भागीदार शेअरिंग सेट करा

तुम्ही विशिष्ट लोकांचे किंवा विशिष्ट तारखेपासून फोटो शेअर करू शकता. तुमच्या खात्यामध्ये बॅकअप घेतल्यामुळे फोटो आपोआप शेअर केले जातील.

महत्त्वाचे: विशिष्ट लोकांचे फोटो शेअर करणे सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही.

तुम्‍ही सुरुवात करण्‍यापूर्वी

डाउनलोड करा आणि Google Photos ॲप इंस्टॉल करा.

तुमच्या भागीदारासोबत तुमचे फोटो शेअर करा

महत्त्वाचे: शेअर केलेल्या फोटोच्या तुमच्या आवृत्तीमध्ये तुम्ही केलेले कोणतेही बदल तुमच्या भागीदाराने आधीपासून सेव्ह केलेल्या कोणत्याही प्रतींवर लागू होणार नाहीत. यामध्ये तुमच्या लॉक्ड फोल्डर मधील संपादने, हटवणे किंवा ट्रान्सफर यांचा समावेश आहे. लॉक्ड फोल्डर बद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या भागीदारासोबत शेअर करता, तेव्हा तुम्ही शेअर करण्याचे निवडलेल्या फोटोचा बॅकअप घेतल्यानंतर ते लगेच तुमच्या भागीदाराला मिळतील. तुमच्या भागीदाराने भागीदार शेअरिंगसाठी तुमचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर, ते त्यांचे फोटो तुमच्यासोबत परत शेअर करण्यासाठी भागीदार शेअरिंग वापरण्याचे निवडू शकतात.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमचे Google खाते वापरून साइन इन करा.
  3. तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google Photos सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. शेअरिंग आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग आणि त्यानंतर सुरुवात करा वर टॅप करा.
  5. ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा किंवा निवडा. तुम्ही फक्त Google खाते असलेल्या व्यक्तीला आमंत्रित करू शकता.
  6. तुमच्या भागीदार खात्याला जोडायचे असलेले फोटो निवडा.
  7. पुढील वर टॅप करा.
  8. सर्व योग्य वाटत असल्यास, आमंत्रण पाठवा वर टॅप करा.
  9. पर्यायी: तुमच्या भागीदाराचे फोटो पाहण्यासाठी, त्यांनी तुमचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर, त्यांना त्यांचे फोटो तुमच्यासह शेअर करण्यास सांगा.

दुसऱ्या व्यक्तीसह भागीदार शेअरिंग करण्यासाठी किंवा आमंत्रण मिळवण्याकरिता, सध्याच्या भागीदारासह शेअर करणे थांबवा.

फेस ग्रुपनुसार फिल्टर करा

फेस ग्रुप परिपूर्ण नाही. फेस ग्रुपप्रमाणे फिल्टर केल्यामुळे, कधीतरी तुम्ही निवडलेल्या लोकांशी असे फोटो शेअर केले जाऊ शकतात ज्यात ते नाहीत.

तारखेनुसार फिल्टर करा

काही वेळा, फोटोची तारीख चुकीची असू शकते. उदाहरणार्थ, फोटो स्कॅन केलेला असल्यास किंवा कॅमेऱ्याचे घड्याळ योग्यरीत्या सेट केलेले नसल्यास, फोटोची तारीख चुकीची असू शकते. तारखेनुसार फिल्टर केल्यामुळे त्याचा असा परिणाम होऊ शकतो की, निवडलेल्या तारखेच्या श्रेणीमध्ये नसलेले फोटो शेअर केले जाऊ शकतात.

भागीदार शेअरिंगचे आमंत्रण स्वीकारा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. आमंत्रित केलेले Google खाते वापरून साइन इन करा.
  3. सर्वात वरती, शेअरिंग वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  4. तुम्हाला स्वीकारायच्या असलेल्या आमंत्रणावर टॅप करा आणि त्यानंतर स्वीकारा वर टॅप करा.
  5. पर्यायी: तुम्ही तुमची फोटो लायब्ररी तुमच्या भागीदारासह पुन्हा शेअर करू शकता. सर्वात वरती, आणखी 더보기 आणि त्यानंतर पुन्हा शेअर करा वर टॅप करा.

टीप: तुम्ही ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीने तुमच्यासह भागीदार शेअरिंग सुरू केल्यास, तुम्ही आमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यांना ब्लॉक करू शकता. एखाद्या व्यक्तीला ब्लॉक कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

तुमच्या भागीदाराचे फोटो शोधा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमचे Google खाते वापरून साइन इन करा.
  3. सर्वात वरती, शेअरिंग  वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  4. तुमच्या भागीदाराच्या नावावर टॅप करा.
तुमच्या भागीदाराचे फोटो सेव्ह करा

तुम्ही तुमच्या भागीदाराचे फोटो सेव्ह केल्यास, ते तुमच्या Google Photos खाते, Photos चे दृश्य, शोध परिणाम आणि मेमरी यांमध्ये दिसतील.

तुमचा भागीदार तुमच्यासोबत भागीदार शेअरिंगद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे, तोपर्यंत तुम्ही भागीदार शेअरिंगमधून सेव्ह करता ते फोटो व व्हिडिओ तुमच्या स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाहीत.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमचे Google खाते वापरून साइन इन करा.
  3. तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google Photos सेटिंग्ज आणि त्यानंतर शेअरिंग आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग वर टॅप करा.
  4. सेटिंग्ज बदलण्यासाठी तुमच्या फोटोमध्ये सेव्ह करा वर टॅप करा.
    • सर्व फोटो: तुमच्या भागीदाराचे शेअर केलेले फोटो सेव्ह केले जातील.
    • विशिष्ट लोकांचे फोटो: तुमच्या फेस ग्रुपमधून निवडा. Google Photos तुमच्या भागीदाराच्या फोटोमधील अशा कोणत्याही फेस ग्रुपना ओळखते तेव्हा, ते तुमच्या Google Photos खात्यामध्ये फोटो आपोआप सेव्ह करते.

तुमच्या भागीदाराने Photos खात्यामधून फोटो हटवल्यास, तो तुमच्या भागीदार शेअरिंगमधून काढून टाकला जातो. फोटो हटवला जाण्यापूर्वी तुम्ही तो सेव्ह केल्यास, तुम्हाला तो अजूनही Photos लायब्ररीमध्ये दिसू शकतो.

तुम्ही तुमच्या भागीदाराचे अलीकडे सेव्ह केलेले फोटो हटवा
तुम्ही तुमच्या भागीदाराच्या फोटोंमधून सेव्ह केलेला फोटो हटवल्यास, तो तुमच्या भागीदाराच्या खात्यामधून हटवला जाणार नाही.
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर photos.google.com/search/_tra_वर जा. या पेजवर तुम्ही तुमच्या भागीदाराकडून सेव्ह केलेल्या फोटोंसह अलीकडे जोडलेले फोटो असतील.
  2. तुम्हाला हटवायचा असलेला फोटो निवडा.
  3. हटवा हटवा वर क्लिक करा.

सूचना बंद करा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. आमंत्रित केलेले Google खाते वापरून साइन इन करा.
  3. तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google Photos सेटिंग्ज आणि त्यानंतर शेअरिंग आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग वर टॅप करा.
  4. सूचना बंद करा.

भागीदाराला काढून टाका

तुम्ही तुमचा भागीदार काढून टाकल्यास, ते तुम्ही शेअर केलेले फोटो अ‍ॅक्सेस करू शकत नाही आणि तुम्ही त्यांचे फोटो अ‍ॅक्सेस करू शकत नाही. तुमच्या Google Photos खात्यावर कोणतेही आधीपासून सेव्ह केलेले फोटो तुम्ही आणि तुमचा भागीदार अजूनही शोधू शकता. तुम्ही काढून टाकलेल्या भागीदारासह पुन्हा कधीही शेअर करू शकता. तुमच्या भागीदाराचे फोटो कसे सेव्ह करावे ते जाणून घ्या.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. आमंत्रित केलेले Google खाते वापरून साइन इन करा.
  3. तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google Photos सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. शेअरिंग आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग आणि त्यानंतर भागीदार काढून टाका वर टॅप करा.

फोटोवरील तुमच्या भागीदाराचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे

तुम्ही भागीदार शेअरिंगमधून फोटो काढून टाकल्यास, तुमच्या भागीदाराला भागीदार शेअरिंगध्ये तो फोटो अ‍ॅक्सेस करता येणार नाही. तुमच्या भागीदाराला त्यांच्या Google Photos खात्यामध्ये आधीपासून सेव्ह केलेले फोटो तरीही शोधता येतील.

महत्त्वाचे: तुम्ही फक्त तुमच्या मालकीचे फोटो काढून टाकू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos ॲप उघडा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  3. भागीदार शेअरिंग वर टॅप करा.
  4. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या फोटोवर टॅप करा.
  5. सर्वात वरती, आणखी आणि त्यानंतर काढून टाका आणि त्यानंतर काढून टाका वर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14592335245932081384
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false