जाहिरातदारस्नेही कमाईची पुनरावलोकने कशी काम करतात

तुमच्या व्हिडिओला "मर्यादित कमाई" किंवा "पिवळा आयकन" मिळाल्यास, तुम्ही मानवी पुनरावलोकनाची विनंती करणे करू शकता. तुम्ही पुनरावलोकनाची विनंती करता, तेव्हा धोरणतज्ञ तुमच्या व्हिडिओचे पुनरावलोकन करतो आणि कमाईसंबंधी निर्णय घेतो. हा लेख पुनरावलोकनादरम्यान काय होते हे स्पष्ट करतो.

पुनरावलोकनादरम्यान परीक्षणकर्ते काय मूल्यांकन करतात

आमचे विशेषज्ञ व्हिडिओशी संबंधित सर्व आशयाचे पुनरावलोकन करतात. ते आशयाचा प्रत्येक भाग काळजीपूर्वक पाहतात आणि त्याचे मूल्यांकन करतात, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:

  • व्हिडिओ आशय
  • शीर्षक
  • थंबनेल
  • वर्णन
  • टॅग

परीक्षणकर्ते आशयाचे मूल्यांकन कसे करतात

आमचे परीक्षणकर्ते व्हिडिओ आणि संबंधित आशयाचे संपूर्णपणे मूल्यांकन करतात. प्रत्येक व्हिडिओची जाहिरात अनुरूपता त्याच्या संदर्भावर अवलंबून असते.

त्यांच्या पुनरावलोकनादरम्यान, विशेषज्ञ खालील तत्त्वासह जोडलेली जाहिरातदारस्नेही मार्गदर्शक तत्त्वे वापरतात:

  • संदर्भ
  • फोकस
  • टोन
  • वास्तववाद
  • ग्राफिकनेस

संदर्भ हे सर्वात महत्त्वाचे तत्त्व आहे. तुमच्या व्हिडिओमागील उद्देश काय आहे — माहिती आणि शिक्षण देणे की धक्का देणे व चिथावणी देणे? उदाहरणार्थ, माहिती आणि शिक्षण देणे हा उद्देश असल्यास, तुम्ही तुमचे शीर्षक, थंबनेल, वर्णन आणि टॅग यांमध्ये संदर्भाचा समावेश केला पाहिजे. हा संदर्भ कमाईसंबंधी योग्य निर्णय घेण्यात परीक्षणकर्त्यांना मदत करतो. संदर्भाशिवाय, परीक्षणकर्ते कदाचित तुमच्या आशयाचे अचूकपणे मूल्यांकन करणार नाहीत.

उदाहरणार्थ, ज्यावर जाहिराती दिसत आहेत, अशा एखाद्या व्हिडिओमध्ये थोडीफार शिवीगाळ असू शकते. त्याच वेळी, शिवीगाळ नसलेल्या, पण मोठ्या प्रमाणात हिंसक आशय असलेल्या एखाद्या वेगळ्या व्हिडिओला जाहिराती मिळू शकणार नाहीत.

पुनरावलोकनानंतर काय होते

पुनरावलोकन पूर्ण झाल्यावर, तुम्हाला कमाईसंबंधी निर्णय असलेला ईमेल मिळेल. परीक्षणकर्त्याचा निर्णय अंतिम असतो आणि त्यानंतर व्हिडिओचे कमाईसंबंधी स्टेटस बदलणार नाही.

मानवी पुनरावलोकने महत्त्वाची का असतात

आमची सिस्टीम ही लर्निंग तंत्रज्ञान आणि आवाहनाधील लाखो मॅन्युअल पुनरावलोकनांद्वारे समर्थित असते. एकत्रितपणे, प्रत्येक व्हिडिओसाठी कमाईसंबंधी योग्य निर्णय घेण्याकरिता सिस्टीमला प्रशिक्षित करण्यात आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात ते मदत करतात. हे तंत्रज्ञान मानवी परीक्षणकर्त्याचे निर्णय आणि ऑटोमेटेड निर्णय यांची तुलना करते आणि सिस्टीमच्या अचूकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरते.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10250915326703873674
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false