व्हिडिओची गोपनीयता सेटिंग्ज बदलणे

तुमचा व्हिडिओ कुठे दिसू शकतो आणि तो कोण पाहू शकते हे नियंत्रित करण्यासाठी गोपनीयता सेटिंग्ज अपडेट करा.

  1. YouTube Studio मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमधून, आशय निवडा.
  3. तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या व्हिडिओकडे निर्देश करा. तुमचे लाइव्ह अपलोड पाहण्यासाठी, लाइव्ह टॅब निवडा.
  4. "दृश्यमानता" या अंतर्गत डाउन अ‍ॅरोवर क्लिक करा आणि सार्वजनिक, खाजगी किंवा सूचीमध्ये नसलेले निवडा.
  5. सेव्ह करा.

टीप: १३ ते १७ वर्षे वयाच्या निर्माणकर्त्यांसाठी डीफॉल्ट व्हिडिओ गोपनीयता सेटिंग हे खाजगी असते. तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, तुमचे डीफॉल्ट व्हिडिओ गोपनीयता सेटिंग हे सार्वजनिक वर सेट केलेले असते. सर्वांना त्यांचा व्हिडिओ सार्वजनिक, खाजगी किंवा सूचीमध्ये नसलेला करण्यासाठी हे सेटिंग बदलता येते.

What are video privacy settings on YouTube?

गोपनीयता सेटिंग्जबद्दल

सार्वजनिक व्हिडिओ
YouTube वरील कोणीही सार्वजनिक व्हिडिओ पाहू शकते. ते YouTube वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत शेअरदेखील केले जाऊ शकतात. तुम्ही ते अपलोड करता, तेव्हा ते तुमच्या चॅनलवर पोस्ट केले जातात आणि शोध परिणाम व संबंधित व्हिडिओच्या सूचींमध्ये दिसू शकतात.
खाजगी व्हिडिओ

खाजगी व्हिडिओ आणि प्लेलिस्ट या फक्त तुम्ही व तुम्ही निवडलेले कोणीही पाहू शकते. तुमचे खाजगी व्हिडिओ तुमच्या चॅनल होमपेजच्या व्हिडिओ टॅबवर दिसणार नाहीत. ते YouTube च्या शोध परिणामांमध्येदेखील दिसणार नाहीत. YouTube सिस्टीम आणि मानवी परीक्षणकर्ते जाहिरात अनुरूपता, कॉपीराइट व इतर गैरवापर प्रतिबंधक यंत्रणांसाठी खाजगी व्हिडिओचे पुनरावलोकन करू शकतात.

खाजगी व्हिडिओ शेअर करण्यासाठी:

  1. YouTube Studio मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमधून, आशय निवडा.
  3. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.
  4. दृश्यमानता बॉक्सवर क्लिक करा आणि खाजगीरीत्या शेअर करा निवडा.
  5. तुम्हाला ज्या ईमेलसह व्हिडिओ शेअर करायचा आहे ते एंटर करा, त्यानंतर सेव्ह करा निवडा.

खाजगी व्हिडिओवर टिप्पण्या उपलब्ध नाहीत. तुम्हाला सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसलेल्या व्हिडिओवरील टिप्पण्यांना अनुमती द्यायची असल्यास, गोपनीयता सेटिंग हे सूचीमध्ये नसलेले वर बदला.

सूचीमध्ये नसलेले व्हिडिओ

सूचीमध्ये नसलेले व्हिडिओ आणि प्लेलिस्ट लिंक असलेल्या कोणालाही पाहता व शेअर करता येतात. तुमचे सूचीमध्ये नसलेले व्हिडिओ तुमच्या चॅनल होमपेजच्या व्हिडिओ टॅबवर दिसणार नाहीत. कोणीतरी तुमचा सूचीमध्ये नसलेला व्हिडिओ सार्वजनिक प्लेलिस्टमध्ये जोडल्याशिवाय तो YouTube च्या शोध परिणामांमध्ये दिसणार नाही.

तुम्ही सूचीमध्ये नसलेल्या व्हिडिओची URL शेअर करू शकता. तुम्ही ज्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करता त्यांच्याकडे तो पाहण्यासाठी Google खाते असण्याची आवश्यकता नाही. लिंक असलेले कोणीही तो पुन्हा शेअरदेखील करू शकते.

वैशिष्ट्य खाजगी सूचीमध्ये नसलेला सार्वजनिक
URL शेअर करू शकतो नाही होय होय
चॅनल विभागामध्ये जोडला जाऊ शकतो नाही होय होय
शोध, संबंधित व्हिडिओ आणि शिफारशींमध्ये दिसू शकतो नाही नाही होय
तुमच्या चॅनलवर पोस्ट केला आहे नाही नाही होय
सदस्य फीडमध्ये दाखवला जातो नाही नाही होय
त्यावर टिप्पणी केली जाऊ शकते नाही होय होय
सार्वजनिक प्लेलिस्टमध्ये दिसू शकतो नाही होय होय

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17262457343433512536
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false