उच्च डायनॅमिक रेंज (HDR) फोटोविषयी जाणून घ्या

उच्च डायनॅमिक रेंज (HDR) सह, वास्तविक जगामध्ये मानवी डोळ्यांना जे दिसते त्यापेक्षा अधिक तपशिलांसह तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता. साधारण डायनॅमिक रेंज (SDR) फोटोमध्ये या पातळीवरील तपशील शक्य नाही. HDR फोटो हे अधिक ऑथेंटिक असलेले फोटो तयार करण्यासाठी गडद अंधारात आणि सर्वात चमकदार प्रकाशात आणखी तपशील कॅप्चर करतात.

फोटो HDR मध्ये दाखवण्यासाठी, तुमच्याकडे कंपॅटिबल डिव्हाइस असणे आवश्यक आहे. १००० nits पेक्षा जास्त ब्राइटनेस असलेल्या डिस्प्लेवर HDR फोटो दाखवणे शक्य आहे. कंपॅटिबिलिटीसाठी तुमच्या डिव्हाइसचे तपशील पहा.

महत्त्वाचे: Google Photos अल्ट्रा HDR इमेज फॉरमॅटला सपोर्ट करते.

तुमचे फोटो HDR मध्ये दाखवणे

महत्त्वाचे: तुमच्या वैशिष्ट्यीकृत मेमरी HDR मध्ये उपलब्ध असल्यास, तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरती, वैशिष्ट्यीकृत मेमरी कॅरावसलमध्ये त्या HDR मध्ये दाखवल्या जातील. वैशिष्ट्यीकृत मेमरीविषयी अधिक जाणून घ्या.

मुख्य फोटो ग्रीडमध्ये, सर्व फोटो आणि व्हिडिओ SDR मध्ये थंबनेल म्हणून दिसतात. HDR वापरून काढलेले फोटो संपूर्ण तपशिलांसह दाखवण्यासाठी:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com उघडा.
  2. तुम्हाला हव्या असलेल्या फोटोवर क्लिक करा.

टीप: काही फोटो अजूनही SDR मध्ये दिसतील. काही इमेज HDR मध्ये का दिसत नाहीत हे समजून घ्या.

HDR फोटोविषयी अधिक जाणून घ्या

काही इमेज HDR मध्ये का दिसत नाहीत हे समजून घ्या
  • SDR मध्ये काढलेले फोटो नेहमी SDR मध्ये दिसतात.
  • तुमचे डिव्हाइस आणि स्क्रीन HDR ला सपोर्ट करत नसल्यास, या इमेज SDR मध्ये दिसतील.

टीप: तुमचा फोटो इतर डिव्हाइसच्या तुलनेत वेबवर वेगळा दिसत असल्यास, तुमच्या सिस्टीम डिस्प्ले सेटिंग्जमध्ये HDR सेटिंग सुरू करून पहा.

HDR फोटो साठी बॅकअप कसा काम करतो हे पहा
तुमच्या कॉंप्युटरवरून, तुम्ही HDR फोटोचा बॅकअप घेऊ शकता. बॅकअप घेतलेले फोटो सर्व प्रकारच्या बॅकअपच्या गुणवत्तेसाठी HDR सेटिंग्ज सेव्ह करतात. फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप कसा घ्यावा हे जाणून घ्या.
तुम्ही HDR फोटो संपादित केल्यावर काय होते हे जाणून घ्या

तुम्ही HDR फोटो संपादित केल्यास, तुम्ही तुमची संपादने सेव्ह करता, तेव्हा फोटो HDR मध्ये राहू शकतो.

टीप: HDR फोटोवरील फक्त काही संपादनांना अनुमती आहे. संपादनामुळे फोटोची HDR सेटिंग्ज गमावल्यास, संपादित केलेले HDR फोटो हे SDR म्हणून सेव्ह केले जातील.

तुमचे फोटो कसे संपादित करावेत हे जाणून घ्या.

हायलाइट व्हिडिओसारख्या क्रीएशनमध्ये HDR फोटोच्या बाबतीत काय होते हे जाणून घ्या

तुम्ही HDR आणि SDR फोटो किंवा व्हिडिओचे मिश्रण निवडल्यास:

  • हायलाइट व्हिडिओ संपादक हे तुमच्या निवडी SDR म्हणून दाखवते आणि वापरते.
  • हायलाइट व्हिडिओ SDR म्हणून सेव्ह केला जातो.

टीप: काही क्रीएशन HDR मध्ये उपलब्ध नाहीत. क्रीएशनविषयी अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2737821858428880805
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false