तुमच्या फोटोंची स्थाने समजून घेणे, शोधणे आणि संपादित करणे

तुमचे फोटो कुठे काढले गेलेत त्यानुसार ते संगतवार लावण्यासाठी, शोधण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोटोंची स्थाने वापरू शकता.

तुमच्या फोटोला स्थान असू शकते जर:

  • तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेराने फोटोसह तुमचे स्थान सेव्ह केले असेल.
  • तुम्ही स्थान जोडले असेल.
  • फोटोमध्ये आढळलेल्या खुणेच्या जागा आणि तुमच्या इतर फोटोमधील स्थाने यांसारख्या माहितीच्या आधारे Google Photos ने तुमच्या स्थानाचा अंदाज लावला असेल.

तुमच्या फोटोंचे स्थान व्यवस्थापित करा

तुमच्या फोटो किंवा व्हिडिओच्या स्थानाची माहिती व्यवस्थापित करण्यासाठी, स्थान नसलेल्या फोटोमध्ये तुम्ही स्थान जोडू शकता किंवा Photos ने जोडलेले अंदाजे स्थान संपादित करू शकता अथवा काढून टाकू शकता.

स्थान जोडा

महत्त्वाचे: फोटो किंवा व्हिडिओमध्ये स्थान जोडण्यासाठी, तुम्ही प्रथम त्याचा बॅक अप घेणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. फोटो किंवा व्हिडिओ उघडा.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर स्थान जोडा वर टॅप करा.
    • तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या स्थानांपैकी एक स्थान जोडा किंवा निवडा.

फोटोचे अंदाजे स्थान संपादित करा किंवा काढून टाका

महत्त्वाचे: तुम्ही फक्त अंदाजे स्थाने अपडेट करू शकता किंवा काढून टाकू शकता. फोटो किंवा व्हिडिओचे स्थान तुमच्या कॅमेऱ्याद्वारे आपोआप जोडले गेले असल्यास, तुम्ही ते स्थान संपादित करू शकत नाही किंवा काढून टाकू शकत नाही.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. फोटो किंवा व्हिडिओ उघडा.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा  वर टॅप करा.
    • तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या स्थानांपैकी एक स्थान जोडा किंवा निवडा.
    • अंदाजे स्थान काढून टाकण्यासाठी, स्थान काढून टाका वर टॅप करा.

तुम्ही एकाहून अधिक फोटोचे स्थानदेखील संपादित करू शकता:

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. तुम्हाला ज्या फोटोचे स्थान संपादित करायचे आहे ते निवडा.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर स्थान संपादित करा वर टॅप करा.
    • स्थान जोडा किंवा निवडा.
    • स्थान काढून टाकण्यासाठी, स्थान काढून टाका वर टॅप करा.
टीप: तुम्ही एकाहून अधिक फोटो किंवा व्हिडिओ निवडता तेव्हा, तुम्हाला Google Photos हे तुमच्या कॅमेऱ्याद्वारे जोडलेली स्थानाची माहिती संपादित करू शकत नसल्याचे कळवू शकते. पुढे जाण्यासाठी, त्या फोटो किंवा व्हिडिओंची निवड रद्द करा.

स्थानाच्या गहाळ माहितीचा अंदाज लावा

महत्त्वाचे: तुम्ही स्थानाचे अंदाज बंद केल्यास, मागील अंदाजे स्थाने काढून टाकली जात नाहीत, पण तुम्ही ती संपादित करणे किंवा हटवणे हे करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. सर्वात वरती, तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google Photos सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि त्यानंतर स्थान पर्याय वर टॅप करा.
  4. गहाळ स्थानांचा अंदाज लावा सुरू किंवा बंद करा.

मागील अंदाजे स्थाने शोधा

तुम्ही अंदाजे स्थाने बंद करता तेव्हा, Photos हे नवीन फोटोसाठी स्थानांचा अंदाज लावणार नाही. तुम्ही अंदाजे स्थाने व्यवस्थापित करू शकता आणि तुमच्या नवीन फोटोसाठी मागील अंदाजे स्थाने वापरू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. सर्वात वरती, तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Google Photos सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि त्यानंतर स्थान पर्याय आणि त्यानंतर अंदाजे स्थाने पहा आणि व्यवस्थापित करा वर टॅप करा.

एखादा स्थान असलेला फोटो शेअर करा

तुम्ही Google Photos वापरून फोटो शेअर करणे हे केल्यास, तुम्ही तुमच्या फोटोचे स्थान जोडले असल्यास, बदलले असल्यास किंवा तुमच्या कॅमेराने दिलेले असल्यास, ते शेअर केले जाऊ शकते.

तुमचे स्थान प्रत्येक शेअर केलेला अल्बम, लिंक किंवा तुम्ही तयार केलेले अथवा सामील झालेले संभाषण यांमध्ये शेअर केले जावे की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता. तुम्ही भागीदार शेअरिंग सेट केल्यास, तुम्ही शेअर केलेल्या सर्व फोटोमध्ये स्थानाचे तपशील समाविष्ट असतील. 

तुम्ही तुमच्या फोटोचे स्थान शेअर करण्याचे निवडल्यास पुढील परिस्थिती उद्भवतील: 

  • तुम्ही फोटोचे अंदाजे स्थान जोडल्यास किंवा संपादित केल्यास, त्यानंतर ते Google Photos वर एखाद्या व्यक्तीसह शेअर केल्यास, तुम्ही स्थानदेखील शेअर करता.
  • तुमच्या कॅमेराने स्थान जोडल्यास आणि तुम्ही तो फोटो Google Photos वर शेअर केल्यास, तो फोटो कॅमेराद्वारे दिलेले स्थान दाखवतो.
  • तुम्ही Google Photos ने अंदाजे दाखवलेल्या स्थानासह फोटो शेअर केल्यास, स्थान शेअर केले जाणार नाही.

याचा परिणाम तुम्ही Google Photos च्या बाहेर शेअर केलेले फोटो किंवा व्हिडिओ यांवर होत नाही, उदाहरणार्थ, तुम्ही फोटो अथवा व्हिडिओ डाउनलोड करून ते एखाद्या व्यक्तीला ईमेल करता तेव्हा. अशा वेळी, तुमच्या डिव्हाइसने सेव्ह केलेले मूळ स्थान तुम्ही Google Photos मध्ये केलेल्या कोणत्याही संपादनाशिवाय दाखवले जाते.

तुम्ही तुमच्या फोटोची स्थाने लोकांपासून लपवली तरीदेखील ते तुमच्या फोटोमधील खुणेच्या जागांच्या आधारे अंदाज लावू शकतात.

शेअर केलेल्या अल्बममध्ये तुमच्या स्थानाचे तपशील शेअर करा

तुम्ही शेअर केलेल्या अल्बममध्ये फोटो जोडता तेव्हा तुमच्या फोटोचे स्थानसंबंधित तपशील प्रत्येक अल्बममध्ये शेअर करावे की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos ॲप  उघडा.
  2. शेअरिंग वर टॅप करा.
  3. शेअर केलेला अल्बम निवडा.
  4. सर्वात वर, आणखी आणखी आणि त्यानंतर पर्याय वर टॅप करा.
  5. फोटोचे स्थान शेअर करा सुरू किंवा बंद करा.

तुम्ही नवीन शेअर केलेला अल्बम तयार करता तेव्हा तुमच्या फोटोचे स्थानसंबंधित तपशील शेअर करावे की नाही हेदेखील तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos ॲप उघडा.
  2. शेअरिंग आणि त्यानंतर शेअर केलेला अल्बम तयार करा वर टॅप करा.
  3. नवीन शेअर केलेल्या अल्बमसाठी शीर्षक आणि त्यामध्ये फोटो जोडा.
  4. सर्वात वर, शेअर करा आणि त्यानंतर अल्बमसंबंधित पर्याय वर टॅप करा.
  5. फोटोचे स्थान शेअर करा सुरू किंवा बंद करा.

टीप: तुम्ही पहिल्यांदा खाजगी अल्बम शेअर करता तेव्हादेखील हा पर्याय दिसतो.

संभाषणांमध्ये तुमच्या स्थानाचे तपशील शेअर करा

तुम्ही नवीन तयार केलेल्या संभाषणामध्ये फोटो जोडता तेव्हा, त्यामध्ये स्थानाचे तपशील समाविष्ट केलेले नसतील. स्थान शेअरिंग हे बाय डीफॉल्ट बंद केलेले आहे. 

तुम्ही १८ ऑगस्ट २०२१ पूर्वी संभाषण सुरू केल्यास, तुम्ही याआधी त्या संभाषणासाठी स्थान शेअरिंग बंद केले नसल्यास, तुम्ही त्या संभाषणामध्ये जोडणारे किंवा याआधी जोडलेले सर्व फोटो त्यांची स्थाने दाखवतील. 

तुम्ही जोडणाऱ्या किंवा जोडलेल्या फोटोच्या स्थानाचे तपशील विशिष्ट संभाषणामध्ये शेअर करण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  3. संभाषणावर टॅप करा. 
  4. संभाषणामध्ये, तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरांवर टॅप करा.
  5. फोटोचे स्थान शेअर करा सुरू करा.
भागीदार शेअरिंगमध्ये तुमच्या स्थानाचे तपशील शेअर करा 
महत्त्वाचे: तुम्ही भागीदार शेअरिंग सेट केल्यास, तुम्ही शेअर केलेल्या सर्व फोटोमध्ये स्थानाचे तपशील समाविष्ट असतील. तुम्ही १८ ऑगस्ट २०२१ पूर्वी भागीदार शेअरिंग सेट केल्यास, तुम्ही याआधी तुमच्या फोटोच्या स्थानाची माहिती बंद केली नसल्यास, ती माहिती शेअर केली जाईल.

तुम्ही भागीदार शेअरिंगमध्ये स्थानाचे तपशील शेअर करत आहात का हे तपासण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  3. तुमच्या भागीदाराच्या नावावर टॅप करा.
  4. सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  5. “तुमचा भागीदार अ‍ॅक्सेस करू शकतो” इथून, तुम्ही स्थानाचे तपशील शेअर करत आहात का हे तुम्ही तपासू शकता.
टीप: तुम्ही स्थानाचे तपशील शेअर करत नसल्यास, पण तुम्हाला ते करायचे असल्यास, तुमच्या भागीदाराला काढून टाका आणि त्याला पुन्हा आमंत्रित करा. 

तुमचे फोटो आणि व्हिडिओ नकाशावर शोधा

तुम्ही तुमच्या फोटो आणि व्हिडिओंचे स्थान परस्परसंवादी नकाशावर शोधू शकता.

नकाशा दृश्य शोधा
  • तळाशी, शोधा  वर टॅप करा.
  • फोटोच्या माहिती विभागामधील नकाशावर टॅप करा.
  • मुख्य फोटो ग्रिडच्या तारीख हेडरमध्ये ठिकाणांच्या नावांवर टॅप करा.
नकाशा दृश्य वापरा

ग्रिडमध्ये, तुम्ही सेव्ह केलेले शेअर केलेल्या फोटोंच्या समावेशासह तुमच्या लायब्ररीमधील दृश्यमान नकाशा क्षेत्रातील फोटो आहेत.

  • फोकसचे क्षेत्र बदलण्यासाठी: नकाशा पिंच करा आणि झूम करा. 
  • तुम्ही दृश्यमान नकाशाच्या क्षेत्रामध्ये घेतलेले फोटो शोधण्यासाठी: ग्रिड स्क्रोल करा किंवा हीटमॅपवर टॅप करा.

तुम्ही भागीदार शेअरिंगमध्ये स्थानाचे तपशील शेअर करत आहात का हे तपासण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Photos उघडा.
  2. सर्वात वरती, शेअरिंग वर टॅप करा.
    • महत्त्वाचे: काही वापरकर्त्यांसाठी, शेअरिंग हे तळाशी दिसू शकते.
  3. तुमच्या भागीदाराच्या नावावर टॅप करा.
  4. सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  5. “तुमचा भागीदार अ‍ॅक्सेस करू शकतो” इथून, तुम्ही स्थानाचे तपशील शेअर करत आहात का हे तुम्ही तपासू शकता.
तुमची टाइमलाइन पहा

तुम्ही तुमच्या फोटोचा इतिहास पाहण्यासाठी तुमच्या नकाशामध्ये टाइमलाइन वापरू शकता. तुम्ही ग्रिडमधील फोटो स्क्रोल करता तेव्हा, केंद्रस्थानी असलेल्या दिवसाची तुमची टाइमलाइन दिसण्यासाठी पाथ अपडेट केला जाईल.

तुमच्याकडे स्थान इतिहास डेटा असेल तेव्हाच हे वैशिष्ट्य उपलब्ध आहे. स्थान इतिहास सुरू किंवा बंद कसा करायचा याबद्दल जाणून घ्या.

टाइमलाइन सुरू किंवा बंद करण्यासाठी:
  1. नकाशा दृश्यामध्ये, आणखी आणखी वर टॅप करा.
  2. तुमची वैयक्तिक टाइमलाइन दाखवा हे सुरू किंवा बंद करा.
टिपा:
  • तुम्ही तुमच्या नकाशा दृश्यासाठी डीफॉल्ट, उपग्रह किंवा भूप्रदेश हे निवडू शकता.
  • विशिष्ट दिवसासाठी पूर्ण टाइमलाइन पाथ शोधण्याकरिता, झूम आउट करा वर टॅप करा.
  • तुम्ही तुमच्या नकाशा दृश्यामधून टाइमलाइन लपवता तेव्हा, फोटो तुमचा स्थान इतिहास डेटा काढून टाकत नाही. तुमचा स्थान इतिहास कसा हटवायचा याबद्दल जाणून घ्या.

तुमचा कॅमेरा स्थान माहिती जोडतो की नाही ते नियंत्रित करा

  1. तुमच्या iOS डिव्हाइसची सेटिंग्ज उघडा.
  2. गोपनीयता आणि त्यानंतर स्थान सेवा वर टॅप करा.
  3. कॅमेरा परवानगी अ‍ॅप वापरताना यावर सेट करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13783071205132348014
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false