तुमच्या Google खाते चा प्रोफाइल फोटो, नाव आणि इतर माहिती बदलणे

Google वापरणारे इतर लोक तुमचे नाव, तुमचा प्रोफाइल फोटो आणि इतर मूलभूत माहिती अ‍ॅक्सेस करू शकतात. इतर लोक सर्व Google सेवांवर तुमच्याबद्दल काय पाहतात ते नियंत्रित करणे हे तुम्ही करू शकता.

महत्त्वाचे:

  • तुम्ही अद्याप प्रोफाइल फोटो जोडला नसल्यास, तुम्हाला त्याऐवजी तुमची आद्याक्षरे दिसतील.
  • तुम्ही तुमचे Google नाव किंवा प्रोफाइल फोटो बदलल्यास, त्यामुळे तुमचे YouTube नाव अथवा प्रोफाइल फोटो बदलणार नाही. अधिक माहितीसाठी, तुमचे चॅनल ब्रॅंडिंग व्यवस्थापित करणे वर जा.

तुमच्या YouTube चॅनलच्या मूलभूत माहितीबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचा प्रोफाइल फोटो जोडा किंवा बदला

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  2. "वैयक्तिक माहिती" या अंतर्गत, फोटो वर क्लिक करा.
  3. तुमच्या काँप्युटरवरून फोटो अपलोड करा किंवा Google Photos मधील एक फोटो निवडा.
  4. आवश्यकतेनुसार तुमचा फोटो फिरवा आणि क्रॉप करा आणि त्यानंतर.
  5. पुढील वर क्लिक करा.
  6. तळाशी, प्रोफाइल फोटो म्हणून सेव्ह करा वर क्लिक करा.

टिपा:

  • तुमचा फोटो दिसत असलेल्या बहुतांश ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करून तो संपादित करू शकता.
  • मागील प्रोफाइल फोटो शोधण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर मागील प्रोफाइल फोटो वर क्लिक करा.

साहाय्यकारी तंत्रज्ञान किंवा कीबोर्ड वापरून तुमचा फोटो क्रॉप करा

तुमचा फोटो कोपऱ्यातून क्रॉप करणे

  1. फोटोचा कोपरा निवडण्यासाठी नेव्हिगेट करा.
  2. फोटो क्रॉप करण्यासाठी ॲरो की वापरा.

क्रॉप करण्याचा संपूर्ण चौकोनी भाग हलवणे

  1. क्रॉप करण्याचा संपूर्ण चौकोनी भाग निवडण्यासाठी नेव्हिगेट करा.
  2. क्रॉप करण्याच्या संपूर्ण चौकोनी भागाची जागा बदलण्यासाठी ॲरो की वापरा.

वैयक्तिक माहिती बदलणे

तुमचे नाव संपादित करा

तुम्ही तुमचे नाव हवे तितक्या वेळा बदलू शकता.
 

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.

  2. सर्वात वरती डावीकडे, "वैयक्तिक माहिती" वर क्लिक करा.

  3. "मूलभूत माहिती" अंतर्गत, नाव वर क्लिक करा.

  4. तुमच्या सद्य नावाच्या शेजारी, आणि त्यानंतर वर क्लिक करा.

  5. तुमचे नाव अपडेट करा.

  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: तुमचे नाव कुठे दिसते ते शोधणे.तुमचे नाव कुठे दिसते ते शोधणे.

तुमचे नाव बदलणे

अजूनही दिसत असणार्‍या जुन्या नावासंबंधित समस्येचे निराकरण करणे

तुम्ही तुमचे नाव बदलल्यानंतर, तुमची कॅशे आणि कुकी साफ करणे हे करा. कदाचित तुमची कॅशे आणि कुकी साफ केल्याने प्रत्येक उत्पादनामध्ये तुमचे नाव अपडेट होणार नाही. तुमचा उल्लेख केल्या गेलेल्या मागील Chat संभाषणांमध्ये तुमचे जुने नाव दिसू शकते.

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या कुकी साफ केल्यावर, तुम्हाला Google च्या नसलेल्या साइटवरून साइन आउट केले जाऊ शकते.

तुमची वैयक्तिक माहिती बदला

तुम्ही तुमची जन्मतारीख आणि लिंग यांसारखी वैयक्तिक माहिती बदलू शकता. तुम्ही तुमच्या खात्यावरील ईमेल अ‍ॅड्रेस आणि फोन नंबरदेखील बदलू शकता.
  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  2. "वैयक्तिक माहिती" या अंतर्गत, तुम्हाला बदलायच्या असलेल्या माहितीवर क्लिक करा.
  3. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

अधिक तपशील

नाव

तुम्ही तुमचे नाव हवे तितक्या वेळा बदलू शकता.
 

टोपणनाव

तुमचे टोपणनाव जोडण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी, माझ्याबद्दल किंवा account.google.com वर जा. account.google.com साठी, या सूचना फॉलो करा:

  1. वैयक्तिक माहिती वर क्लिक करा.
  2. तुमच्या नावाच्या उजवीकडे, आणि त्यानंतर वर क्लिक करा.
  3. "टोपणनाव" च्या बाजूला, संपादित करा Edit वर क्लिक करा.

तुमचे टोपणनाव बदलणे

जन्मतारीख

तुम्ही तुमच्या खात्यावर तुमची जन्मतारीख जोडल्यानंतर, तुम्ही ती हटवू शकत नाही. मात्र, तुम्ही ती संपादित करू शकता आणि ती कोण पाहू शकेल ते निवडू शकता.

महत्त्वाचे:

  • सर्व Google सेवांवरील खाते सुरक्षा आणि पर्सनलायझेशन यांसाठी Google तुमची जन्मतारीख वापरू शकते.
  • तुमची जन्मतारीख बदलल्याने वयानुसार प्रतिबंधित आशय किंवा सेवांवरील तुमच्या अ‍ॅक्सेसवर परिणाम होऊ शकतो. काही परिस्थितीमध्ये, तुम्हाला तुमच्या वयाची पडताळणी करणे हे करण्यास सांगितले जाऊ शकते.

तुमची जन्मतारीख बदलणे

तुमची जन्मतारीख कोण पाहू शकतात

Google सेवा वापरणाऱ्या इतर लोकांसोबत आम्ही तुमची जन्मतारीख आपोआप शेअर करत नाही. तुमची जन्मतारीख कोण पाहू शकेल हे नियंत्रित करण्यासाठी:

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडे, वैयक्तिक माहिती वर क्लिक करा.
  3. "मूलभूत माहिती" या अंतर्गत, जन्मतारीख वर क्लिक करा.
  4. तुमच्या जन्मतारीखेची माहिती आधीच एंटर केलेली नसल्यास ती भरा.
  5. "तुमची जन्मतारीख कोण पाहू शकतात ते निवडा" या अंतर्गत, फक्त मी किंवा कोणीही निवडा.

तुमची जन्मतारीख हायलाइट करणे

तुम्ही "तुमची जन्मतारीख कोण पाहू शकतात ते निवडा" हे कोणीही (किंवा लागू असल्यास, तुमची संस्था) यावर सेट करता, तेव्हा तुम्ही Google ला ती हायलाइट करू देता. उदाहरणार्थ, तुमच्या जन्मतारीखेच्या काही दिवस आधी, तुमचा प्रोफाइल फोटो जिथे दिसेल तिथे Google तो सुशोभित करू शकते. इतर लोक तुमच्यासोबत संवाद साधतात किंवा तुम्ही काही Google सेवांमध्ये तयार केलेला आशय पाहतात, तेव्हा ते तुमची जन्मतारीख आणि जन्मतारखेचे हायलाइट पाहू शकतात.

तुम्हाला तुमची जन्मतारीख दृश्यमान ठेवायची नसल्यास, "तुमची जन्मतारीख कोण पाहू शकतात ते निवडा" हे फक्तमी वर सेट करा आणि Google ती हायलाइट करणार नाही. तरीही, Google काही ठिकाणी तुमचा प्रोफाइल फोटो सुशोभित करण्यासारख्या गोष्टी करेल, पण त्या गोष्टी फक्त तुम्ही पाहू शकता.

टीप: तुमची जन्मतारीख योग्य तारखेच्या काही दिवस आधी हायलाइट केलेली नसल्यास, तुमची प्रोफाइल यामध्ये तुमची जन्मतारीख बरोबर असल्याची खात्री करा. तो इतरांना वेगळ्या तारखेला हायलाइट केल्याचे दिसत असल्यास, त्यांनी त्यांच्या Google Contacts मध्ये तुमची जन्मतारीख चुकीची एंटर केलेली असू शकते.

Google तुमची जन्मतारीख या काही मार्गांनी वापरते

Google पुढील गोष्टी करण्यासाठी तुमची जन्मतारीख वापरू शकते:

  • तुमच्या वयाची पडताळणी करणे आणि ठरावीक सेवा व वैशिष्ट्ये वापरणे हे करण्यासाठी तुमचे वय योग्य असल्याची खात्री करणे.
  • Google Search पेजवर जन्मतारखेची थीम कधी दाखवावी याबद्दल जाणून घेणे.
  • पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी आणि जाहिरातींसाठी तुमचा वयोगट निर्धारित करणे. तुम्ही तुमच्या जाहिरात सेटिंग्ज यामध्ये पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती बंद करू शकता.
लिंग

तुमच्या Google खाते च्या लिंग या विभागामध्ये तुमच्याकडे काही पर्याय आहेत. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमची लिंगासंबंधी माहिती नमूद करणे
  • तुमची लिंगासंबंधी माहिती नमूद न करणे निवडणे
  • कस्टम लिंगासंबंधी माहिती जोडणे आणि Google नी तुम्हाला कसे संबोधित करावे ते निवडणे

तुमची लिंगासंबंधी माहिती कोण पाहू शकते

बाय डीफॉल्ट, तुमची लिंगासंबंधी माहिती Google सेवा वापरणार्‍या इतर लोकांसोबत शेअर केली जात नाही. तुमची लिंगासंबंधी माहिती कोणी पहावी हे नियंत्रित करण्यासाठी, तुमच्या Google खाते च्या माझ्याबद्दल या विभागावर जा.

Google तुमची लिंगासंबंधी माहिती कशी वापरते

Google सेवा आणखी वैयक्तिक बनवण्यासाठी आम्ही तुमची लिंगासंबंधी माहिती वापरतो. तुम्ही तुमची लिंगासंबंधी माहिती नमूद करता तेव्हा, आम्हाला पुढील गोष्टींमध्ये मदत करता:

  • तुम्हाला संबोधित करणारे मेसेज आणि इतर मजकूर पर्सनलाइझ करणे. उदाहरणार्थ, तुमची लिंगासंबंधी माहिती पाहू शकणार्‍या लोकांना "त्याला मेसेज पाठवा" किंवा "तिच्या मंडळांमध्ये" यांसारखा मजकूर दिसेल.
  • जाहिरातींसारखा, तुम्हाला स्वारस्य असू शकणारा आणखी उपयुक्त, अनुकूल केलेला आशय देणे.

तुम्ही तुमची लिंगासंबंधी माहिती नमूद न केल्यास, आम्ही तुम्हाला लिंगनिरपेक्ष संज्ञा वापरून संबोधित करू, जसे की "त्यांना मेसेज पाठवा."

तुमचे लिंग बदलणे

इतर माहिती बदलणे

तुमचा Google खाते पासवर्ड बदलणे
  1. तुमचे Google खाते उघडा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. "सुरक्षा" विभागामध्ये, तुम्ही Google मध्ये कसे साइन इन करता हे निवडा.
  3. पासवर्ड निवडा. सुचवले गेल्यास, पुन्हा साइन इन करा.
  4. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा. क्लिष्ट पासवर्ड कसा तयार करायचा ते जाणून घ्या.

ऑनलाइन सुरक्षा आणि सुरक्षितता याविषयी आणखी माहिती मिळवणे.

तुमचा पासवर्ड बदलणे

इतर लोक तुमच्याबद्दल काय पाहतात ते नियंत्रित करणे

Google सेवांवर इतर लोक तुमच्याबद्दल कोणती माहिती पाहतात ते निवडण्यासाठी, तुमच्या Google खाते च्या माझ्याबद्दल या विभागावर जा.

तुम्ही कोणती माहिती बदलू शकता आणि ती कशी बदलावी ते जाणून घ्या.

तुमचे प्रोफाइल संपादित करणे

तुमचा टाइम झोन बदलणे

तुम्ही प्रवास करता तेव्हा, तुमच्या सध्याच्या टाइम झोनमधील इव्हेंट पाहू शकता.

Google Calendar मध्ये तुमचा टाइम झोन कसा बदलायचा ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14629239224220993421
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false
false