तुमचे फोटो आणि आसपासच्या परिसराबद्दल माहिती मिळवा

Google लेन्स सोबत तुम्ही तुमचे फोटो, तुमच्या आसपासच्या वस्तू आणि इमेज शोध यांचे तपशील मिळवू शकता किंवा त्यांवर कृती करू शकता.

टिपा:  

  • लेन्स सर्व Google भाषांतर भाषा मध्ये भाषांतर करू शकते.
  • खरेदी परिणाम ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, चिली, कोलंबिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, आयर्लंड, इटली, जपान, मलेशिया, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, फिलिपिन्स, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, यूएई, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध आहेत.

तुम्ही यावरून Google लेन्स वापरू शकता:

  • Google Photos
  • बहुतेक Android फोनवर Google Assistant
  • Pixel सारख्या काही Android फोनवर Google अ‍ॅप

तुमच्या फोटोंचे तपशील मिळवा आणि त्यांवर कृती करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. फोटो निवडा.
  3. Lens वर टॅप करा.
  4. तुमच्या फोटोनुसार, तपशील तपासा, कृती करा किंवा यासारखी उत्पादने शोधा. 

तुम्ही याचा फोटो घेतल्यास:

  • कपडे आणि घरगुती वस्तू: सारखी उत्पादने आणि ती कुठे खरेदी करायची ते शोधा. 
  • बारकोड: उत्पादनाविषयी ते कुठे खरेदी करावे यासारखी माहिती शोधण्यासाठी बारकोड वापरा.
  • व्यवसाय कार्ड: फोन नंबर किंवा पत्ता संपर्कावर सेव्ह करा.
  • पुस्तक: सारांश मिळवा आणि परीक्षणे वाचा.
  • इव्‍हेंट फ्लायर किंवा बिलबोर्ड: तुमच्या कॅलेंडरवर इव्हेंट जोडा.
  • लँडमार्क किंवा इमारत: ऐतिहासिक तथ्ये किंवा कामकाजाचे तास शोधा.
  • वस्तुसंग्रहालयातील पेंटिंग: कलाकाराविषयी वाचा आणि अधिक जाणून घ्या.
  • झाड किंवा प्राणी: जाती आणि पैदास यांविषयी अधिक जाणून घ्या.

टीप: मजकूर कॉपी करण्यासाठी, तुम्हाला कॉपी करायच्या असलेल्या शब्दांवर टॅप करा आणि ते निवडा.

Google Assistant च्या स्क्रीनशॉट सेटिंग्जचे निराकरण करणे

Google Assistant स्क्रीनशॉट घेत नसल्यास, समस्येचे निराकरण करण्यासाठी या पायऱ्या वापरून पहा:

पायरी १: तुमची Android सेटिंग्ज तपासणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, सेटिंग्ज अ‍ॅप Settings अ‍ॅप उघडा.
  2. अ‍ॅप्स आणि सूचना आणि त्यानंतर प्रगत वर टॅप करा.  
  3. डीफॉल्ट अ‍ॅप्स आणि त्यानंतर असिस्ट आणि व्हॉइस इनपुट वर टॅप करा.
  4. स्क्रीनशॉट वापरा सुरू करा.
पायरी २: तुमची Assistant सेटिंग्ज तपासणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा. 
  2. "सर्व सेटिंग्ज" या अंतर्गत, साधारण वर टॅप करा.
  3. स्क्रीनवरील संदर्भ वापरा सुरू करा.

आणखी मदत मिळवणे किंवा फीडबॅक पाठवणे

Pixel फोन

मदत फोरमला भेट देणे

तुम्ही Pixel फोन मदत फोरम मध्ये प्रश्न विचारू शकता आणि उत्तरे शोधू शकता.

आमच्याशी संपर्क साधणे

  1. तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर, तुमचे Settings ॲप Settings अ‍ॅप उघडा.
  2. खाली स्क्रोल करा आणि टिपा आणि सपोर्ट वर टॅप करा.
  3. फोन किंवा चॅट सपोर्ट निवडा.

फीडबॅक पाठवणे

“Ok Google, फीडबॅक पाठव” असे म्हणा किंवा पायऱ्या फॉलो करा:

  1.  तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा. 
  2. सर्वात वरती उजवीकडे, अधिक आणखी आणि त्यानंतर फीडबॅक पाठवा वर टॅप करा.

टीप: आम्ही समस्येचे निराकरण करण्यासाठी फीडबॅक वापरतो, पण आम्ही तुम्हाला थेट उत्तर देऊ शकत नाही.

इतर Android फोन

मदत फोरमला भेट देणे

तुम्ही Android मदत फोरम मध्ये प्रश्न विचारू शकता आणि उत्तरे शोधू शकता.

तुमच्या निर्मात्याशी संपर्क साधणे

तुमच्या Android फोन निर्मात्याकडून मदत मिळवणे.

फीडबॅक पाठवणे

“Ok Google, फीडबॅक पाठव” असे म्हणा किंवा पायऱ्या फॉलो करा:

  1.  तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा. 
  2. सर्वात वरती उजवीकडे, अधिक आणखी आणि त्यानंतर फीडबॅक पाठवा वर टॅप करा.

टीप: आम्ही समस्येचे निराकरण करण्यासाठी फीडबॅक वापरतो, पण आम्ही तुम्हाला थेट उत्तर देऊ शकत नाही.

तुमची Google Lens अ‍ॅक्टिव्हिटी पाहणे आणि हटवणे

तुमची Google Lens अ‍ॅक्टिव्हिटी शोधण्यासाठी आणि हटवण्यासाठी, माझी अ‍ॅक्टिव्हिटी वरील लेन्स पेज वर जा. तुमच्या Google खाते मध्ये काय सेव्ह केले जाते हे नियंत्रित करणे

तुम्हाला तुमची Google Lens अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या Google खाते वर सेव्ह करायची नसल्यास, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा. तुमची वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी शोधणे व नियंत्रित करणे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1412534621899090827
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false