तुमचे फोटो आणि आसपासच्या परिसराबद्दल माहिती मिळवा

Google लेन्स सोबत तुम्ही तुमचे फोटो, तुमच्या आसपासच्या वस्तू आणि इमेज शोध यांचे तपशील मिळवू शकता किंवा त्यांवर कृती करू शकता.

टिपा:  

  • लेन्स सर्व Google भाषांतर भाषा मध्ये भाषांतर करू शकते.
  • खरेदी परिणाम ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, चिली, कोलंबिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, आयर्लंड, इटली, जपान, मलेशिया, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, फिलिपिन्स, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, यूएई, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध आहेत.

Google लेन्स तुम्ही Google Photos किंवा Google अ‍ॅपसोबत वापरू शकता, परंतु कॅमेरा किंवा Google Assistant सोबत नाही.

तुमच्या फोटोंचे तपशील मिळवा आणि त्यांवर कृती करा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. फोटो निवडा.
  3. Lens वर टॅप करा.
  4. तुमच्या फोटोच्या आधारे, तपशील तपासा किंवा कृती करा.

तुम्ही पुढील गोष्टींचा फोटो घेतल्यास: 

  • कपडे आणि घरगुती वस्तू: एकसारखी उत्पादने आणि ती कुठे खरेदी करायची हे शोधा.
  • बारकोड: उत्पादनाविषयी ते कुठे खरेदी करावे यासारखी माहिती शोधण्यासाठी बारकोड वापरा.
  • व्यवसाय कार्ड: फोन नंबर किंवा पत्ता संपर्कावर सेव्ह करा.
  • पुस्तक: सारांश मिळवा आणि परीक्षणे वाचा.
  • इव्‍हेंट फ्लायर किंवा बिलबोर्ड: तुमच्या कॅलेंडरवर इव्हेंट जोडा.
  • लँडमार्क किंवा इमारत: ऐतिहासिक तथ्ये किंवा कामकाजाचे तास शोधा.
  • वस्तुसंग्रहालयातील पेंटिंग: कलाकाराविषयी वाचा आणि अधिक जाणून घ्या.
  • झाड किंवा प्राणी: जाती आणि पैदास यांबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: मजकूर कॉपी करण्यासाठी, तुम्हाला कॉपी करायच्या असलेल्या शब्दांवर टॅप करा आणि ते निवडा.

तुमची Google Lens अ‍ॅक्टिव्हिटी पाहणे आणि हटवणे

तुमची Google Lens अ‍ॅक्टिव्हिटी पाहण्यासाठी आणि हटवण्यासाठी, माझी अ‍ॅक्टिव्हिटी वरील Lens पेज वर जा. तुमच्या Google खाते मध्ये काय सेव्ह केले आहे हे नियंत्रित करणे

तुम्हाला तुमची Google Lens अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या Google खाते वर सेव्ह करायची नसल्यास, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा. तुमची वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी पाहणे व नियंत्रित करणे.

तुम्ही Google Lens सह शोधण्यासाठी वापरलेल्या इमेज तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी ने सेव्ह करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, "व्हिज्युअल शोध इतिहास समाविष्ट करा" हे सेटिंग बंद करा. व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग बाय डीफॉल्ट बंद असते. तुमचा व्हिज्युअल शोध इतिहास कसा व्यवस्थापित करावा हे जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13872549118569630227
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false