तुमचे दस्तऐवज उपयुक्त अल्बममध्ये क्रमाने लावणे

स्क्रीनशॉट, आयडी, पावत्या आणि इव्हेंटची माहिती यांसारख्या उपयुक्त अल्बममध्ये तुमचे दस्तऐवज आपोआप क्रमाने लावण्यासाठी तुम्ही Google Photos वापरू शकता.

दस्तऐवजांसाठी तुमचे ऑटोमॅटिक फोटो अल्बम शोधा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos ॲप उघडा.
  2. तळाशी, शोधा वर टॅप करा.
  3. “दस्तऐवज” वर खाली स्‍वाइप करा.
  4. सर्व पहा वर टॅप करा.

टीप: तुम्हाला ऑटोमॅटिक फोटो अल्बम न आढळल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुम्ही बॅकअप सुरू केला असल्याची खात्री करा. ऑटोमॅटिक अल्बम हे फक्त बॅकअप घेतलेल्या फोटोसाठी उपलब्ध आहेत. बॅकअप सुरू किंवा बंद कसा करावा हे जाणून घ्या.
  • नंतर पुन्हा तपासा. दस्तऐवजांना त्यांच्या अल्बममध्ये क्रमाने लावण्यासाठी थोडा वेळ लागतो.

ऑटोमॅटिक संग्रहण सुरू किंवा बंद करणे

महत्त्वाचे: तुमच्या फोटोचे वय हे तो घेतलेल्या तारखेपासून मोजले जाते, शेअर केल्याच्या तारखेपासून नाही.

तुम्ही ऑटो संग्रहण सुरू करता, तेव्हा तुमच्या दस्तऐवजांचे ३० दिवसांपेक्षा जुने फोटो हे तुमच्या Photos च्या दृश्यामधून लपवले जातात आणि ते फक्त तुमच्या दस्तऐवजांच्या ऑटोमॅटिक अल्बममध्ये उपलब्ध असतात. तुम्ही ऑटो संग्रहण बंद केल्यास, पूर्वी संग्रहित केलेले सर्व अल्बम हे संग्रहित केलेले राहतील. आयटम संग्रहणातून काढून कसे टाकायचे हे जाणून घ्या.

ऑटो संग्रहण सुरू किंवा बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos ॲप उघडा.
  2. तळाशी, शोधा वर टॅप करा.
  3. “दस्तऐवज” वर खाली स्‍वाइप करा.
  4. वर्गवारीवर टॅप करा.
  5. ३० दिवसांनंतर संग्रहित करा सुरू किंवा बंद करा.

टीप: अल्बममधून वैयक्तिक फोटो मॅन्युअली संग्रहित करण्यासाठी, फोटो निवडण्यासाठी स्‍पर्श करून धरून ठेवा आणि आणखी More आणि त्यानंतर संग्रहण मध्ये हलवा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17148358586773502781
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false