"Google Pay" ही सेवा भारतात राहणाऱ्या वापरकर्त्यांना Google India Digital Services Private Limited कडून देण्यात आली आहे ज्याचे नोंदणीकृत ऑफिस हे पाचवा मजला, डीएलएफ सेंटर, ब्लॉक १२४, नरेंद्र प्लेस, संसद मार्ग, नवी दिल्ली - ११०००१ ("Google") आणि हिचे पूर्वीचे नाव Tez असे होते. Google Pay अॅक्सेस करून, डाउनलोड करून किंवा त्याचा वापर करून तुम्ही पुढील गोष्टींचे पालन करण्यास सहमती दर्शवता आणि त्यांच्याशी बांधील राहता:
- Google सेवा अटी ("जागतिक अटी");
- भारतातील रहिवाशांसाठी Google Pay सेवा अटी ("Google Pay अटी");
- Google गोपनीयता धोरण ("गोपनीयता धोरण").
- Google Pay धोरणे ("Google Pay धोरणे"); आणि
- Google Pay ऑफर सेवा अटी ("सामान्य Google Pay ऑफर अटी")
या पाच दस्तऐवजांचा येथे एकत्रितपणे "एकत्रित Google Pay अटी" म्हणून निर्देश केला आहे.
तक्रारी
पातळी १ - तक्रार नोंदणीआम्ही तुम्हाला Google Pay India मदत केंद्र द्वारे आमच्या सपोर्टशी किंवा खाली दिलेल्या सपोर्टच्या माध्यमांद्वारे आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधण्याची शिफारस करतो
Google Pay India च्या ग्राहक सेवा नंबरवर कॉल करणे
तुम्ही ग्राहक सेवेच्या पुढील टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता: १-८००-४१९-०१५७. आमचा फोन सपोर्ट हा ५ भाषांमध्ये उपलब्ध आहे (हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड आणि तेलुगु).
अॅपमधील सपोर्ट
- Google Pay अॅप
उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- मदत मिळवा वर टॅप करा.
- IAT नोंदवण्यासाठी: तुम्हाला समस्या आहेत का? वर टॅप करा.
- चॅट सपोर्ट सुरू करण्यासाठी किंवा ग्राहक सेवा नंबरवर कॉल करण्यासाठी: सपोर्टशी संपर्क साधा वर टॅप करा.
आमचे मदत केंद्र याला भेट द्या
- Google Pay मदत केंद्र उघडा.
- होम पेजवरील लेखांच्या सूचीमधून तुम्हाला येत असलेली समस्या शोधा.
- तुमच्या समस्येसाठी उपयुक्त असलेला मदतीचा विषय ब्राउझ करा.
तुम्ही तक्रार केल्यानंतर १५ दिवसांच्या आत पातळी १ वर दिलेल्या निराकरणाने तुमचे समाधान न झाल्यास: L2 विनंती नोंदवण्यासाठी, कृपया हा फॉर्म भरून Google Pay India शी संपर्क साधा.
तुमच्या समस्येची तुमचा पेमेंट सेवा पुरवठादार (PSP) याच्याकडे तक्रार करण्यासाठी, त्याच्याशी पुढील लिंकद्वारे संपर्क साधा:
तुम्ही तक्रार केल्यानंतर १५ दिवसांच्या आत पातळी २ वर दिलेल्या निराकरणाने तुमचे समाधान न झाल्यास: तुम्ही हा फॉर्म भरून Google Pay नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचा पातळी २ वरील संदर्भ क्रमांक नमूद करू शकता.
Google Pay नोडल अधिकाऱ्याचे संपर्क तपशील:
- नाव: राहूल धिमन
- पत्ता: पाचवा मजला, डीएलएफ सेंटर, ब्लॉक १२४, नरेंद्र प्लेस, संसद मार्ग, नवी दिल्ली सेंट्रल, नवी दिल्ली - ११०००१, भारत
बाह्य घटकांमुळे निवारण प्रक्रियेला अधिक वेळ लागत असल्यास, आम्ही तुम्हाला विलंबाचे कारण आणि अपेक्षित निराकरणासंबंधित टाइमलाइनबद्दल त्यानुसार अपडेट करू.
- NPCI द्वारे निराकरण: तुमच्या समस्येची NPCI कडे तक्रार करण्यासाठी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडे तक्रार करायची असल्यास, विवाद निराकरण यंत्रणा यासंबंधित तक्रार सबमिट करा.
- RBI द्वारे निराकरण: एकात्मिक लोकपाल योजना २०२१ नुसार, वापरकर्त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लोकपाल याकडे जाण्याचा अधिकार आहे.
टीप: अधिक तपशिलांसाठी, कृपया आमच्या तक्रार हाताळण्यासंबंधित धोरण याचा संदर्भ घ्या.
कर्ज आणि इतर संबंधित तक्रारींबद्दल अधिक जाणून घ्या.