सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

डार्क वेब म्हणजे काय?

डार्क वेब हा इंटरनेटचा असा भाग आहे, जो लोकांना त्यांची ओळख आणि स्थान इतर लोकांपासून व कायदा अंमलबजावणी संस्थांपासून लपवू देतो. याचा परिणाम म्हणून, डार्क वेब हे चोरलेली वैयक्तिक माहिती विकण्यासाठी वापरले जाऊ शकते.

तुम्हाला डार्क वेब कसे अ‍ॅक्सेस करता येईल?

डार्क वेब अ‍ॅक्सेस करण्यासाठी, तुम्ही Google Search किंवा Chrome अथवा Safari यांसारखे ब्राउझर वापरू शकत नाही. त्याऐवजी, तुम्हाला विशेषतः या उद्देशासाठी डिझाइन केलेले Tor किंवा I2P यांसारखे सॉफ्टवेअर वापरावे लागते.

डार्क वेब कशासाठी वापरले जाते?

डार्क वेब हे बरेचदा अमली पदार्थांची तस्करी आणि डेटा भंग यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांशी संलग्न असते. मात्र, सरकारी संस्थादेखील पुढील गोष्टींसाठी डार्क वेब वापरतात:

  • अधिकृतपणे गोपनीय माहिती शेअर करणे
  • इतर सकारात्मक अ‍ॅक्टिव्हिटी करणे

डार्क वेब आणि डीप वेब यांमधील फरक जाणून घ्या

डार्क वेबचे वर्णन बरेचदा चुकून डीप वेब असे केले जाते.

डीप वेब म्हणजे इंटरनेटचे असे भाग असतात, ज्यांपर्यंत तुम्ही Google Search सारख्या शोध इंजीनद्वारे पोहोचू शकत नाही. यामध्ये डार्क वेबचा समावेश असला, तरीही डीप वेबमध्ये अशा पेजचादेखील समावेश असतो, जी तुम्ही नोंदणी केली किंवा साइन इन केले, तरच सापडू शकतात, जसे की Gmail आणि Facebook यांनी पुरवलेला बहुतांश आशय.

डीप वेबमध्ये ९० टक्के इंटरनेटचा समावेश आहे, तर डार्क वेबमध्ये ०.०१ टक्क्याहून कमी इंटरनेटचा समावेश असण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक माहिती डार्क वेबवर कशी पोहोचते?

डेटा भंग आणि मालवेअर हे २ सामान्य मार्ग आहेत, ज्यांमुळे वैयक्तिक माहिती डार्क वेबवर पोहोचू शकते.

एखाद्या हॅकरने एखाद्या कंपनीच्या डेटाबेसमधून वापरकर्ता डेटा चोरल्यावर डेटा भंग होतात. हा डेटा नंतर डार्क वेबवरील ओळखचोरांना विकला जाऊ शकतो.

मालवेअर म्हणजे कॉंप्युटरला हानी पोहोचवू शकणारे कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर. मालवेअर तुमच्या काँप्युटरमधील संवेदनशील माहिती चोरू शकते, हळूहळू तो धीमा करू शकते आणि तुमच्या खात्यामधून बनावट ईमेलदेखील पाठवू शकते. मालवेअरपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे जाणून घ्या.

डार्क वेबवर कोणती वैयक्तिक माहिती आहे हे Google ला कसे कळते?

डार्क वेबवर कोणती वैयक्तिक माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी, Google हे तृतीय पक्ष विक्रेता वापरते. या विक्रेत्याला डेटाबेसचा अ‍ॅक्सेस असतो, जे सध्या डार्क वेबवर कोणता आशय उपलब्ध आहे हे दाखवतात.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18030302963469706006
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false