तुमच्या फेस ग्रुपला लेबल करा

तुम्ही तुमच्या फेस ग्रुपला “मी” असे लेबल लावल्यावर, तुम्ही:

  • आणखी पर्सनलाइझ केलेल्या क्रीएशन मिळवता. उदाहरणार्थ, तुमचे फोटो असलेला हायलाइट व्हिडिओ.
  • पर्सनलाइझ केलेला शोध मिळवा. तुम्ही स्वतःचे फोटो सहजपणे शोधण्यासाठी “मी” शोधू शकता.
  • यामुळे तुमच्यासोबत सूचना शेअर करणे संपर्कांसाठी अधिक सोपे होते. तुमचे संपर्क हे तुमचे फोटो घेतात, तेव्हा त्यांना त्यांच्याकडे असलेले फोटो तुमच्यासोबत शेअर करण्याची सूचना मिळू शकते.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही.

तुमचा फेस ग्रुप कंफर्म करा आणि तुमच्या संपर्कांना तुमच्यासोबत फोटो शेअर करण्यासाठी सूचना मिळवण्यात मदत करा

तुम्ही तुमचे “मी” फेस लेबल निवडल्यास, तुम्ही तुमच्या संपर्कांच्या डिव्हाइसवरील Google Photos ॲपला तुमच्या इमेज गटबद्ध करण्यात मदत करता. त्यानंतर, Google Photos त्यांना त्यांच्याकडे असलेले तुमचे फोटो तुमच्यासह शेअर करण्याच्या सूचना पाठवू शकते.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com उघडा.
  2. सर्वात वर, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "एकसारखे चेहरे गटबद्ध करा" च्या बाजूला, डाउन ॲरो Down arrow वर क्लिक करा.
  4. फेस ग्रुप आधीच सुरू केलेले नसल्यास, ते सुरू करा.
  5. "मी असे लेबल केलेला कोणताही चेहरा नाही” अंतर्गत, निवडा वर क्लिक करा.
  6. तुमचा चेहरा निवडा. ओके वर क्लिक करा. हे आपोआप संपर्कांना तुमचा चेहरा ओळखण्यात मदत करा सुरू करेल.

तुमच्यासह फोटो शेअर करण्याच्या सूचना कोणाला मिळू शकतात

  • तुम्ही Google Photos किंवा Gmail मध्ये संवाद साधलेल्या संपर्कांना त्यांच्याकडे असलेले तुमचे फोटो तुमच्यासह शेअर करण्याची सूचना मिळू शकते.
  • तुम्ही नवीन संपर्कांसह Google Photos शेअर केलेले अल्बम किंवा Gmail द्वारे संवाद साधल्यास, या नवीन संपर्कांना तुमच्यासह फोटो शेअर करण्याची सूचना मिळू शकते.
  • तुम्ही काही संपर्कांचे शेअर केलेले अल्बम किंवा ईमेल हटवल्यास, त्यांना यापुढे तुमच्यासह शेअर करण्याच्या सूचना मिळणार नाहीत.

कोणत्या संपर्कांना सध्या सूचना मिळू शकतात हे तपासण्यासाठी, photos.google.com/settings/contacts वर जा.

एखाद्या व्यक्तीला सूचना मिळू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. एखाद्याला कसे ब्लॉक करायचे ते जाणून घ्या.

जाणून घेण्यासारख्या गोष्टी

तुम्ही तुमच्या "मी" फेस ग्रुपला लेबल केल्यास आणि तुमच्या संपर्कांना फोटोमध्ये तुमचा चेहरा ओळखण्यास मदत केल्यास:

  • तुमच्या संपर्कांना तुमचे फोटो तुमच्यासह शेअर करण्याच्या सूचना मिळू शकतात पण तुम्हाला फोटोमध्ये सार्वजनिकरीत्या टॅग केले जाणार नाही. Google Photos वर सार्वजनिक टॅगिंग उपलब्ध नाही.
  • तुमच्या संपर्कांना शेअर करण्याची सूचना मिळू शकते पण त्यांना तुमच्यासह शेअर करायचे आहे का हे ते निवडू शकतात.
  • तुम्ही फेस ग्रुपला "मी" असे लेबल केले नसले तरीही तुमच्या संपर्कांनी पूर्वी तुमचे फोटो शेअर केले असल्यास त्यांना तुमच्यासोबत शेअर करण्याच्या सूचना मिळू शकतात.

“मी” फेस लेबल बदला किंवा काढून टाका

तुम्ही चुकीचा चेहरा निवडला असल्यास, तुम्ही "मी" चेहरा लेबल योग्य चेहऱ्यावर बदलू शकता. तुम्ही तुमचे फेस ग्रुप काढून टाकू शकता पण तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या थोड्या कमी क्रीएशन मिळतील आणि तुमच्या संपर्कांना तुमच्यासह शेअर करण्याच्या सूचना मिळवणे थोडे कठीण होईल.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com उघडा.
  2. सर्वात वर, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "एकसारखे चेहरे गटबद्ध करा" च्या बाजूला, डाउन ॲरो Down arrow वर क्लिक करा.
  4. मी असे लेबल केलेला चेहरा वर क्लिक करा.
  5. योग्य फेस ग्रुपची खात्री करण्यासाठी चेहरा निवडा किंवा काढून टाका आणि त्यानंतर लेबल काढून टाका वर क्लिक करा.

तुमच्या “मी” फेस लेबलनुसार संपर्कांना सूचना मिळणे थांबवा

या लेबलनुसार तुमचे फोटो शेअर करण्यासाठी तुमचे संपर्क सूचना मिळवू शकणार नाहीत, पण तरीही तुम्हाला पर्सनलाइझ केलेले हायलाइट व्हिडिओ आणि ॲनिमेशन मिळतील.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com उघडा
  2. सर्वात वर, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "एकसारखे चेहरे गटबद्ध करा" च्या बाजूला, डाउन ॲरो Down arrow वर क्लिक करा.
  4. संपर्कांना तुमचा चेहरा ओळखण्यात मदत करा बंद करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7603962137674888565
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false