खाजगीरीत्या शोधा आणि ब्राउझ करा

तुम्ही शोधता तेव्हा Google सोबत कोणती माहिती शेअर करता ते तुम्ही नियंत्रित करता. वेब खाजगीरीत्या ब्राउझ करण्यासाठी, तुम्ही खाजगी ब्राउझिंग वापरू शकता, तुमच्या खात्यामधून साइन आउट करू शकता, तुमची कस्टम परिणाम सेटिंग्ज बदलू शकता किंवा मागील अ‍ॅक्टिव्हिटी हटवू शकता.

तुम्हाला तुमची शोध अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या खात्यावर सेव्ह न करता वेबवर शोधायचे असल्यास, तुम्ही ब्राउझरमध्ये (जसे की Chrome किंवा Safari) खाजगी ब्राउझिंग मोड वापरू शकता.

खाजगी ब्राउझिंग कसे काम करते

तुम्ही कोणते ब्राउझर वापरता त्यावर अवलंबून खाजगी ब्राउझिंग वेगवेगळ्या प्रकारे काम करते. खाजगीरीत्या ब्राउझिंग करणे म्हणजे सहसा:

  • तुम्ही घेत असलेले शोध किंवा तुम्ही भेट देत त्या साइट तुमच्या डिव्हाइसवर किंवा ब्राउझिंग इतिहासामध्ये सेव्ह केल्या जाणार नाहीत.
  • तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइल किंवा तुम्ही तयार केलेले बुकमार्क तुमच्या डिव्हाइसवर राहू दिले जाऊ शकतात.
  • तुम्ही तुमची खाजगी ब्राउझिंग विंडो किंवा टॅब बंद केल्यानंतर कुकी हटवल्या जातात.
  • तुमच्या स्थानाच्या किंवा तुमच्या सध्याच्या ब्राउझिंग सेशनदरम्यान तुम्ही केलेल्या इतर शोधांच्या आधारे तुम्हाला शोध परिणाम आणि सूचना दिसू शकतात.

महत्त्वाचे: तुम्ही Gmail सारखी सेवा वापरण्यासाठी तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केल्यास, तुमचे शोध आणि ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या खात्यावर सेव्ह केली जाऊ शकते.

खाजगी ब्राउझिंग मोड उघडा

या ब्राउझरवर खाजगीरीत्या कसे शोधायचे ते जाणून घ्या:

तुमच्या Google खाते मधून साइन आउट करा

तुम्ही खाजगीरीत्या ब्राउझ करता तेव्हा तुम्हाला तुमचे Google खाते यावरून बाय डीफॉल्ट साइन आउट केले जाते. तुम्ही तुमचे Google खाते यामध्ये Gmail सारख्या वेब सेवेमधून साइन इन केल्यास, तुमची ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी कदाचित तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केली जाऊ शकते.

  1. google.com सारख्या कोणत्याही Google पेजला भेट द्या.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचे Google खाते याच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा आणि त्यानंतर साइन आउट करा.
    • तुम्हाला "साइन इन करा" बटण दिसत असल्यास, तुम्ही तुमच्या खात्यामधून आधीच साइन आउट केले आहे.