गोष्ट घडेल:

  • तुमचे आवाहन यशस्वी झाल्यास, आम्ही मुलांसाठी तयार केलेले हे प्रेक्षक सेटिंग काढून टाकू.
  • तुमचे आवाहन यशस्वी न झाल्यास, तुमच्या आशयावर मुलांसाठी तयार केलेला हे प्रेक्षक सेटिंग कायम राहील. यापुढे कृपया तुमच्या चॅनलच्या आणि/किंवा वैयक्तिक व्हिडिओच्या प्रेक्षक सेटिंग्जचे पुनरावलोकन करा. तुमचा प्रेक्षकवर्ग योग्यरीत्या सेट न केल्यास, COPPA आणि/किंवा इतर कायद्यांच्या अंतर्गत कायदेशीर परिणाम किंवा YouTube प्लॅटफॉर्मवर परिणाम होऊ शकतात.

तुम्ही प्रत्येक व्हिडिओवर फक्त एकदा आवाहन करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8212878788019002317
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false