तुमच्या फोटोंची स्थाने समजून घेणे, शोधणे आणि संपादित करणे

तुमचे फोटो कुठे काढले गेलेत त्यानुसार ते संगतवार लावण्यासाठी, शोधण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोटोंची स्थाने वापरू शकता.

तुमच्या फोटोला स्थान असू शकते जर:

  • तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेराने फोटोसह तुमचे स्थान सेव्ह केले असेल.
  • तुम्ही स्थान जोडले असेल.
  • फोटोमध्ये आढळलेल्या खुणेच्या जागा आणि तुमच्या इतर फोटोमधील स्थाने यांसारख्या माहितीच्या आधारे Google Photos ने तुमच्या स्थानाचा अंदाज लावला असेल.

तुमच्या फोटोंचे स्थान व्यवस्थापित करा

तुमच्या फोटो किंवा व्हिडिओच्या स्थानाची माहिती व्यवस्थापित करण्यासाठी, स्थान नसलेल्या फोटोमध्ये तुम्ही स्थान जोडू शकता किंवा Photos ने जोडलेले अंदाजे स्थान संपादित करू शकता अथवा काढून टाकू शकता.

स्थान जोडा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, photos.google.com वर जा.
  2. फोटो किंवा व्हिडिओ उघडा.
  3. माहिती माहिती आणि त्यानंतर स्थान जोडा वर क्लिक करा.
    • तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या स्थानांपैकी एक स्थान जोडा किंवा निवडा.

अंदाजे स्थान संपादित करा किंवा काढून टाका

महत्त्वाचे: तुम्ही फक्त अंदाजे स्थाने अपडेट करू शकता किंवा काढून टाकू शकता. फोटो किंवा व्हिडिओचे स्थान तुमच्या कॅमेऱ्याद्वारे आपोआप जोडले गेले असल्यास, तुम्ही ते स्थान संपादित करू शकत नाही किंवा काढून टाकू शकत नाही.

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, photos.google.com वर जा.
  2. फोटो किंवा व्हिडिओ उघडा.
  3. माहिती माहिती वर क्लिक करा.
  4. स्थानाच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा वर क्लिक करा.
    • तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या स्थानांपैकी एक स्थान जोडा किंवा निवडा.
    • अंदाजे स्थान काढून टाकण्यासाठी, स्थान काढून टाका वर क्लिक करा.

तुम्ही एकाहून अधिक फोटोचे स्थानदेखील संपादित करू शकता:

  1. तुमच्या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. तुम्हाला हवे असलेले फोटो निवडा.
  3. अधिक आणखी आणि त्यानंतर स्थान संपादित करा वर क्लिक करा.
    • स्थान जोडा किंवा निवडा.
    • स्थान काढून टाकण्यासाठी, स्थान काढून टाका वर क्लिक करा.
टीप: तुम्ही एकाहून अधिक फोटो किंवा व्हिडिओ निवडता तेव्हा, तुम्हाला Google Photos हे तुमच्या कॅमेऱ्याद्वारे जोडलेली स्थानाची माहिती संपादित करू शकत नसल्याचे कळवू शकते. पुढे जाण्यासाठी, त्या फोटो किंवा व्हिडिओंची निवड रद्द करा.

स्थानाच्या गहाळ माहितीचा अंदाज लावा

महत्त्वाचे: तुम्ही स्थानाचे अंदाज बंद केल्यास, मागील अंदाजे स्थाने काढून टाकली जात नाहीत, पण तुम्ही ती संपादित करणे किंवा हटवणे हे करू शकता.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. सर्वात वरती, सेटिंग्ज आणि त्यानंतर स्थान वर क्लिक करा.
  3. गहाळ स्थानांच्या माहितीचा अंदाज लावणे सुरू किंवा बंद करा.

एखादा स्थान असलेला फोटो शेअर करा

तुम्ही Google Photos वापरून फोटो शेअर करणे हे केल्यास, तुम्ही तुमच्या फोटोचे स्थान जोडले असल्यास, बदलले असल्यास किंवा तुमच्या कॅमेराने दिलेले असल्यास, ते शेअर केले जाऊ शकते.

तुमचे स्थान प्रत्येक शेअर केलेला अल्बम, लिंक किंवा तुम्ही तयार केलेले अथवा सामील झालेले संभाषण यांमध्ये शेअर केले जावे की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता. तुम्ही भागीदार शेअरिंग सेट केल्यास, तुम्ही शेअर केलेल्या सर्व फोटोमध्ये स्थानाचे तपशील समाविष्ट असतील. 

तुम्ही तुमच्या फोटोचे स्थान शेअर करण्याचे निवडल्यास पुढील परिस्थिती उद्भवतील: 

  • तुम्ही फोटोचे अंदाजे स्थान जोडल्यास किंवा संपादित केल्यास, त्यानंतर ते Google Photos वर एखाद्या व्यक्तीसह शेअर केल्यास, तुम्ही स्थानदेखील शेअर करता.
  • तुमच्या कॅमेराने स्थान जोडल्यास आणि तुम्ही तो फोटो Google Photos वर शेअर केल्यास, तो फोटो कॅमेराद्वारे दिलेले स्थान दाखवतो.
  • तुम्ही Google Photos ने अंदाजे दाखवलेल्या स्थानासह फोटो शेअर केल्यास, स्थान शेअर केले जाणार नाही.

याचा परिणाम तुम्ही Google Photos च्या बाहेर शेअर केलेले फोटो किंवा व्हिडिओ यांवर होत नाही, उदाहरणार्थ, तुम्ही फोटो अथवा व्हिडिओ डाउनलोड करून ते एखाद्या व्यक्तीला ईमेल करता तेव्हा. अशा वेळी, तुमच्या डिव्हाइसने सेव्ह केलेले मूळ स्थान तुम्ही Google Photos मध्ये केलेल्या कोणत्याही संपादनाशिवाय दाखवले जाते.

तुम्ही तुमच्या फोटोची स्थाने लोकांपासून लपवली तरीदेखील ते तुमच्या फोटोमधील खुणेच्या जागांच्या आधारे अंदाज लावू शकतात.

शेअर केलेल्या अल्बममध्ये तुमच्या स्थानाचे तपशील शेअर करा

तुम्ही शेअर केलेल्या अल्बममध्ये फोटो जोडता तेव्हा तुमच्या फोटोचे स्थानसंबंधित तपशील प्रत्येक अल्बममध्ये शेअर करावे की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. शेअरिंग वर क्लिक करा.
  3. शेअर केलेला अल्बम निवडा.
  4. सर्वात वर, आणखी More and then पर्याय वर क्लिक करा.
  5. फोटोचे स्थान शेअर करा हे सुरू किंवा बंद करा.

तुम्ही नवीन शेअर केलेला अल्बम तयार करता तेव्हा तुमच्या फोटोचे स्थानसंबंधित तपशील शेअर करावे की नाही हेदेखील तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. शेअरिंग and then शेअर केलेला अल्बम तयार करा वर क्लिक करा.
  3. नवीन शेअर केलेल्या अल्बमसाठी शीर्षक आणि फोटो जोडा.
  4. सर्वात वरती, शेअर कराand thenअल्बमसंबंधित पर्याय वर क्लिक करा.
  5. फोटोचे स्थान शेअर करा हे सुरू किंवा बंद करा.

टीप: तुम्ही पहिल्यांदा खाजगी अल्बम शेअर करता तेव्हादेखील हा पर्याय दिसतो.

संभाषणांमध्ये तुमच्या स्थानाचे तपशील शेअर करा

तुम्ही नवीन तयार केलेल्या संभाषणामध्ये फोटो जोडता तेव्हा, त्यामध्ये स्थानाचे तपशील समाविष्ट केलेले नसतील. स्थान शेअरिंग हे बाय डीफॉल्ट बंद केलेले आहे. 

तुम्ही १८ ऑगस्ट २०२१ पूर्वी संभाषण सुरू केल्यास, तुम्ही याआधी त्या संभाषणासाठी स्थान शेअरिंग बंद केले नसल्यास, तुम्ही त्या संभाषणामध्ये जोडणारे किंवा याआधी जोडलेले सर्व फोटो त्यांची स्थाने दाखवतील. 

तुम्ही जोडणाऱ्या किंवा जोडलेल्या फोटोच्या स्थानाचे तपशील विशिष्ट संभाषणामध्ये शेअर करण्यासाठी: 

  1. तुमच्या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. मेनू Menu and then शेअरिंग  वर क्लिक करा.
  3. संभाषणावर क्लिक करा. 
  4. संभाषणामध्ये, तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरांवर क्लिक करा.
  5. फोटोचे स्थान शेअर करा सुरू करा.
भागीदार शेअरिंगमध्ये तुमच्या स्थानाचे तपशील शेअर करा 
महत्त्वाचे: तुम्ही भागीदार शेअरिंग सेट केल्यास, तुम्ही शेअर केलेल्या सर्व फोटोमध्ये स्थानाचे तपशील समाविष्ट असतील. तुम्ही १८ ऑगस्ट २०२१ पूर्वी भागीदार शेअरिंग सेट केल्यास, तुम्ही याआधी तुमच्या फोटोच्या स्थानाची माहिती बंद केली नसल्यास, ती माहिती शेअर केली जाईल.

तुम्ही भागीदार शेअरिंगमध्ये स्थानाचे तपशील शेअर करत आहात का हे तपासण्यासाठी:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. मेनू Menu and then शेअरिंग  वर क्लिक करा.
  3. तुमच्या भागीदाराच्या नावावर क्लिक करा. 
  4. सर्वात वरती, आणखी More and then सेटिंग्ज वर क्लिक करा.
  5. “तुमचा भागीदार अ‍ॅक्सेस करू शकतो” इथून, तुम्ही स्थानाचे तपशील शेअर करत आहात का हे तुम्ही तपासू शकता.
टीप: तुम्ही स्थानाचे तपशील शेअर करत नसल्यास, पण तुम्हाला ते करायचे असल्यास, तुमच्या भागीदाराला काढून टाका आणि त्याला पुन्हा आमंत्रित करा. 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15721408376286533061
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false