कॉपीराइट उल्लंघन सूचनांसाठी आवश्यकता: व्हिडिओ

टीप: एखादा व्हिडिओ तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तो काढून टाकण्याची विनंती करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आमचा वेबफॉर्म वापरणे.

चॅनल बॅनर इमेजसारखा व्हिडिओ नसलेला आशय काढून टाकण्याची विनंती करण्यासाठी, तुमच्या विनंतीमध्ये या आवश्यक माहिती चा समावेश असणे आवश्यक आहे.

व्हिडिओसाठी कॉपीराइट उल्लंघनाच्या सूचनेची विनंती करण्याकरिता, तुम्ही खाली सूचीबद्ध केलेल्या आवश्यक माहितीचा समावेश करणे आवश्यक आहे. या माहितीशिवाय, आम्ही तुमची विनंती पूर्ण करू शकत नाही.

तुम्ही खालील माहिती ईमेलच्या मुख्य मजकुरामध्ये (अटॅचमेंटमध्ये नाही) copyright@youtube.com वर किंवा फॅक्स अथवा पोस्ट याद्वारे सबमिट करू शकता.

१. तुमची संपर्क माहिती

YouTube आणि तुम्ही काढून टाकण्याची विनंती करत असलेला आशय अपलोड करणारी व्यक्ती यांना तुमच्या विनंतीबद्दल संपर्क साधावा लागू शकतो. तुमच्या विनंतीमध्ये, पुढीलपैकी एका किंवा अधिक गोष्टींचा समावेश करा:

  • तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस
  • तुमचा पत्ता
  • तुमचा टेलिफोन नंबर

२. तुमच्या कॉपीराइट केलेल्या कामाचे वर्णन

तुमच्या विनंतीमध्ये, तुम्ही ज्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहात त्या तुमच्या कॉपीराइट केलेल्या आशयाचे स्पष्ट आणि पूर्ण वर्णन करा.

तुमच्या कॉपीराइट केलेल्या एकापेक्षा जास्त कामांचे उल्लंघन केले गेले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कायदा तुमच्या विनंतीमध्ये अशा कामांच्या प्रातिनिधिक सूचीचा समावेश करण्याची अनुमती देतो.

३. संबंधित व्हिडिओच्या विशिष्ट URLs

तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असलेल्या व्हिडिओच्या विशिष्ट लिंकचा तुमच्या विनंतीमध्ये समावेश असणे आवश्यक आहे. 

नेमक्या व्हि्डिओच्या URL चा किंवा URLs चा पुढील फॉरमॅटमध्ये समावेश करा:
 
www.youtube.com/watch?v=xxxxxxxxxxx

चॅनलचे नाव किंवा चॅनल URL यासारखी सर्वसाधारण माहिती पुरेशी नाही.

४. पुढील दोन विधानांना सहमती दर्शवा आणि त्यांचा समावेश करा:

"माझा सद्भावनापूर्वक विश्वास आहे, की तक्रार केलेल्या पद्धतीने साहित्याचा वापर करण्यास कॉपीराइट मालक, त्याचे एजंट किंवा कायदा यांनी परवानगी दिलेली नाही."

"या सूचनेमधील माहिती अचूक आहे आणि खोटी साक्ष दिल्याबद्दल दंड लागू केला जातो हे लक्षात घेता, मी कथित उल्लंघन केल्या गेलेल्या विशेष हक्काचा मालक आहे किंवा मालकाच्या वतीने कृती करण्याची परवानगी असलेला एजंट आहे.”

५. तुमची स्‍वाक्षरी

काढून टाकण्याच्या पूर्ण तक्रारींसाठी कॉपीराइट मालकाच्या किंवा त्याच्या वतीने कृती करणार्‍या अधिकृत एजंटच्या प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीची आवश्यकता असते.

या आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी, विनंतीच्या तळाशी कॉपीराइट मालक किंवा अधिकृत एजंट हे त्यांची स्वाक्षरी म्हणून त्यांचे पूर्ण कायदेशीर नाव एंटर करू शकतात. पूर्ण कायदेशीर नावामध्ये नाव आणि आडनाव असायला हवे, कंपनीचे नाव नाही.

वरील माहितीचा copyright@youtube.com वर ईमेलच्या मुख्य मजकुरामध्ये (अटॅचमेंटमध्ये नाही) समावेश करा. तुमची विनंती तुम्ही फॅक्स किंवा पोस्ट यांद्वारेदेखील सबमिट करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4893159665981212509
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false