Google Pay अटी आणि नियम: ऑफर आणि रिवॉर्ड

बंधनकारक करारनामा:

Google Pay ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्ही अटी आणि नियमांशी सहमत असणे आवश्यक आहे. तुम्ही सहमत आहात की तुमच्या ऑफरमधील सहभागामध्ये तुम्ही ऑफर अटी आणि नियम समजणे आणि त्यांच्याशी सहमत असणे समाविष्ट आहे. या ऑफर अटी आणि नियम तुम्ही व Google यांच्यामध्ये ऑफरच्या संदर्भात कायदेशीर करारनामा तयार करतात आणि येथे वापरलेल्या कोणत्याही परिभाषित संज्ञांना Google Pay सेवा अटी यांमध्ये नमूद केलेला अर्थ आहे. ऑफर आवश्यकतांची पूर्तता न करणार्‍या किंवा ऑफरचा गैरवापर अथवा फसवणूक किंवा संशयास्पद व्यवहार/अ‍ॅक्टिव्हिटीच्‍या समावेशासह, परंतु त्यापुरते मर्यादित न राहता अशा कारणांच्या बाबतीत कोणत्याही वापरकर्त्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार Google स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार राखून ठेवते. कोणतीही Google Pay ऑफर किंवा Google Pay ऑफर उपक्रम कधीही थांबवण्याचा किंवा बदलण्याचा हक्कदेखील Google, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार राखून ठेवते.

पात्रता:

तुम्ही Google Pay सेवा अटी चे पालन करण्यासोबत, प्रत्येक ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ऑफरचे तपशील आणि प्रत्येक ऑफरसाठी असलेल्या पात्रता अटी व नियम हे प्रमोशन विभागाच्या अंतर्गत दिले आहेत. एखाद्या विशिष्ट वापरकर्त्यास दिलेल्या ऑफर या वापरकर्त्यानुसार बदलू शकतात. कृपया तुमच्या Google Pay अ‍ॅप मध्ये दिलेल्या तुमच्या ऑफरसाठी लागू असलेल्या अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा.

रिवॉर्ड:

Google Pay भारत च्या सर्व वापरकर्त्यांमध्ये सरासरी दावा केलेल्या स्क्रॅच कार्डपैकी ५९% चे मूल्य INR १ ते INR ५००० किंवा विशिष्ट व्यापाऱ्याशी संबंधित सूट इतके होते आणि ४१% लोकांना कोणतीही रिवॉर्ड मिळाली नाहीत. लागू असलेल्या ऑफर अटींमध्ये नमूद केल्यानुसार स्क्रॅच कार्डनुसार संभाव्य रोख रकमेच्या रिवॉर्डची रेंज बदलते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यानच्या डेटावर आधारित.

प्रत्येक स्क्रॅच कार्डसाठी, तुम्हाला मिळणारी रक्कम तुमची आधीची रिवॉर्ड, तुमची पेमेंट पद्धत आणि तुम्ही किती वारंवार पेमेंट करता व अ‍ॅप वापरता यांसारख्या Google Pay अ‍ॅपमध्ये तुम्ही करत असलेल्या आणि ठेवत असलेल्या गोष्टी, अशा घटकांच्या आधारावर कदाचित निर्धारित केली जाते.

तुम्ही तुमच्या ऑफर रिवॉर्डवर ४५ दिवसांच्या आत दावा न केल्यास किंवा रिवॉर्डवर दावा केल्यापासून ४५ दिवसांच्या आत तुमचे UPI सुरू केलेले बचत खाते तुमच्या खात्याशी लिंक न केल्यास अथवा तुम्ही दावा केल्यानंतर ४५ दिवसांमध्ये तुमच्या लिंक केलेल्या UPI खात्याशी संबंधित समस्यांमुळे रिवॉर्डची रक्कम जमा करता न आल्यास, तुमचे रिवॉर्ड गमावले आहे असे मानले जाईल आणि त्यानंतर ते तुम्हाला उपलब्ध नसेल.

 

false
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
7520141190307028297
true
मदत केंद्र शोधा
true
true
false
true
true
722700
false
false
false
false