सूचना

१५ मे २०२४ पासून आणि येत्या काही महिन्यांमध्ये आणखी वैशिष्ट्ये रोल आउट होत असून, तुम्ही ती विनामूल्य मिळवू शकता. तुम्ही या लेखामध्ये भविष्यातील उपलब्धता पाहू शकता किंवा काय बदलत आहे याबद्दल अधिक जाणून घेणे यासाठी Photos समुदाय येथे भेट देऊ शकता.

तुमचे फोटो संपादित करा

तुमच्या मोबाइल डिव्हाइस किंवा कॉंप्युटरवर, फिल्टर जोडा, फोटो क्रॉप करा आणि आणखी बऱ्याच गोष्टी करा. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर फोटो संपादित करण्यासाठी, Google Photos ॲप वापरा. काही वैशिष्ट्ये मोबाइल वेबवर उपलब्ध नाहीत.

टीप: तुम्ही बॅकअप घेणे सुरू केले असल्यास, तुमची संपादने तुमच्या Google Photos खाते सह सिंक होतील.

तुम्‍ही सुरुवात करण्‍यापूर्वी

डाउनलोड करा आणि  Google Photos अ‍ॅप इंस्टॉल करा.

टिपा:
  • तुम्ही फोटो संपादित करत असताना, फोटोवर ठरावीक वैशिष्ट्ये लागू करता तेव्हा, आयकन निळ्या रंगांचा होतो.
  • तुमच्या संपादित केलेल्या फोटोची मूळ फोटोसोबत तुलना करण्यासाठी, इमेज पूर्वावलोकनावर टॅप करून धरून ठेवा.
  • संपादित केलेल्या फोटोमधील बदल पुन्हा पाहिल्यासारखे करण्यासाठी, संपादित करा Edit आणि त्यानंतर परत करा वर टॅप करा. तुम्ही प्रत म्हणून सेव्ह केलेल्या फोटोमधील बदल पुन्हा पाहिल्यासारखे करता येणार नाहीत.
  • तुम्ही फोटो संपादित केल्यानंतर त्यामधील बदल सेव्ह करण्यासाठी, तळाशी, सेव्ह करा वर टॅप करा. सेव्ह कसे करावे यासाठी तुम्हाला २ पर्याय दिसू शकतात:
    • सेव्ह करा: तुम्ही केलेले बदल मूळ फोटोवर सेव्ह करते. तुम्हाला हा पर्याय कदाचित काही संपादनांसाठी वापरता येणार नाही.
    • प्रत म्हणून सेव्ह करा: मूळ फोटोमध्ये बदल न करता तुमच्या संपादनांसह नवीन फोटो तयार करतो.
  • काही संपादन वैशिष्ट्यांना ३२-बिट डिव्हाइसवर सपोर्ट नाही. काही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुमच्याजवळ किमान ३ GB RAM आणि Android 8.0 व त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे.
  • काही वैशिष्ट्ये फक्त Pixel वर उपलब्ध आहेत. तुम्ही शोधत असलेले वैशिष्ट्य तुम्हाला आढलत नसल्यास,Pixel डिव्हाइससाठी Google Photos वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • काही संपादन टूल वापरण्यासाठी, तुम्ही प्रथम टूल डाउनलोड करणे आवश्यक आहे. इंस्टॉल करण्यासाठी, संपादन टूल आणि त्यानंतर इंस्टॉल करा वर टॅप करा.
    • तुम्ही वाय-फायशी कनेक्ट केले असल्याचे आणि तुमच्याकडे डिव्हाइस स्टोरेज उपलब्ध असल्याची खात्री करा. तुम्हाला वाय-फायशी कनेक्ट करण्यात समस्या येत असल्यास, तुम्ही मोबाइल डेटा वापरू शकता.
    • तुम्ही संपादन टूल इंस्टॉल केल्यानंतर, तुम्हाला ते वापरण्यासाठी फोटो संपादक बंद करून पुन्हा उघडावा लागेल.
  • तुमच्याकडे १ GB पेक्षा कमी डिव्हाइस स्टोरेज असल्यास:
    • तुम्ही काही संपादन टूल डाउनलोड करू शकत नाही. संपादन टूलसाठी तुमच्या डिव्हाइसवर जागा करण्यासाठी, जागा मोकळी करणे कसे करावे हे जाणून घ्या.
    • न वापरलेली संपादन टूल काढून टाकली जाऊ शकतात. तुम्ही ते परत वापरण्यासाठी टूल पुन्हा इंस्टॉल करणे आवश्यक आहे.
सुचवलेली संपादने वापरणे

महत्त्वाचे:तुमच्या डिव्हाइसमध्ये किमान ३ GB RAM आणि Android 8.0 व त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे.

Google Photos तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोटो संपादित करायचा आहे त्याच्या आधारावर संपादने सुचवते, जी तुम्ही एका टॅपने लागू करू शकता.
  1. तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो उघडा.
  2. संपादित करा Edit वर टॅप करा.
  3. सुचवलेले संपादन लागू करण्यासाठी, सुचवलेल्या नावावर टॅप करा.
    • उदाहरणार्थ, वर्धित करा वर टॅप करा.
  4. बदल पुन्हा पाहिल्यासारखे करण्यासाठी, सुचवलेल्या संपादनाच्या पर्यायावर पुन्हा टॅप करा.
  5. तुमचे पूर्ण झाल्यावर, सेव्ह करा वर टॅप करा.
फोटो क्रॉप करा किंवा फिरवा
  1. तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो उघडा.
  2. संपादित करा Edit आणि त्यानंतर क्रॉप करा वर टॅप करा.
    • चौकोन आकारासारख्या वेगळ्या आस्पेक्ट रेशोमध्ये फोटो क्रॉप करण्यासाठी, आस्पेक्ट रेशो वर टॅप करा.
    • फोटोची रुंदी बदलण्यासाठी, रुपांतर करा वर टॅप करा. तुम्हाला हवे असलेल्या फोटोच्या कडांपाशी बिंदू ड्रॅग करा किंवा ऑटो वर टॅप करा.
    • फोटोला ९० अंशांनी फिरवण्यासाठी, फिरवा वर टॅप करा.
      • फोटोला सरळ करून किरकोळ ॲडजस्टमेंट करण्यासाठी, फिरवा च्या वरील डायल वापरा.
      • फोटो आपोआप सरळ करण्यासाठी, ऑटो वर टॅप करा.
        • टीप: आपोआप सरळ करण्याची उपलब्धता फोटोवर अवलंबून असेल.
  3. तुमच्या संपादनांसह फोटोची प्रत सेव्ह करण्यासाठी, तळाशी, सेव्ह करा वर टॅप करा.
टूल वापरणे

महत्त्वाचे:

  • काही टूल फक्त Pixel वर उपलब्ध आहेत. तुम्ही शोधत असलेले टूल तुम्हाला सापडत नसल्यास,Pixel डिव्हाइससाठी Google Photos वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • पोर्ट्रेट लाइट टूलमध्येप्रकाश जोडणे आणि प्रकाश संतुलित करणे वापरण्यासाठी व ब्लर असलेल्या फोटोमध्ये सुधारणा करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवर किमान ४ GB RAM असणे आवश्यक आहे.
  1. तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो उघडा.
  2. संपादित करा आणि त्यानंतर टूल वर टॅप करा.
  3. तुमच्या फोटोमध्ये कोणती टूल वापरून तुम्हाला बदल करायचे आहेत ती टूल निवडा.
  4. तुमचे पूर्ण झाल्यावर, पूर्ण झाले वर टॅप करा.
  5. इफेक्ट पुन्हा पहिल्यासारखा करण्यासाठी, निवड रद्द करा किंवा रद्द करा वर टॅप करा.

उपलब्ध असलेली टूल

  • नको असलेले व्यत्यय काढून टाकण्यासाठी, मॅजिक इरेझर वर टॅप करा.
    • तुमच्या फोटोमधून व्यत्यय काढून टाकण्यासाठी मिटवा वर टॅप करा.
    • तुमच्या फोटोमधील व्यत्यय आणणाऱ्या ऑब्जेक्टचा रंग बदलण्यासाठी, कामूफ्लाजवर टॅप करा.
  • एखाद्या व्यक्तीच्या पोर्ट्रेटमधील स्थान आणि ब्राइटनेस ॲडजस्ट करण्यासाठी, पोर्ट्रेट लाइट वर टॅप करा.
    • तुम्ही तुमच्या लोकांच्या फोटोमध्ये दिशात्मक प्रकाश जोडू शकता आणि मॅन्युअली किंवा आपोआप हार्श शॅडो आणि प्रकाश व्यवस्था ॲडजस्ट करू शकता. पोर्ट्रेट लाइट टूलमध्ये, प्रकाश जोडा आणि प्रकाश संतुलित करा वापरा.
  • बॅकग्राउंड ब्लर ॲडजस्ट करण्यासाठी, ब्लर करा वर टॅप करा.
    • तुमच्या फोटोमध्ये फोकस केलेल्या गोष्टीव्यतिरिक्त आसपासच्या गोष्टी ब्लर करून ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही खोली देखील वापरू शकता.
  • अनेक पॅलेटमधून निवडण्यासाठी आणि आकाशाचा रंग व कॉंट्रास्ट ॲडजस्ट करण्यासाठी आकाश वर टॅप करा.
  • बॅकग्राउंड डीसॅच्युरेट करण्यासाठी, पण फोरग्राऊंड रंगीत ठेवण्यासाठी, रंग पॉप वर टॅप करा.
  • ब्लर असलेल्या फोटोमध्ये सुधारणा करण्यासाठी, अनब्लर करा वर टॅप करा.
फोटो ॲडजस्ट करणे

महत्त्वाचे:तुमच्या डिव्हाइसमध्ये किमान ३ GB RAM आणि Android 8.0 व त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे.

  1. तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो उघडा.
  2. संपादित करा Edit आणि त्यानंतर ॲडजस्ट करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला तुमच्या फोटोला लागू करायचा असलेला इफेक्ट निवडा.
  4. बदल करण्यासाठी डायल हलवा.
  5. तुमचे पूर्ण झाल्यावर, पूर्ण झाले वर टॅप करा.
  6. इफेक्ट पुन्हा पहिल्यासारखा करण्यासाठी, निवड रद्द करा किंवा रद्द करा वर टॅप करा.

फोटो ॲडजस्ट करण्याच्या आणखी मार्गांबद्दल जाणून घ्या

महत्त्वाचे: काही वैशिष्ट्ये तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध नसू शकतात.

  • एकूणच प्रकाश किंवा गडदपणा ॲडजस्ट करण्यासाठी, ब्राइटनेस वर टॅप करा.
  • टोनमधील फरक ॲडजस्ट करण्यासाठी, काँट्रास्ट वर टॅप करा.
  • सर्वाधिक ब्राइट मूल्य ॲडजस्ट करण्यासाठी, व्हाइट पॉइंट वर टॅप करा.
  • सर्वाधिक गडद मूल्य ॲडजस्ट करण्यासाठी, ब्लॅक पॉइंट वर टॅप करा.
  • सर्वाधिक ब्राइट भागांमधील तपशील ॲडजस्ट करण्यासाठी, हायलाइट वर टॅप करा.
  • सर्वाधिक गडद भागांमधील तपशील ॲडजस्ट करण्यासाठी, शॅडो वर टॅप करा.
  • रंगांची तीव्रता ॲडजस्ट करण्यासाठी, सॅच्युरेशन वर टॅप करा.
  • रंग तापमान ॲडजस्ट करण्यासाठी, उबदारपणा वर टॅप करा.
  • रंगछटा ॲडजस्ट करण्यासाठी, छटा वर टॅप करा.
  • त्वचेच्या रंगाच्या टोनचे सॅच्युरेशन ॲडजस्ट करण्यासाठी, स्किन टोन वर टॅप करा.
  • आकाश किंवा पाणी यांसारखे निळ्या टोनचे सॅच्युरेशन ॲडजस्ट करण्यासाठी, ब्लू टोन वर टॅप करा.
  • कडांचे स्थानिक काँट्रास्ट ॲडजस्ट करण्यासाठी, पॉप वर टॅप करा.
  • बारकावे रेखीव करण्यासाठी, रेखीव करा वर टॅप करा.
  • नॉइझ काढून टाकण्यासाठी, डीनॉइझ करा वर टॅप करा.
  • फोटोच्या कडांच्या आजूबाजूचा ब्राइटनेस कमी करण्यासाठी, विन्येट वर टॅप करा.
  • आणखी संतुलित फोटोसाठी इमेजवर ब्राइटनेस आणि कॉंट्रास्ट वर्धित करण्याकरिता, HDR इफेक्ट वर टॅप करा.
फिल्टर जोडणे
  1. तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो उघडा.
  2. संपादित करा Edit आणि त्यानंतर फिल्टर वर टॅप करा.
  3. फिल्टर निवडा.
  4. फिल्टरवर पुन्हा टॅप करा.
  5. फोटोवरील फिल्टरची तीव्रता बदलण्यासाठी डायल हलवा.
  6. फिल्टर पुन्हा पहिल्यासारखा करण्यासाठी, मूळ निवडा.
फोटोवर ड्रॉ करणे, हायलाइट करणे किंवा मजकूर जोडणे
  1. तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो उघडा.
  2. संपादित करा Edit आणि त्यानंतर मार्कअप वर टॅप करा.
    • ड्रॉ करण्यासाठी, पेन Pen वर टॅप करा.
    • हायलाइट जोडण्यासाठी, हायलाइट Highlighter वर टॅप करा.
    • फोटोवर मजकूर जोडण्यासाठी, मजकूर Text वर टॅप करा.
      • टेक्स्ट बॉक्स आजूबाजूला हलवण्यासाठी, स्पर्श करून धरून ठेवा आणि त्यानंतर ड्रॅग करा.
  3. तुमचे पूर्ण झाल्यावर, पूर्ण झाले वर टॅप करा.
  4. तुमच्या संपादनांसह फोटोची कॉपी सेव्ह करण्यासाठी, तळाशी, प्रत म्हणून सेव्ह करा वर टॅप करा.
तुमच्या मोशन फोटोमधील नवीन शॉट सेव्ह करणे

तुम्ही एखाद्या मित्राचा किंवा गटाचा मोशन फोटो घेता, तेव्हा Google Photos काही वेळा तुमच्या मोशन फोटोमधील वेगळ्या शॉटची शिफारस करेल. तुम्ही तुमचा आवडता शॉटदेखील निवडू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos ॲप उघडा.
  2. एखादा मोशन फोटो उघडा.
  3. फोटोवर वरती स्वाइप करा.
  4. या फोटोमधील शॉट वर टॅप करा.
  5. तुमच्या पिक्चरमधील शॉटमधून स्क्रोल करा आणि तुमचा आवडता शॉट निवडा.
    • तुम्ही Pixel 3 वापरून फोटो काढला असल्यास, तुम्हाला कदाचित शिफारस केलेले शॉट दिसतील. त्यांच्यावर पांढरा बिंदू असेल.
    • मूळ फोटोवर राखाडी बिंदू असेल.
  6. नवीन फोटो सेव्ह करण्यासाठी, प्रत म्हणून सेव्ह करा वर टॅप करा.

तुम्ही सेव्ह केलेले शॉट तुमच्या फोटोमध्ये मूळ फोटोच्या बाजूला दिसतात

सिनेमॅटिक फोटो तयार करणे

महत्त्वाचे:तुमच्या डिव्हाइसमध्ये किमान ३ GB RAM आणि Android 8.0 व त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos ॲप उघडा.
  2. तुम्हाला हव्या असलेल्या फोटोवर टॅप करा.
  3. वरती स्वाइप करा.
  4. तयार करा आणि त्यानंतर सिनेमॅटिक फोटो वर टॅप करा.
  5. तळाशी, सेव्ह करा वर टॅप करा.

टीप: तुम्ही दुसऱ्या मार्गानेदेखील सिनेमॅटिक फोटो तयार करू शकता:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos ॲप उघडा.
  2. सर्वात वरती, तयार करा Create आणि त्यानंतर सिनेमॅटिक फोटो वर टॅप करा.
  3. फोटो निवडा.
  4. तळाशी, सेव्ह करा वर टॅप करा.
तारीख आणि टाइमस्टॅंप बदलणे
महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या फोटोची तारीख आणि वेळ बदलता, तेव्हा Google Photos हे अपडेट केलेली तारीख व वेळ दाखवते. तुम्ही दुसऱ्या ॲप्ससह फोटो शेअर केल्यास किंवा तो डाउनलोड केल्यास, फोटोवर तुमच्या कॅमेराने सेव्ह केलेली मूळ तारीख आणि वेळ दिसू शकते.
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos ॲप उघडा.
  2. फोटोवर टॅप करा.
  3. सर्वात वरती, आणखी More वर टॅप करा.
  4. तारीख आणि टाइमस्टॅंपवर टॅप करा.
  5. नवीन तारीख आणि वेळ निवडा.
  6. पूर्ण झाले वर टॅप करा.

टिपा:

  • सकाळी ४ च्या आधी घेतलेले फोटो मागील दिवशी क्रमाने लावले जातात.
  • बॅकअप घेतलेल्या फोटोसाठी तुम्ही Photos ॲपमध्ये फक्त तारीख आणि टाइमस्टॅंप बदलू शकता.
मॅजिक एडिटर वापरणे
महत्त्वाचे:
  • सर्व Photos वापरकर्ते प्रत्येक महिन्याला १० सेव्हसह Android वर मॅजिक एडिटर वापरू शकतात.
  • तुमच्या डिव्हाइसमध्ये किमान ४ GB RAM आणि Android 8.0 व त्यावरील आवृत्ती असलेला ६४ बिट चिपसेट असणे आवश्यक आहे.
  • हे वैशिष्ट्य प्रायोगिक आहे आणि ते कदाचित नेहमी तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करणार नाही.

तुम्ही फोटोचे काही भाग आजूबाजूला हलवू शकता किंवा मिटवू शकता आणि “आकाश” अथवा “गोल्डन आवर” यांसारखे संदर्भानुसार प्रीसेट लागू करू शकता.

मॅजिक एडिटर वापरून फोटो संपादित करा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos ॲप उघडा.
  2. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या फोटोवर टॅप करा.
  3. संपादित करा आणि त्यानंतर मॅजिक एडिटर Magic Editor वर टॅप करा.

संदर्भानुसार प्रीसेट लागू करा

  1. तुम्ही मॅजिक एडिटर मोडमध्ये असता, तेव्हा प्रीसेट Magic Editor वर टॅप करा.
  2. प्रीसेट निवडा.
  3. तुमच्या पर्यायांदरम्यान स्क्रोल करण्यासाठी, डावीकडे स्वाइप करा.
  4. बरोबरची खूण Done वर टॅप करा.
  5. तुम्हाला तुमचा फोटो संपादित करत राहायचा असल्यास, १-३ या पायऱ्या पुन्हा करा.
  6. तुम्ही तुमचे संपादन पूर्ण केल्यावर, प्रत सेव्ह करा वर टॅप करा.

टीप: प्रीसेटचे पर्याय हे तुमच्या फोटोवर अवलंबून असतात. सर्व पर्याय एकाच वेळी उपलब्ध नसतात.

तुमच्या फोटोचा भाग हलवणे, मिटवणे किंवा त्याचा आकार बदलणे

  1. तुम्ही मॅजिक एडिटर मोडमध्ये असता, तेव्हा टॅप करा, त्याभोवती वर्तुळ काढा किंवा तुमच्या फोटोचा भाग निवडण्यासाठी ब्रश वापरा.
    1. आणखी चांगल्या अचूकतेसाठी झूम इन करा.
    2. तुमची निवड काढून टाकण्यासाठी, तुम्हाला हव्या असलेल्या भागाला स्पर्श करून धरून ठेवा आणि तो ड्रॅग करा.
    3. तुमच्या निवडीचा आकार बदलण्यासाठी, स्पर्श करून धरून ठेवा आणि ती २ बोटांनी पिंच करा.
    4. तुमची निवड काढून टाकण्यासाठी, मिटवा वर टॅप करा.
  2. संपादन लागू करण्यासाठी, बरोबरची खूण Done वर टॅप करा.
  3. तुम्हाला तुमचा फोटो संपादित करणे सुरू ठेवायचे असल्यास, १ ते २ या पायऱ्या रिपीट करा.
  4. तुम्ही तुमचे संपादन पूर्ण केल्यावर, प्रत सेव्ह करा वर टॅप करा.

टीप: फोटोचे पर्याय जनरेट करण्यासाठी मॅजिक एडिटर ला थोडा वेळ लागू शकतो.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15073642191220396169
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false