फेस ग्रुप स्टोरेज धोरण

तुम्ही Google Photos मध्ये फेस ग्रुप वापरून तुमच्या मित्रमैत्रिणींचे फोटो सहजपणे शोधू शकता.

फेस ग्रुप कसे काम करते हे जाणून घ्या

फेस ग्रुप ३ पायऱ्यांमध्ये होते:

  1. आम्ही फोटोमध्ये कोणताही चेहरा आहे का ते डिटेक्ट करतो.
  2. फेस ग्रुप वैशिष्ट्य सुरू केलेले असल्यास, चेहऱ्यांच्या इमेजचे अंकांनुसार सादरीकरण करणारी फेस मॉडेल तयार करण्यासाठी, चेहऱ्यांच्या विविध इमेजमधील समानतेविषयी पूर्वानुमान लावण्यासाठी आणि या विविध इमेज त्याच चेहऱ्याच्या आहेत का याचा अंदाज लावण्यासाठी अल्गोरिदम वापरली जातात.
  3. एकाच व्यक्तीचे असण्याची शक्यता असलेले, खूप साम्य असणारे चेहरे असलेले फोटो फेस ग्रुपमध्ये एकत्र गटबद्ध केले जातात. फोटो चुकीच्या गटामध्ये असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तो फेस ग्रुपमधून कधीही काढून टाकू शकता.

तुम्ही कोणत्याही फेस ग्रुपवर नावाचे किंवा टोपणनावाचे लेबलदेखील जोडू शकता.

तुम्ही फेस ग्रुप बंद करता तेव्हा काय होते

तुम्ही फेस ग्रुप बंद केल्यास, पुढील सर्व हटवता:

  • तुमच्या खात्यामधील फेस ग्रुप
  • फेस ग्रुप तयार करण्यासाठी वापरलेले फेस मॉडेल
  • तुम्ही तयार केलेली फेस लेबल

तुम्ही फोटो आणि व्हिडिओ हटवता तेव्हा काय होते

तुम्ही स्वतंत्र फोटो किंवा व्हिडिओ हटवल्यास, विशेषतः त्या फोटो किंवा व्हिडिओवरून तयार केलेली सर्व फेस मॉडेल हटवाल.

तुम्ही तुमचे Google खाते हटवता तेव्हा काय होते

तुम्ही तुमचे Google खाते हटवता, तेव्हा पुढील गोष्टींच्या समावेशासह तुम्ही तुमचा सर्व Google Photos आशय हटवता:

  • तुमच्या खात्यामधील फेस ग्रुप
  • फेस ग्रुप तयार करण्यासाठी वापरलेले फेस मॉडेल
  • तुम्ही तयार केलेली फेस लेबल

तुमचे Google Photos खाते इनॅक्टिव्ह असते तेव्हा काय होते

तुमचे Google Photos खाते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ इनॅक्टिव्ह असते, तेव्हा पुढील गोष्टींच्या समावेशासह Google Photos मधून तुमचा सर्व फेस ग्रुप आशय हटवला जातो:

  • तुमच्या खात्यामधील फेस ग्रुप
  • फेस ग्रुप तयार करण्यासाठी वापरलेले फेस मॉडेल
  • तुम्ही तयार केलेली फेस लेबल

सुरक्षित आणि पूर्णपणे हटवणे सुरू करा

हटवलेला डेटा हा आमच्या स्टोरेज सिस्टीममधून सुरक्षित आणि पूर्णपणे हटवला गेल्याची खात्री Google कशी करते ते जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5900187514040186893
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false