तुमच्या व्हिडिओमध्ये मजकूर जोडणे

तुम्ही एखादा प्रोजेक्ट तयार केल्यानंतर, YouTube Create ची संपादन टूल वापरून तुमचे व्हिडिओ वर्धित करा. अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये शेकडो Google फॉंटसह तुमचे व्हिडिओ पर्सनलाइझ करा.

किमान 4G RAM असलेल्या Android फोनवर YouTube Create उपलब्ध आहे. भविष्यात हे अ‍ॅप इतर डिव्हाइसवर उपलब्ध होऊ शकते.

तुमच्या व्हिडिओमध्ये मजकूर जोडणे

  1. उघडलेल्या प्रोजेक्टमधून, टूलबारमध्ये मजकूर  वर टॅप करा.
  2. साधा मजकूर किंवा मजकूर इफेक्ट निवडा.
  3. मजकूर जोडण्यासाठी टाइप करा. मजकूर फॉरमॅट कसा करावा ते खाली जाणून घ्या.
  4. पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झाले वर टॅप करा.

मजकूर फॉरमॅट करा

  1. तुमच्या प्रोजेक्टमधील तुम्हाला संपादित करायचा असलेला मजकुराचा स्तर निवडा. 
  2. टूलबारमधून, मजकूर संपादित करण्यासाठी पुढील पर्याय वापरा:
    • स्प्लिट करा : तुमच्या मजकुराचा कालावधी कट करा.
    • संपादित करा : तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला मजकूर बदलण्यासाठी टाइप करा
    • शैली : आकार, फॉंट, रंग, बॅकग्राउंड, फॉरमॅट, आउटलाइन किंवा शॅडो बदलण्यासाठी टॅबवर टॅप करा.
    • अ‍ॅनिमेशन : अ‍ॅनिमेशन निवडा आणि इफेक्टचा कालावधी सेट करण्यासाठी स्लायडर वापरा. 
  3. मजकूर अपडेट करण्यासाठी पूर्ण झाले वर टॅप करा.

तुमच्या व्हिडिओमध्ये मजकुराचा स्तर हलवण्यासाठी, टॅप करा आणि तुमच्या व्हिडिओमध्ये हव्या असलेल्या ठिकाणी ड्रॅग करा.

मजकूर हटवा

  1. तुम्हाला हटवायचा असलेला मजकुराचा स्तर निवडण्यासाठी टॅप करा.
  2. ट्रॅश वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10930737276617746209
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false