भागीदार शेअरिंग सेट करा

तुम्ही विशिष्ट लोकांचे किंवा विशिष्ट तारखेपासून फोटो शेअर करू शकता. तुमच्या खात्यामध्ये बॅकअप घेतल्यामुळे फोटो आपोआप शेअर केले जातील.

महत्त्वाचे: विशिष्ट लोकांचे फोटो शेअर करणे सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही.

तुमच्या भागीदारासोबत तुमचे फोटो शेअर करा

महत्त्वाचे: शेअर केलेल्या फोटोच्या तुमच्या आवृत्तीमध्ये तुम्ही केलेले कोणतेही बदल तुमच्या भागीदाराने आधीपासून सेव्ह केलेल्या कोणत्याही प्रतींवर लागू होणार नाहीत. यामध्ये तुमच्या लॉक्ड फोल्डर मधील संपादने, हटवणे किंवा ट्रान्सफर यांचा समावेश आहे. लॉक्ड फोल्डर बद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या भागीदारासोबत शेअर करता, तेव्हा तुम्ही शेअर करण्याचे निवडलेल्या फोटोचा बॅकअप घेतल्यानंतर ते लगेच तुमच्या भागीदाराला मिळतील. तुमच्या भागीदाराने भागीदार शेअरिंगसाठी तुमचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर, ते त्यांचे फोटो तुमच्यासोबत परत शेअर करण्यासाठी भागीदार शेअरिंग वापरण्याचे निवडू शकतात.

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. तुमचे Google खाते वापरून साइन इन करा.
  3. सेटिंग्ज  आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग आणि त्यानंतर सुरुवात करा वर क्लिक करा.
  4. ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा किंवा निवडा. तुम्ही फक्त Google खाते असलेल्या व्यक्तीला आमंत्रित करू शकता.
  5. तुमच्या भागीदार खात्याला जोडायचे असलेले फोटो निवडा.
  6. पुढील वर क्लिक करा.
  7. सर्व योग्य वाटत असल्यास, आमंत्रण पाठवा वर क्लिक करा.
  8. पर्यायी: तुमच्या भागीदाराचे फोटो शोधण्यासाठी, त्यांनी तुमचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यांना तुमच्यासह भागीदार शेअरिंग करायला सांगा.

दुसऱ्या व्यक्तीसह भागीदार शेअरिंग करण्यासाठी किंवा आमंत्रण मिळवण्याकरिता, सध्याच्या भागीदारासह शेअर करणे थांबवा.

फेस ग्रुपनुसार फिल्टर करा

फेस ग्रुप परिपूर्ण नाही. फेस ग्रुपप्रमाणे फिल्टर केल्यामुळे, कधीतरी तुम्ही निवडलेल्या लोकांशी असे फोटो शेअर केले जाऊ शकतात ज्यात ते नाहीत.

तारखेनुसार फिल्टर करा

काही वेळा, फोटोची तारीख चुकीची असू शकते. उदाहरणार्थ, फोटो स्कॅन केलेला असल्यास किंवा कॅमेऱ्याचे घड्याळ योग्यरीत्या सेट केलेले नसल्यास, फोटोची तारीख चुकीची असू शकते. तारखेनुसार फिल्टर केल्यामुळे त्याचा असा परिणाम होऊ शकतो की, निवडलेल्या तारखेच्या श्रेणीमध्ये नसलेले फोटो शेअर केले जाऊ शकतात.

भागीदार शेअरिंगचे आमंत्रण स्वीकारा

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. आमंत्रित केलेले Google खाते वापरून साइन इन करा.
  3. सर्वात वरती, शेअरिंग वर क्लिक करा.
  4. तुम्हाला स्वीकारायच्या असलेल्या आमंत्रणावर क्लिक करा. त्यानंतर, स्वीकार वर क्लिक करा.
  5. पर्यायी: तुम्ही तुमच्या भागीदारासह फोटो पुन्हा शेअर करू शकता. सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर पुन्हा शेअर करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीने तुमच्यासह भागीदार शेअरिंग सुरू केल्यास, तुम्ही आमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यांना ब्लॉक करू शकता. एखाद्या व्यक्तीला ब्लॉक कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

तुमच्या भागीदाराचे फोटो शोधा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग वर क्लिक करा.
  3. तुमच्या भागीदाराच्या नावावर क्लिक करा.
तुमच्या भागीदाराचे फोटो सेव्ह करा

तुम्ही तुमच्या भागीदाराचे फोटो सेव्ह केल्यास, ते तुमच्या Google Photos खाते, Photos चे दृश्य, शोध परिणाम आणि मेमरी यांमध्ये दिसतील.

तुमचा भागीदार तुमच्यासोबत भागीदार शेअरिंगद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे, तोपर्यंत तुम्ही भागीदार शेअरिंगमधून सेव्ह करता ते फोटो व व्हिडिओ तुमच्या स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाहीत.

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. सर्वात वर, सेटिंग्ज  आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग वर क्लिक करा.
  3. पर्याय पाहण्यासाठी "भागीदार शेअरिंग" मध्ये, खाते मध्ये सेव्ह करा वर क्लिक करा.
  4. सेव्ह करा वर क्लिक करा.
    • सर्व फोटो: भागीदार शेअरिंगमधील कोणताही फोटो सेव्ह केला जाईल.
    • निवडलेल्या लोकांचे फोटो: तुमच्या फेस ग्रुपमधून निवडा. Google Photos तुमच्या भागीदाराच्या फोटोंमधील अशा कोणत्याही फेस ग्रुपना ओळखते तेव्हा, ते फोटो आपोआप सेव्ह करते.
  5. पूर्ण झाले वर क्लिक करा.

तुमच्या भागीदाराने Photos खात्यामधून फोटो हटवल्यास, तो तुमच्या भागीदार शेअरिंगमधून काढून टाकला जातो. फोटो हटवला जाण्यापूर्वी तुम्ही तो सेव्ह केल्यास, तुम्हाला तो अजूनही Photos लायब्ररीमध्ये दिसू शकतो.

तुम्ही तुमच्या भागीदाराचे अलीकडे सेव्ह केलेले फोटो हटवा
तुम्ही तुमच्या भागीदाराच्या फोटोंमधून सेव्ह केलेला फोटो हटवल्यास, तो तुमच्या भागीदाराच्या खात्यामधून हटवला जाणार नाही.
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर photos.google.com/search/_tra_वर जा. या पेजवर तुम्ही तुमच्या भागीदाराकडून सेव्ह केलेल्या फोटोंसह अलीकडे जोडलेले फोटो असतील.
  2. तुम्हाला हटवायचा असलेला फोटो निवडा.
  3. हटवा हटवा वर क्लिक करा.

सूचना बंद करा

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. आमंत्रित केलेले Google खाते वापरून साइन इन करा.
  3. सर्वात वर, सेटिंग्ज  आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग वर क्लिक करा.
  4. सूचना बंद करा.

भागीदाराला काढून टाका

तुम्ही तुमच्या भागीदाराला काढून टाकल्यास, तुम्ही शेअर केलेले फोटो त्यांना अ‍ॅक्सेस करता येणार नाहीत आणि तुम्हाला त्यांचे फोटो अ‍ॅक्सेस करता येणार नाहीत. तुमच्या Google Photos खात्यावर आधीपासून सेव्ह केलेले फोटो तुम्हाला आणि तुमच्या भागीदाराला तरीही शोधता येतील. तुम्ही काढून टाकलेल्या भागीदाराशी पुन्हा कधीही शेअर करू शकता. तुमच्या भागीदाराचे फोटो कसे सेव्ह करावे ते जाणून घ्या.

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. आमंत्रित केलेले Google खाते वापरून साइन इन करा.
  3. सर्वात वर, सेटिंग्ज  आणि त्यानंतर भागीदार शेअरिंग आणि त्यानंतर भागीदार काढून टाका वर क्लिक करा.

फोटोवरील तुमच्या भागीदाराचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे

तुम्ही शेअर केलेल्या लायब्ररीमधून एखादा फोटो काढून टाकल्यास, तुमच्या भागीदाराला शेअर केलेल्या लायब्ररीमध्ये तो फोटो अ‍ॅक्सेस करता येणार नाही. तुमच्या भागीदाराला त्यांच्या Google Photos खात्यामध्ये आधीपासून सेव्ह केलेले फोटो तरीही शोधता येतील.

महत्त्वाचे: तुम्ही फक्त तुमच्या मालकीचे फोटो काढून टाकू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. तुमचे Google खाते वापरून साइन इन करा.
  3. सर्वात वरती, शेअरिंग वर क्लिक करा.
  4. भागीदार शेअरिंग वर क्लिक करा.
  5. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या फोटोवर क्लिक करा.
  6. सर्वात वरती, काढून टाका वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17440940471357931789
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false