तुमच्‍या डिव्हाइसमधील जागा मोकळी करा

तुम्ही सुरक्षितपणे बॅकअप घेतलेले फोटो हटवता, तेव्हा तुमच्या डिव्हाइसवरील जागा मोकळी करण्यासाठी तुम्ही Google Photos वापरू शकता. हे वैशिष्ट्य वापरण्यापूर्वी, तुम्ही आधीच तुमच्या फोटोचा योग्यरीत्या बॅकअप घेतला असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. फोटोचा बॅकअप कसा घ्यावा ते जाणून घ्या.

तुम्‍ही सुरुवात करण्‍यापूर्वी

डाउनलोड करा आणि Google Photos ॲप इंस्टॉल करा.

३० दिवसांपेक्षा कमी जुने फोटो आणि व्हिडिओ तुमच्‍या डिव्हाइसवर राखून ठेवले जाऊ शकतात. तरीही तुमच्‍या Google Photos लायब्ररीमध्ये त्‍यांचा बॅकअप घेतला जाईल.

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे फोटो हटवण्यापूर्वी, त्यांचा बॅकअप घेतल्याची खात्री करा. फोटोचा बॅकअप कसा घ्यावा ते जाणून घ्या.

तुमच्‍या Android डिव्हाइसमधील जागा मोकळी करणे

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य तुमच्या डिव्हाइसमधून फोटो हटवते.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर जागा मोकळी करा वर टॅप करा.
  4. किती जागा मोकळी होईल, ते तुम्‍हाला दिसेल. तुमच्‍या फोनमधून सर्व आयटम हटवण्यासाठी, मोकळे करा वर टॅप करा.
  5. तुमचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी, photos.google.com वर जा किंवा Google Photos ॲप उघडा.

बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ यांसाठी, तुम्हाला कदाचित हटवायचे असतील असे धूसर फोटो, स्क्रीनशॉट व मोठे व्हिडिओ यांसारखे आयटम दाखवण्याकरिता Photos चे स्टोरेज व्यवस्थापक टूल वापरा. तुमचे स्टोरेज कसे व्यवस्थापित करावे ते जाणून घ्या.

तुम्‍ही तुमच्‍या फोनमधून फोटो आणि व्‍हिडिओ काढून टाकल्यास काय होते

तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवरील फोटो आणि व्हिडिओच्या प्रती काढून टाकल्यास, त्या हटवल्या जातात, पण तुम्ही अजूनही पुढील गोष्टी करू शकता:

  • Google Photos ॲप आणि photos.google.com यामध्ये तुम्ही नुकत्‍याच काढून टाकलेल्‍या फोटो आणि व्‍हिडिओंच्‍या समावेशासह तुमचे फोटो आणि व्‍हिडिओ पाहू शकाल.
  • तुमच्‍या Google Photos लायब्ररीमध्ये कोणत्याही गोष्टी संपादित करू, शेअर करू, हटवू आणि व्‍यवस्‍थापित करू शकता.

तुम्ही काढून टाकलेले कोणतेही फोटो किंवा व्‍हिडिओ तुम्हाला पाहता येणार नाहीत जर:

  • तुम्ही तुमच्‍या मोबाइल डिव्हाइसची बिल्ट-इन गॅलरी वापरत असाल.
  • तुम्ही ऑफलाइन असल्यास.
  • तुम्ही Google Photos अ‍ॅप मध्ये साइन इन केलेले नसल्यास.

हटवलेले फोटो रिकव्‍हर करणे

महत्त्वाचे: तुमच्या डिव्हाइसनुसार या पायऱ्या बदलू शकतात. आणखी मदतीसाठी, तुमच्या डिव्हाइसच्या निर्मात्याशी संपर्क साधा.

तुम्ही एखादा आयटम हटवल्यास आणि तुम्हाला तो पुन्हा हवा असल्यास, तो तुमच्या ट्रॅशमध्ये आहे का ते तपासा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, फोटो गॅलरी अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी, मेनू Menu वर टॅप करा.
  3. ट्रॅश वर टॅप करा.
  4. तुम्हाला रिकव्हर करायचा असलेला फोटो किंवा रिकव्हर करायचे असलेले फोटो निवडा.

  5. सर्वात तळाशी, रिस्टोअर करा वर टॅप करा. तुमच्या फोनच्या Gallery अ‍ॅपमध्ये तो किंवा ते फोटो दिसतील.

आयटम तुमच्या ट्रॅशमध्ये नसल्यास, तो कायमचा हटवलेला असू शकतो.

फोटो किंवा व्हिडिओ शोधू शकत नाही का?

हटवलेला फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या Google Photos अथवा Gallery ट्रॅशमध्ये नसल्‍यास, तुम्‍ही तो रिस्‍टोअर करू शकत नाही. पुढील बाबतीत, तुम्हाला फोटो रिस्टोअर करता येणार नाही:

  • तुम्ही तो ६० दिवसांहून अधिक कालावधीपूर्वी ट्रॅशमध्ये हलवला होता.
  • तुम्ही तो ट्रॅशमध्ये हलवल्यानंतर तुमचा ट्रॅश रिकामा केला.
  • तुम्ही तो Android 11 आणि त्यावरील आवृत्तीच्या डिव्हाइसवर ३० दिवसांहून अधिक कालावधीपूर्वी ट्रॅशमध्ये हलवला होता व त्याचा बॅकअप घेतला नव्हता.
  • तुम्‍ही तो तुमच्‍या ट्रॅशमधून कायमचा हटवला.
  • तुम्ही तो बॅकअप न घेता तुमच्या डिव्हाइसच्या Gallery ॲपमधून कायमचा हटवला असेल.

तुमचे फोटो सहजपणे शोधण्यासाठी आणि रिकव्हर करण्यासाठी, बॅकअप आणि सिंक सुरू करा. फोटोचा बॅकअप कसा घ्यावा ते जाणून घ्या.

महत्त्वाचे:

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15718807156709361833
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false