सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमची वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी शोधणे व नियंत्रित करणे

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी इतर Google सेवांवरील तुमचे शोध व ॲक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. तुम्हाला आणखी पर्सनलाइझ केलेला अनुभव मिळू शकतो, जसे की:

  • जलद शोध
  • अधिक उपयुक्त ॲप्स
  • आशयाच्या शिफारशी

तुम्ही कधीही तुमची वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी बंद करू शकता किंवा मागील ॲक्टिव्हिटी हटवू शकता.

टीप: तुम्हाला तुमचे Google खाते तुमच्या नियोक्ता किंवा शैक्षणिक संस्थेद्वारे मिळाले असल्यास, तुमच्या संस्थेला ही सेवा वापरता यावी, यासाठी तुम्हाला तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरला वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू करण्यास सांगावे लागू शकते.

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, ॲक्टिव्हिटी कंट्रोल पेज वर जा. तुम्हाला तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते.
  2. वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू किंवा बंद करा.
  3. वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असताना:
    • तुम्ही "Google सेवा वापरणाऱ्या साइट, ॲप्स आणि डिव्हाइसमधील Chrome इतिहास व ॲक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करू शकता.
    • तुम्ही "व्हॉइस आणि ऑडिओ ॲक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करू शकता.
  4. तुम्ही वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी बंद केल्यावर:
    • बंद करा निवडा, त्यानंतर बंद करा किंवा ॲक्टिव्हिटी बंद करा आणि हटवा निवडा.
    • तुम्ही बंद करा आणि ॲक्टिव्हिटी हटवा निवडल्यास, तुम्हाला हटवायची असलेली ॲक्टिव्हिटी निवडण्यासाठी व कंफर्म करण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.

टीप: काही ब्राउझर आणि डिव्हाइसमध्ये ही ॲक्टिव्हिटी कशी सेव्ह केली जाते यावर परिणाम करणारी आणखी सेटिंग्ज असू शकतात.

माझी Google ॲक्टिव्हिटी वर वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी शोधणे किंवा हटवणे

तुम्ही माझी Google ॲक्टिव्हिटी वर तुमची वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी शोधू व नियंत्रित करू शकता. 

टीप: आणखी सुरक्षा जोडण्यासाठी, तुमच्याकरिता माझी ॲक्टिव्हिटी मध्ये तुमचा पूर्ण इतिहास पाहण्यासाठी अतिरिक्त पडताळणी पायरी आवश्यक असणे हे असू शकते.

 

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी म्हणून काय सेव्ह केले जाते

तुमचे शोध आणि इतर ॲक्टिव्हिटी यांविषयी माहिती

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असताना, Google यांसारखी माहिती सेव्ह करते:

  • तुम्ही Maps आणि Play यांसारख्या Google उत्पादनांवर व सेवांवर करत असलेले शोध आणि ॲक्टिव्हिटी.
  • तुमची भाषा, रेफरर, तुम्ही ब्राउझर किंवा ॲप वापरता अथवा तुम्ही वापरता त्या डिव्हाइसचा प्रकार यांसारखी तुमच्या ॲक्टिव्हिटीशी संबंधित माहिती.
    • ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या डिव्हाइसच्या सर्वसाधारण भागावरील तुमच्या स्थानाविषयीची माहिती व आयपी ॲड्रेस यांचाही समावेश असू शकतो. स्थानांविषयी जाणून घ्या.
  • तुम्ही क्लिक करत असलेल्या जाहिराती किंवा जाहिरातदाराच्या साइटवर खरेदी करत असलेल्या गोष्टी.
  • ॲप्सवरील अलीकडील शोध किंवा संपर्क नावे यासारखी तुमच्या डिव्हाइसवरील माहिती.
  • Google Assistant ने तुमचा उद्देश नसताना झालेले ॲक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यास, त्याच्या समावेशासह Assistant शी साधलेला संवाद.

टीप: तुम्ही ऑफलाइन असतानादेखील ॲक्टिव्हिटी सेव्ह केली जाऊ शकते.

Google सेवा वापरणाऱ्या साइट, ॲप्स आणि डिव्हाइसवरील तुमच्या ब्राउझिंग व इतर ॲक्टिव्हिटीबद्दलची माहिती

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असताना, तुम्ही यांसारख्या अतिरिक्त ॲक्टिव्हिटीचा समावेश करू शकता:

  • जाहिराती दाखवण्यासाठी Google सोबत भागीदारी करणाऱ्या साइट आणि ॲप्स
  • ॲप्स Google सोबत शेअर करत असलेल्या डेटासह, Google सेवा वापरणाऱ्या साइट आणि ॲप्स
  • तुमचा Chrome ब्राउझिंग इतिहास
  • बॅटरीची पातळी आणि सिस्टीम एरर यांसारखे Android वापर आणि निदान

Google ला ही माहिती सेव्ह करू देण्यासाठी:

  • वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असणे आवश्यक आहे.
  • "Google सेवा वापरणाऱ्या साइट, ॲप्स आणि डिव्हाइसमधील Chrome इतिहास व ॲक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करणे आवश्यक आहे.

तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले असेल आणि तुमचा इतिहास सिंक करत असाल, तरच तुमचा Chrome इतिहास सेव्ह केला जातो. Chrome वर साइन इन करण्याविषयी अधिक जाणून घ्या.

टीप: तुम्ही शेअर केलेले डिव्हाइस वापरत असल्यास किंवा एकाहून अधिक खाती वापरून साइन इन करत असल्यास, वापरत असलेल्या ब्राउझर अथवा डिव्हाइसवरील डीफॉल्ट खात्यामध्ये ॲक्टिव्हिटी सेव्ह केली जाऊ शकते.

ऑडिओ रेकॉर्डिंग

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असते, तेव्हा तुम्ही Google Search, Assistant आणि Maps यांच्यासोबत केलेल्या संवादांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचा तुमच्या ॲक्टिव्हिटीचा भाग म्हणून समावेश करू शकता. ऑडिओ रेकॉर्डिंगविषयी जाणून घ्या.

Google ला ही माहिती सेव्ह करू देण्यासाठी:

  • वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असणे आवश्यक आहे.
  • "व्हॉइस आणि ऑडिओ ॲक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करणे आवश्यक आहे.

तुमची सेव्ह केलेली ॲक्टिव्हिटी कशी वापरली जाते

Google तुमची सेव्ह केलेली ॲक्टिव्हिटी कशी वापरते आणि ती खाजगी ठेवण्यात कशी मदत करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google सर्वसाधारणपणे शोध क्वेरी कसे हाताळते याबद्दल अधिक माहितीसाठी, गोपनीयता धोरण यासंबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) चे पुनरावलोकन करा.

तुम्ही साइन आउट केलेले असताना वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी कशी काम करते

तुम्ही साइन आउट केलेले असतानादेखील शोधाशी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटी वापरून तुमचे शोध आणि जाहिरात परिणाम कस्टमाइझ केले जाऊ शकतात. या प्रकारचे शोध कस्टमायझेशन बंद करण्यासाठी, तुम्ही खाजगीरीत्या शोधू आणि ब्राउझ करू शकता. खाजगीरीत्या ब्राउझ करणे आणि शोधणे हे कसे करावे हे जाणून घ्या.

ब्राउझर इतिहास

तुमचे डिव्हाइस तुमची ॲक्टिव्हिटी सेव्ह करते की नाही हे नियंत्रित करण्यासाठी: 

  1. ॲक्टिव्हिटी कंट्रोल पेजवर जा.
  2. "Google सेवा वापरणाऱ्या साइट, ॲप्स आणि डिव्हाइसमधील Chrome इतिहास व ॲक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करा. 

तुमचा ब्राउझर तुमचे शोध आणि तुम्ही भेट देत असलेल्या साइटदेखील सेव्ह करू शकतो. पुढील ब्राउझरवरून तुमचा इतिहास कसा हटवावा हे जाणून घ्या:

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
6637221252589136612
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false