सशुल्क उत्पादन स्थान नियोजने, प्रायोजकत्वे आणि जाहिराती असलेले व्हिडिओ पाहणे

व्हिडिओमध्ये सशुल्क उत्पादन स्थान नियोजने, जाहिराती किंवा प्रायोजकत्वांचा समावेश असेल, तेव्हा निर्माणकर्त्याने नियुक्त करणे हे केल्यावर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला डिस्क्लोजर दिसेल.

टीप: YouTube Premium जाहिरातमुक्त व्हिडिओ देते. तथापि, तुम्ही तरीही निर्माणकर्त्यांनी व्हिडिओमध्ये थेट जोडलेला प्रायोजित आशय पाहू शकता.

सशुल्क उत्पादन स्थान नियोजने, प्रायोजकत्वे आणि जाहिराती म्हणजे काय?

सशुल्क उत्पादन स्थान नियोजने:

  • निर्माणकर्ता आणि उत्पादन किंवा सेवा तयार करणाऱ्या व्यक्तीमध्ये संबंध असल्यामुळे, उत्पादनाविषयीचे अथवा सेवेविषयीचे व्हिडिओ.
  • मोबदला किंवा निःशुल्क उत्पादनांच्या/सेवांच्या बदल्यात कंपनीसाठी अथवा व्यवसायासाठी तयार केलेले व्हिडिओ.
  • असे व्हिडिओ ज्यांमध्ये कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या ब्रँडचा, मेसेजचा अथवा उत्पादनाचा थेट आशयामध्ये समावेश केलेला असतो आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी कंपनीने निर्माणकर्त्याला पैसे किंवा निःशुल्क उत्पादने दिलेली असतात.

जाहिराती: जाहिरातदारासाठी किंवा मार्केटरसाठी तयार केलेले असे व्हिडिओ, ज्यांमध्ये निर्माणकर्त्याची मते, विचार अथवा अनुभव मांडणाऱ्या मेसेजचा समावेश असतो.

प्रायोजकत्वे: ब्रँड, मेसेज किंवा उत्पादन थेट आशयामध्ये इंटिग्रेट न करता एखाद्या कंपनीद्वारे पूर्णपणे अथवा अंशतः आर्थिक मदत मिळालेले व्हिडिओ. प्रायोजकत्वे सहसा पुढील गोष्टी प्रमोट करतात:

  • ब्रँड
  • मेसेज
  • तृतीय पक्षाचे उत्पादन

तुम्ही निर्माणकर्ता असल्यास, तुमच्या व्हिडिओमध्ये सशुल्क उत्पादन स्थान नियोजने, प्रायोजकत्वे आणि जाहिराती कशा जोडाव्यात हे येथे जाणून घ्या.

पर्यवेक्षित खात्यांद्वारे पाहिल्या जाणाऱ्या किंवा मुलांसाठी तयार केलेला म्हणून सेट केलेल्या आशयासाठी सशुल्क उत्पादन स्थान नियोजने, प्रायोजकत्वे आणि जाहिराती कशा काम करतात?

लहान मुलांना उद्देशून असलेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व सशुल्क प्रमोशनमध्ये त्यांना समजेल अशा डिस्क्लोजर चा समावेश असतो.

सर्व सशुल्क प्रमोशननी आमची जाहिरात धोरणे यांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यांनुसार ठरावीक वर्गवाऱ्यांमधील जाहिराती प्रतिबंधित आहेत. “मुलांसाठी तयार केलेला” म्हणून सेट केलेल्या आशयावरील जाहिरात ही दिशाभूल करणारी, अयोग्य किंवा अपेक्षित प्रेक्षकांसाठी अनुचित नसावी. सर्वप्रथम पालकांची संमती न मिळवता आशयाने कोणतेही तृतीय पक्ष ट्रॅकर वापरू नयेत किंवा वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू नये. आशयाने सर्व संबंधित कायदे आणि नियमांचे पालन करणेदेखील आवश्यक आहे. त्यांच्या आशयामध्ये सशुल्क प्रमोशन उघड करण्याची स्थानिक आणि कायदेशीर दायित्वे समजून घेणे व त्यांचे पालन करणे या गोष्टींसाठी निर्माणकर्ते आणि ते ज्यांच्यासोबत काम करतात ते ब्रँड जबाबदार आहेत. यांपैकी काही कर्तव्यांमध्ये कधी, कसे आणि कोणाकडे उघड करावे याचा समावेश आहे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6073250353024215327
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false