सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

सुरक्षितशोध वापरून भडक परिणाम फिल्टर किंवा ब्लर करणे

तुमच्या Google Search परिणामांमध्ये, सुरक्षितशोध हे तुम्हाला कामावर, लहान मुलांसोबत किंवा स्वतःसाठी भडक आशय व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. भडक परिणामांमध्ये पुढील प्रकारच्या आशयाचा समावेश आहे:

  • नग्नता, ग्राफिक लैंगिक क्रिया, लैंगिकदृष्ट्या भडक साहित्य
  • हिंसा आणि रक्तपात

Google Search च्या आशय धोरणांविषयी अधिक जाणून घ्या.

महत्त्वाचे: सुरक्षितशोध फक्त Google Search परिणामांवर काम करते. तुम्हाला इतर शोध इंजीन किंवा तुम्ही थेट जाऊ शकत असलेल्या वेबसाइटवर आढळलेल्या लैंगिकदृष्ट्या भडक आशयावर त्याचा परिणाम होणार नाही.

सुरक्षितशोध सेटिंग्ज बदलणे

तुमच्याकडे तुमचे स्वतःचे Google खाते असल्यास, तुम्ही तुमच्या वैयक्तिक खात्यासाठी किंवा ब्राउझरसाठी सुरक्षितशोध व्यवस्थापित करू शकता.

Google अ‍ॅपमध्ये

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर सुरक्षितशोध वर टॅप करा.
  3. फिल्टर, ब्लर करा किंवा बंद करा निवडा.
मोबाइल ब्राउझर
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, तुमची सुरक्षितशोध सेटिंग्ज वर जा.
  2. फिल्टर, ब्लर करा किंवा बंद करा निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, मागे जा Back वर टॅप करा.

सुरक्षितशोध कसे काम करते ते जाणून घ्या

Google Search वर, सुरक्षितशोध हे प्रौढांसाठी असलेला आशय आणि ग्राफिक हिंसा यांसारखा लैंगिकदृष्ट्या भडक आशय डिटेक्ट करू शकते.

  • डिटेक्ट केलेला कोणताही लैंगिकदृष्ट्या भडक आशय ब्लॉक करण्यासाठी, फिल्टर करा निवडा.
    • Google च्या सिस्टीम तुमचे वय १८ वर्षाखालील असल्याचे सूचित करतात, तेव्हा ते डीफॉल्ट सेटिंग असते.
  • लैंगिकदृष्ट्या भडक इमेज ब्लर करण्यासाठी, ब्लर करा निवडा. वरील गोष्ट लागू होत नसल्यास, हे डीफॉल्ट सेटिंग आहे.
    • हे सेटिंग भडक इमेज ब्लर करण्यात मदत करते, पण भडक मजकूर आणि लिंक या तुमच्या शोधाशी सुसंबद्ध असल्यास, त्या दिसू शकतात.
  • सुरक्षितशोध "बंद" असल्यास, तुम्हाला तुमच्या शोधाशी संबंधित परिणाम हे भडक असले तरीही दिसतील.

तुम्हाला तुमचे सुरक्षितशोध सेटिंग बदलता येत नसल्यास, तुमच्या खाते, डिव्हाइस किंवा नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटरद्वारे ते नियंत्रित केले जात असल्यामुळे असे होऊ शकते. उदाहरणार्थ:

  • लहान मुलाच्या आणि विद्यार्थ्यांच्या खात्यांसाठी, पालक आणि शाळा हे "फिल्टर" मध्ये सुरक्षितशोध लॉक करू शकतात.
  • विमानतळ किंवा लायब्ररी यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांमधील वाय-फाय नेटवर्कदेखील "फिल्टर" मध्ये सुरक्षितशोध लॉक करू शकतात.
  • तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम आणि अँटिव्हायरस सॉफ्टवेअरवरील पालक नियंत्रणे तुमच्या वैयक्तिक सुरक्षितशोध सेटिंगला ओव्हरराइड करू शकतात.

तुमचे सुरक्षितशोध सेटिंग कोण बदलू शकते हे जाणून घ्या

इतरांसाठी सुरक्षितशोध सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

Family Link अ‍ॅपमध्ये तुमच्या लहान मुलाचे सुरक्षितशोध सेटिंग बदलणे

Family Link ने व्यवस्थापित केलेल्या खात्यामध्ये साइन इन केलेल्या आणि १३ वर्षे वयाखालील किंवा तुमच्या देशामधील अथवा प्रदेशामधील लागू असलेले वय असणाऱ्या लहान मुलांसाठी सुरक्षितशोध बाय डीफॉल्ट "फिल्टर" वर सेट केलेले असते. या खात्यांसाठी, फक्त पालक सुरक्षितशोध सेटिंग बदलू शकतात. तुमच्या लहान मुलाच्या Google खाते वर Search कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घ्या.

तुम्ही व्यवस्थापित करत असलेल्या डिव्हाइस आणि नेटवर्कसाठी सुरक्षितशोध सेटिंग लॉक करणे

तुम्ही व्यवस्थापित करत असलेल्या तुमच्या PC किंवा MacBook यासारख्या दुसर्‍या डिव्हाइसवर तुम्हाला सुरक्षितशोध परिणामांची हमी द्यायची असल्यास, तुम्ही forcesafesearch.google.com वर Google डोमेन मॅप करू शकता. तुम्ही व्यवस्थापित करत असलेली खाती, डिव्हाइस आणि नेटवर्क यांसाठी सुरक्षितशोध लॉक कसे करावे हे जाणून घ्या.

सुरक्षितशोध बाबतच्या समस्यांचे निराकरण करणे

सुरक्षितशोध काम करत नसल्यास, सुरक्षितशोध मधील समस्यांचे निराकरण कसे करावे हे जाणून घ्या.

भडक आशयाची तक्रार करणे

तुम्ही सुरक्षितशोध फिल्टर करणे सुरू केले असल्यास आणि तुम्हाला भडक आशय सापडल्यास, तुम्ही आशयाची तक्रार करणे हे करू शकता.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13829148683307285349
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false