Google Photos तुमचा स्थान डेटा कसा संरक्षित करते

स्थाने बाय डीफॉल्ट खाजगी असतात. तुम्ही नवीन संभाषण किंवा शेअर केलेला अल्बम तयार करता तेव्हा अथवा तुम्ही भागीदार शेअरिंग सेट करता तेव्हा, तुम्ही स्थानाचा समावेश करण्याचे निवडले असेल तरच Google Photos स्थाने शेअर करते.

Google Photos वापरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • कोणत्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये स्थानाची माहिती आहे हे तपासणे
  • अंदाजे स्थाने संपादित करणे किंवा काढून टाकणे
  • फोटो शेअर करताना स्थान डेटाचा समावेश करण्याचे निवडणे

तुमच्या फोटोवरील स्थाने कशी काम करतात

फोटोमध्ये स्थान डेटाचा समावेश करण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ घेता, तेव्हा कॅमेरा अ‍ॅप हे स्‍थान डेटा कॅप्चर आणि सेव्ह करू शकते. किंवा Google Photos हे तुमच्या फोटोमध्ये डिटेक्ट केलेल्या खुणेच्या जागा आणि स्थानाचा समावेश असलेल्या इतर फोटोसह असलेल्या समानता यांसारख्या मशीन लर्निंगच्या आधारे स्थानाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करेल.

आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करतो

महत्त्वाचे: तुम्ही इतरांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करता तेव्हा, स्थानाचा समावेश केला नसेल तरीदेखील, ते तुमच्या फोटो व व्हिडिओमधील खुणेच्या जागांवरून अंदाज लावू शकतात.
  • स्‍थान डेटा जाहिरातदारांसोबत कधीही शेअर केला जात नाही.
  • भागीदार शेअरिंग व्यतिरिक्त, नवीन अल्बम, लिंक, संभाषणे आणि तुम्ही शेअर केलेल्या इतर आयटममध्ये स्थानाचा बाय डीफॉल्ट समावेश नसतो.

तुम्ही नियंत्रक आहात

  • तुम्ही इतरांसोबत शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये स्थानाचे तपशील शेअर करण्याचे निवडू शकता.
  • तुम्ही फोटो काढता तेव्हा तुमच्या डिव्हाइसने स्थान डेटा गोळा करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमच्या कॅमेरा अ‍ॅपमधून स्थान डेटा गोळा करणे बंद करा.
  • Photos ने तुमच्या स्थानाचा अंदाज लावावा की नाही ते तुम्ही नियंत्रित करू शकता. 
  • तुम्ही अंदाजे स्थान संपादित करू शकता किंवा काढून टाकू शकता अथवा उपलब्ध नसलेली स्थान माहिती जोडू शकता.
  • तुम्ही स्थानाचे तपशील शेअर करण्याचे निवडले तरीदेखील, अंदाजे स्थाने शेअर केली जाणार नाहीत.

तुमच्या फोटोची स्थाने कशी व्यवस्थापित करावीत याबद्दल जाणून घ्या.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5498892950152944981
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false