हक्कधारक म्हणून शॉर्ट वरून कमाई करणे

ही वैशिष्ट्ये फक्त नवीन अटी स्वीकारलेल्या, YouTube Studio आशय व्यवस्थापक वापरणाऱ्या भागीदारांसाठी उपलब्ध आहेत.

हक्कधारक म्हणून एखाद्या शॉर्ट वरून कमाई करण्यासाठी, त्यावर लागू असलेला अपलोड दावा केला असणे आणि अपलोड करण्यासंबंधित कमाई धोरण लागू केले असणे आवश्यक आहे.

कमाई करणे हे तुमचे अपलोड करण्यासंबंधित डीफॉल्ट धोरण असल्यास, नुकत्याच तयार केलेल्या शॉर्ट वरून कमाई केली जाऊ शकते. तुम्हाला फेब्रुवारी २०२३ पूर्वी तयार केलेल्या जुन्या शॉर्ट वरून कमाई करायची असल्यास, तुम्ही त्यावर अपलोड दावे करू शकता किंवा ते पुन्हा सुरू करू शकता आणि कमाई धोरण लागू करू शकता.

तुम्ही दावे करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, YouTube Shorts कमाई धोरणे समजून घेतली असल्याची आणि त्यांचे पालन करत असल्याची खात्री करा.

शॉर्ट वर दावा करा

थेट Studio आशय व्यवस्थापक मध्ये शॉर्ट वर दावा करण्यासाठी:

  1. Studio आशय व्यवस्थापक मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमधून, व्हिडिओ निवडा.
  3. शॉर्ट शोधून त्याच्या शीर्षकावर क्लिक करा.
  4. व्हिडिओ तपशील पेजवर, डावीकडील मेनूमधून, हक्क व्यवस्थापन निवडा.
  5. अपलोड करण्यासंबंधित कमाई करण्याचे धोरण निवडा.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

आशय डिलिव्हरी टेंप्लेट वापरून शॉर्ट वर दावा करण्यासाठी:

  1. Studio आशय व्यवस्थापक मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमधून, आशय डिलिव्हरी निवडा.
  3. टेंप्लेट टॅबवर क्लिक करा.
  4. वेब व्हिडिओ - अपडेट करा टेंप्लेट डाउनलोड करा. टेंप्लेट वापरून आशय डिलिव्हर करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
  5. video_id स्तंभामध्ये अपडेट करण्यासाठी व्हिडिओ आयडीची सूची भरा आणि usage_policy स्तंभ यामध्ये सर्व देशांमध्ये कमाई करा (किंवा कमाईची अनुमती देणाऱ्या इतर धोरणाचे नाव) निवडा.
    टीप: प्रथम पक्षाने कोणताही दावा केला नसल्यास, तुम्हाला शीर्षक स्तंभामध्ये निवडलेल्या व्हिडिओ/अ‍ॅसेटचे शीर्षक आणि मालकी स्तंभामध्ये अ‍ॅसेटची मालकी (उदा. WW) या गोष्टीदेखील जोडाव्या लागू शकतात.
  6. फाइल सेव्ह करा.
  7. आशय डिलिव्हरी पेजवर परत जाऊन माझी पॅकेज टॅबवर क्लिक करा.
  8. फाइलची पडताळणी करून ती अपलोड करण्यासाठी पडताळणी करा आणि अपलोड करा वर क्लिक करा.

शॉर्ट वरील बंद असलेला दावा पुन्हा सुरू करा

कॉपीराइट दावा मिळाल्यामुळे किंवा मॅन्युअली बंद केल्यामुळे बंद असलेला दावा पुन्हा सुरू करण्यासाठी:

  1. Studio आशय व्यवस्थापक मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमधून, दावा केलेले व्हिडिओ निवडा.
  3. फिल्टर बारमध्ये स्रोतआणि त्यानंतर भागीदार याने दिलेले व्हिडिओ आणि त्यानंतर लागू करा वर क्लिक करा.
  4. फिल्टर बार वर क्लिक करून आणखी दोन फिल्टर लागू करा:
    • YouTube Shorts आणि त्यानंतर होय आणि त्यानंतर लागू करा.
    • दाव्याचे स्टेटस आणि त्यानंतर निष्क्रिय आणि त्यानंतर लागू करा.
  5. दावा केलेला व्हिडिओ शोधून त्याच्या शीर्षकावर क्लिक करा.
  6. निष्क्रिय - तुमचे या अंतर्गत, तपशील वर क्लिक करा.
  7. दाव्यावर पुन्हा दावा करा वर क्लिक करा.

दीर्घ स्वरूपातील व्हिडिओप्रमाणे आम्ही अशी धोरणे लागू करण्याची अनुमती देत नाही, ज्यांमध्ये अपलोड करण्यासंबंधित धोरणांशी जुळणारे नियम असतील. मात्र, तुम्ही प्रदेश हा निकष वापरू शकता आणि फक्त निवडक देश/प्रदेशांमध्ये कमाई करू शकता.

लक्षात ठेवा: Shorts सह YouTube वरील कोणत्याही आशयावरून कमाई करण्यासाठी, तुमच्या चॅनलने पुनरावृत्ती होणारा आणि पुन्हा वापरलेला आशय यासंबंधित आमच्या धोरणांसह YouTube चॅनल कमाई धोरणे यांचे पालन करणे आवश्यक आहे. चॅनलनी YouTube ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे, सेवा अटी, कॉपीराइट आणि Google AdSense प्रोग्राम धोरणे यांचेदेखील पालन करणे आवश्यक आहे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2864503164761347678
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false