तुमच्या Chromebook वरील Google Photos Android अ‍ॅप वापरून तुमचे फोटो आणि व्हिडिओ संपादित करणे

तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ संपादित करण्यासाठी व हायलाइट व्हिडिओ तयार करण्यासाठी तुमच्या Chromebook वरील Google Photos Android ॲप वापरू शकता.

महत्त्वाचे:

फोटो किंवा व्हिडिओ संपादित आणि वर्धित करणे

महत्त्वाचे: मॅजिक इरेझर सारखी काही वैशिष्ट्ये Google Photos Android ॲपमध्ये फक्त Chromebook Plus वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. Chromebook Plus सोबत मॅजिक इरेझर वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या Chromebook वर, Google Photos ॲप उघडा.
  2. तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
  3. संपादित करा निवडा.
  4. तुमच्या फोटो किंवा व्हिडिओवर वापरण्यासाठी संपादन टूल निवडा. काही वैशिष्ट्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:
    • सूचना : पोर्ट्रेट आणि रंग पॉप यांसारख्या वर्धित संपादन टूलसाठी सूचना दिल्या जातात.
    • टूल : पोर्ट्रेट ब्लर आणि आकाश यांसारख्या इतर संपादन टूलमधून निवडा.
    • अ‍ॅडजस्ट करा : ब्राइटनेस, कॉंट्रास्ट आणि शॅडो यांसारखी अधिक तपशीलवार संपादने मॅन्युअली लागू करा.
    • फिल्टर Filter: तुमचे फोटो किंवा व्हिडिओ आकर्षक बनवण्यासाठी प्रीसेट फिल्टर लागू करा.
    • मार्कअप : तुमच्या फोटोमध्ये फ्रीहँड लेखन किंवा मजकूर मॅन्युअली जोडा.
  5. पूर्ण झाल्यावर सर्वात वरती, सेव्ह करा वर क्लिक करा. यामुळे मूळ फाइल ओव्हरराइट करून नवीन संपादनांसह नवीनतम आवृत्ती सेव्ह केली जाईल.

टीप: तुम्हाला मॅजिक इरेझर यांसारखी अतिरिक्त संपादन टूल दिसत नसल्यास:

  1. तुम्ही वाय-फायशी कनेक्ट केले असल्याचे आणि तुमच्याकडे डिव्हाइस स्टोरेज उपलब्ध असल्याची खात्री करा.
  2. Google Photos मध्ये, इमेज निवडा आणि संपादित करा निवडा. तुम्हाला अपडेट सूचना मिळू शकते.
  3. काही मिनिटांनंतर, ॲप बंद करा आणि पुन्हा उघडा.
  4. तुमची संपादन टूल पुन्हा वापरण्यासाठी, इमेज निवडा आणि संपादित करा निवडा.

तुमची संपादन टूल पुन्हा वापरण्यासाठी, इमेज निवडा आणि संपादित करा निवडा.

उपलब्ध असलेली संपादन वैशिष्ट्ये

Google Photos मधील काही संपादन वैशिष्ट्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • एखाद्या व्यक्तीच्या पोर्ट्रेटमधील स्थान आणि ब्राइटनेस अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, पोर्ट्रेट लाइट निवडा.
  • बॅकग्राउंड ब्लर अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, ब्लर करा निवडा.
    • तुमच्या फोटोमध्ये फोकस केलेल्या गोष्टीव्यतिरिक्त आसपासच्या गोष्टी ब्लर करून अ‍ॅडजस्ट करण्यासाठी तुम्ही खोली देखील वापरू शकता.
  • अनेक पॅलेटमधून निवडण्यासाठी आणि आकाशाचा रंग व कॉंट्रास्ट अ‍ॅडजस्ट करण्यासाठी आकाश निवडा.
  • बॅकग्राउंड डीसॅच्युरेट करण्यासाठी, पण फोरग्राऊंड रंगीत ठेवण्यासाठी, कलर फोकस निवडा.
  • आणखी संतुलित फोटोसाठी संपूर्ण इमेजवर ब्राइटनेस आणि कॉंट्रास्ट वर्धित करण्याकरिता HDR निवडा.

टीप: तुम्ही आणखी संपादन वैशिष्ट्ये वापरू शकता. तुमचे फोटो आणि व्हिडिओ संपादित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

सिनेमॅटिक फोटो तयार करणे
  1. तुमच्या Chromebook Plus वर, Photos उघडा.
  2. उपयुक्तता निवडा.
  3. "नवीन तयार करा" या अंतर्गत, सिनेमॅटिक फोटो निवडा.
  4. फोटो निवडा.
  5. तळाशी, सेव्ह करा निवडा.
Google Photos मध्ये कोलाज तयार करणे आणि संपादित करणे

तुम्ही Google Photos अ‍ॅप किंवा वेबवर तुमच्या लायब्ररीमधील फोटो वापरून कोलाज तयार करू शकता आणि संपादित करू शकता. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर तुमचे कोलाज संपादित करण्यासाठी, Google Photos अ‍ॅप वापरा. काही वैशिष्ट्ये वेबवर उपलब्ध नाहीत.

पायरी १: तुमचे फोटो निवडणे

  1. तुमच्या Chromebook वर, Google Photos ॲप उघडा.
  2. कमाल ६ फोटो निवडा.
  3. तळाशी, यामध्ये जोडा Create आणि त्यानंतर कोलाज निवडा.

पायरी २: डिझाइन निवडणे आणि तुमचे फोटो संपादित करणे

तुम्ही तुमचा कोलाज सेव्ह करण्यापूर्वी, तुमचे फोटो बदलणे, संपादित करणे, फिरवणे, आकार आणि क्रम बदलणे या सर्व गोष्टी करू शकता.

  1. कोलाजचे डिझाइन निवडा.
  2. तुमचे फोटो संपादित करा.
    • फोटो बदलण्यासाठी:
      1. तुम्हाला बदलायचा असलेला फोटो निवडा आणि त्यानंतर बदला निवडा.
      2. नवीन फोटो निवडा.
      3. पूर्ण झाले निवडा.
    • फोटो संपादित करण्यासाठी, तुम्हाला संपादित करायचा असलेला फोटो आणि त्यानंतर संपादित करा निवडा.
    • फोटो फिरवण्यासाठी:
      1. फोटोला स्‍पर्श करून धरून ठेवा.
      2. तुम्हाला हव्या असलेल्या स्थानावर पोहोचेपर्यंत फोटो फिरवा.
    • फोटो फ्रेममध्ये झूम इन करण्यासाठी, पिंच करून स्क्रीन उघडा किंवा झूम आउट करण्यासाठी पिंच करून स्क्रीन बंद करा.
    • फोटोचा क्रम बदलण्यासाठी, फोटोला स्‍पर्श करून धरून ठेवा, त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या स्थानावर तो ड्रॅग करा.

पायरी ३: तुमच्या कोलाजचे पुनरावलोकन करणे आणि ते सेव्ह करणे

तुम्ही कोलाज लेआउट निवडल्यानंतर आणि तुमच्या फोटोमध्ये कोणतीही संपादने केल्यानंतर, तुमचे कोलाज सेव्ह करण्यासाठी, सेव्ह करा निवडा.

पायरी ४: तुमचे कोलाज शोधणे

  1. तुमच्या Chromebook वर, Google Photos उघडा.
  2. तळाशी, शोधा निवडा.
  3. "क्रीएशन" या अंतर्गत, सेव्ह केलेली क्रीएशन निवडा.

हायलाइट व्हिडिओ तयार करणे

  1. तुमच्या Chromebook वर, Google Photos ॲप उघडा.
  2. क्रीएशन निवडा.
  3. नवीन तयार करा Add आणि त्यानंतर चित्रपट निवडा.
    • सुचवलेल्या हायलाइट व्हिडिओसाठी, पर्यायी प्रीसेट थीम निवडा.
    • किंवा नवीन चित्रपट वर क्लिक करा आणि तुम्हाला समाविष्ट करायचे असलेले फोटो व व्हिडिओ निवडा.

टीप: हायलाइट व्हिडिओ तयार करण्यासाठी, तुम्ही लाँचर देखील उघडू शकता आणि "चित्रपट" शोधू शकता.

तुमच्या हायलाइट व्हिडिओमध्ये फोटो किंवा व्हिडिओ जोडणे

तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, तुम्हाला तुमच्या हायलाइट व्हिडिओचा स्टोरीबोर्ड मिळेल. स्टोरीबोर्डमध्ये, तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ क्लिप जोडू शकता आणि त्यांना पुन्हा संगतवार लावण्यासाठी ड्रॅग करून ड्रॉप करू शकता.

  1. जोडा Add निवडा.
  2. नवीन फोटो किंवा व्हिडिओ निवडा.

तुमच्या हायलाइट व्हिडिओमध्ये फोटो आणि व्हिडिओ संपादित करणे

  1. फोटो किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी क्लिपवर टॅप करा.
  2. संपादन पॅनलमध्ये तुम्हाला वापरायचे असलेले टूल निवडा. तुम्ही जसजसे बदल कराल, तसे ते लागू होतील.
  3. संपादन पॅनल बंद करण्यासाठी, प्रेस करा.

तुमच्या हायलाइट व्हिडिओमध्ये संगीत जोडणे

  1. जोडा Add निवडा.
  2. सर्वात वर, साउंडट्रॅक जोडा निवडा.
  3. माझे संगीत किंवा थीम संगीत निवडा.
    • तुमच्या वैयक्तिक लायब्ररीमधून संगीत जोडण्यासाठी, माझे संगीत निवडा.
    • ॲपच्या साउंडट्रॅक लायब्ररीमध्ये उपलब्ध संगीत जोडण्यासाठी, थीम संगीत निवडा.
  4. तुम्हाला जोडायचे असलेले संगीत निवडा.

Chromebook Plus सोबत मॅजिक इरेझर वापरणे

महत्त्वाचे:तुमचे डिव्हाइस हे ChromeOS ची 118 किंवा त्यानंतरची आवृत्ती असलेले Chromebook Plus असणे आवश्यक आहे.

  1. IPhotos Android अ‍ॅपमध्ये, तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या फोटोवर जा.
  2. संपादित करा आणि त्यानंतर टूल आणि त्यानंतर मॅजिक इरेझर वर टॅप करा.
  3. सूचनेवर टॅप करा. फोटोमधील आणखी व्यत्यय मिटवण्यासाठी तुम्ही वर्तुळ किंवा ब्रशदेखील वापरू शकता.
  4. ऑब्जेक्ट फोटोसोबत ब्लेंड करण्यासाठी, कामूफ्लाज वर टॅप करा आणि ब्रश वापरा.
  5. पूर्ण करण्यासाठी, पूर्ण झाले वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13768317339933574343
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false