सूचना

आम्ही १५ मे २०२४ पासून Google Photos च्या वैशिष्ट्याच्या उपलब्धतेमध्ये बदल करत असून, येत्या काही महिन्यांमध्ये ते रोल आउट करणार आहोत. तुम्ही या लेखामध्ये भविष्यामधील या बदलांची माहिती मिळू शकता किंवा काय बदलत आहे याविषयी अधिक जाणून घेणे हे करण्यासाठी Photos समुदाय याला भेट देऊ शकता.

Pixel डिव्हाइससाठीच्या Google Photos वैशिष्ट्यांविषयी

महत्त्वाचे: तुम्ही बॅकअप घेणे सुरू केले असल्यास, तुमची संपादने तुमच्या Google Photos खात्यामध्ये सिंक होतील. काही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुम्ही बॅकअप घेणे सुरू केलेले असणे आवश्यक आहे. फोटो आणि व्हिडिओ यांचा बॅकअप कसा घ्यावा हे जाणून घ्या.

तुम्ही Pixel वापरकर्ता असल्यास, तुम्हाला मॅजिक एडिटर च्या समावेशासह Google Photos मध्ये आणखी वैशिष्ट्ये मिळू शकतात. एखादे संपादन वैशिष्ट्ये इथे सूचीबद्ध केलेले नसल्यास, ते Google Photos च्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या.

टीप: तुम्ही Chromebook Plus साठीची तुमची संपादन वैशिष्ट्ये शोधत असल्यास, ChromeOS करिता Photos Android ॲपविषयी अधिक जाणून घ्या.

मॅजिक एडिटर वापरणे

महत्त्वाचे:
  • तुमच्या डिव्हाइसमध्ये किमान ४ GB RAM आणि Android 8.0 व त्यावरील आवृत्ती असलेला ६४ बिट चिपसेट असणे आवश्यक आहे.
  • हे वैशिष्ट्य प्रायोगिक आहे आणि ते कदाचित नेहमी तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करणार नाही.
तुम्ही फोटोचे काही भाग आजूबाजूला हलवू शकता किंवा मिटवू शकता आणि “आकाश” अथवा “गोल्डन आवर” यांसारखे संदर्भानुसार प्रीसेट लागू करू शकता.

मॅजिक एडिटर वापरून फोटो संपादित करा

  1. तुमच्या Pixel डिव्हाइसवर, Google Photos ॲप उघडा.
  2. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या फोटोवर टॅप करा.
  3. संपादित करा आणि त्यानंतर मॅजिक एडिटर Magic Editor वर टॅप करा.

संदर्भानुसार प्रीसेट लागू करा

  1. तुम्ही मॅजिक एडिटर मोडमध्ये असता, तेव्हा प्रीसेट Edit Fix Auto वर टॅप करा.
  2. प्रीसेट निवडा.
  3. तुमच्या पर्यायांदरम्यान स्क्रोल करण्यासाठी, डावीकडे स्वाइप करा.
  4. बरोबरची खूण Done वर टॅप करा.
  5. तुम्हाला तुमचा फोटो संपादित करत राहायचा असल्यास, १-३ या पायऱ्या पुन्हा करा.
  6. तुमचे संपादित करून पूर्ण झाल्यावर, कॉपी सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: प्रीसेटचे पर्याय हे तुमच्या फोटोवर अवलंबून असतात. सर्व पर्याय एकाच वेळी उपलब्ध नसतात.

तुमच्या फोटोचा भाग हलवा, मिटवा किंवा त्याचा आकार बदला

  1. तुम्ही मॅजिक एडिटर मोडमध्ये असता, तेव्हा टॅप करा, त्याभोवती वर्तुळ काढा किंवा तुमच्या फोटोचा भाग निवडण्यासाठी ब्रश वापरा.
    • आणखी चांगल्या अचूकतेसाठी झूम इन करा.
    • तुमची निवड काढून टाकण्यासाठी, तुम्हाला हव्या असलेल्या भागाला स्‍पर्श करून धरून ठेवा आणि तो ड्रॅग करा.
    • तुमच्या निवडीचा आकार बदलण्यासाठी, स्‍पर्श करून धरून ठेवा आणि ती २ बोटांनी पिंच करा.
    • तुमची निवड काढून टाकण्यासाठी, मिटवा वर टॅप करा.
  2. संपादन लागू करण्यासाठी, बरोबरची खूण Done वर टॅप करा.
  3. तुम्हाला तुमचा फोटो संपादित करणे सुरू ठेवायचे असल्यास, १ ते २ या पायऱ्या रिपीट करा.
  4. तुम्ही तुमचे संपादन पूर्ण केल्यावर, प्रत सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: फोटोचे पर्याय जनरेट करण्यासाठी मॅजिक एडिटरला थोडा वेळ लागू शकतो.

Pixel डिव्हाइससाठीची Google Photos ची इतर वैशिष्ट्ये

सर्वोत्तम फोटो
महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त Pixel 8 आणि Pixel 8 Pro वरील डिव्हाइसवर उपलब्ध आहे.
सर्वोत्तम फोटो हे एकसमान फोटोना सर्वजण सर्वात छान दिसत असलेल्या एका फोटोमध्ये एकत्रित करते. तुम्ही प्रत्येकासाठी तुमच्या आवडीचे हावभाव निवडू शकता आणि तुमचा स्वतःचा सर्वोत्तम फोटो तयार करू शकता. तुमच्या Pixel फोनवर फोटो कसा संपादित करावा हे जाणून घ्या.
व्हिडिओ बूस्ट
महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त Pixel 8 Pro वर उपलब्ध आहे.
तुम्ही तुमच्या Pixel कॅमेरावर आणखी चांगल्या प्रकाशासह, रंगासह व तपशिलांसह व्हिडिओ कॅप्चर करू शकता. व्हिडिओ बूस्ट हे नाइट व्ह्यू व्हिडिओ देखील सुरू करते. तुमच्या Pixel फोनवर व्हिडिओ बूस्ट कसे वापरावे ते जाणून घ्या.
ऑडिओ मॅजिक इरेझर
महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त Pixel 8 आणि Pixel 8 Pro वरील डिव्हाइसवर उपलब्ध आहे.
नको असलेल्या आवाजांमुळे व्हिडिओमध्ये व्यत्यय येऊ शकतो. ऑडिओ मॅजिक इरेझर हे विचलित करणारे आवाज काही टॅपमध्ये कमी करण्यासाठी Google AI वापरते. तुमच्या Pixel फोनवर व्हिडिओ कसा संपादित करावा हे जाणून घ्या.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5464354361670257426
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false