तुमची YouTube सदस्यसंख्या तपासणे

तुमची सदस्यसंख्या ही तुमचे YouTube चॅनल फॉलो करण्यासाठी किती दर्शकांनी सदस्यत्व घेतले आहे हे दर्शवते. YouTube विश्लेषण मध्ये तुम्ही तुमची सदस्यसंख्या रीअल टाइममध्ये पाहू शकता आणि तुमची काळानुसार झालेली वाढ पाहू शकता. तुम्हाला ईमेल मिळेल आणि तुम्ही माइलस्‍टोन गाठल्यावर YouTube Studio मध्ये अभिनंदनपर अ‍ॅनिमेशन सापडेल.

तुमची सदस्यसंख्या शोधणे

  1. YouTube Studio मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमध्ये, Analytics निवडा.
  3. अवलोकन टॅबवर, रीअलटाइम कार्ड शोधा. 
  4. काळानुसार तुमची सदस्यसंख्या पाहण्यासाठी, लाइव्ह संख्या पहा वर क्लिक करा.

तुमची YouTube सदस्यसंख्या समजून घेणे

तुमचे प्रेक्षक तुमच्या सदस्यसंख्येची लहान केलेली आवृत्ती पाहू शकतात. ही सदस्य संख्या तुमच्या चॅनलच्या सदस्यांच्या संख्येनुसार लहान केली जाते.

तुमच्याकडे इतके सदस्य असल्यास... तुमची सदस्यसंख्या खाली दिल्याप्रमाणे नवीन सदस्यांनुसार अपडेट होते:
१००० पेक्षा कमी सदस्य प्रति एक नवीन सदस्य
१००० ते ९९९९ सदस्य प्रति १० नवीन सदस्य
१०,००० ते ९९,००० सदस्य प्रति १०० नवीन सदस्य
१,००,००० ते ९,९९,९९९ सदस्य प्रति १००० नवीन सदस्य
१०,००,००० ते ९९,९९,९९९ सदस्य प्रति १०,००० नवीन सदस्य
१,००,००,००० ते ९,९९,९९,९९९ सदस्य प्रति १,००,००० नवीन सदस्य
१०,००,००,००० ते ९९,९९,९९,९९९ सदस्य प्रति १०,००,००० नवीन सदस्य

 

तुमची सदस्यसंख्या कशी प्रदर्शित केली जाईल हे समजून घेण्यासाठी, खालील सारणी वापरा.

उदाहरणार्थ, तुमच्याकडे इतके सदस्य असल्यास... तुमची सदस्यसंख्या इतकी असते: तुमची पुढील सदस्यसंख्या इतकी असेल:
१२३ सदस्य १२३ १२४
१२३४ सदस्य १.२३ K १.२४ K
१२,३४५ सदस्य १२.३ K १२.४ K
१,२३,४५६ सदस्य १२३ K १२४ K
१२,३४,५६७ सदस्य १.२३ M १.२४ M
१,२३,४५,६७८ सदस्य १२.३ M १२.४ M
१२,३४,५६,७८९ सदस्य १२३ M १२४ M

बंद केलेली खाती आणि स्पॅमी सदस्य काढून टाकणे

  • बंद केलेली खाती: निर्माणकर्त्याने बंद केलेली किंवा धोरण उल्लंघन यामुळे YouTube ने समाप्त केलेली खाती.
  • स्पॅम सदस्य: तृतीय पक्ष सेवेमार्फत सदस्य खरेदी करणे यासारख्या कृत्रिम मार्गांनी मिळवलेले सदस्य.

तुमच्या YouTube चॅनलवरील खात्यांच्या आणि कृतींच्या वैधतेची आम्ही नियमितपणे पडताळणी करतो. वेगवेगळ्या स्रोतांमधील सुसंगततेसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी, आम्ही YouTube विश्लेषण मधील साइट मेट्रिकमध्ये दुरुस्त्यादेखील करतो. YouTube हे सर्वांसाठी न्याय्य ठेवण्याकरिता, आमच्या साइटची मेट्रिक ही स्पॅम, गैरवापर आणि बंद केलेली खाती यांपासून मुक्त असल्याची या प्रक्रिया खात्री करतात.

तुम्ही तुमचे प्रेक्षक ऑरगॅनिक पद्धतीने तयार करत असल्याची खात्री करण्यासाठी, सदस्य संख्या अचूक राहणे महत्त्वाचे आहे. बंद केलेली खाती आणि स्पॅम म्हणून ओळखले गेलेले सदस्य यांची गणना तुमच्या सदस्यांच्या एकूण संख्येमध्ये केली जाणार नाही. ते तुमच्या सदस्य सूचीमध्येदेखील दिसणार नाहीत आणि त्यांचा परिणाम व्ह्यू किंवा पाहण्याच्या कालावधीवर होणार नाही.

तुमची सदस्य संख्या बदलू शकणे हे का होते याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2403262911368593365
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false