Google Maps प्रोफाइल फॉलो करा

तुम्ही निवडक Maps कंट्रिब्युटर आणि पडताळणी केलेली खाती शोधू व फॉलो करू शकता.

महत्वाचे: तुमची प्रोफाइल निर्बंधित म्हणून सेट केली नसल्यास, तुमच्या प्रोफाइलवर तुम्ही कोणाला फॉलो करत आहात आणि तुम्हाला कोण फॉलो करते याचे इतर Google Maps वापरकर्त्यांना पुनरावलोकन करता येईल. तुमची प्रोफाइल निर्बंधित म्हणून सेट केली असल्यास, तुम्ही कोणाला फॉलो करत आहात आणि तुम्हाला कोण फॉलो करते याचे फक्त तुम्हाला फॉलो करत असलेल्या लोकांना पुनरावलोकन करता येईल.

Maps कंट्रिब्युटर किंवा पडताळणी केलेले खाते फॉलो करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. अपडेट Updates आणि त्यानंतर फॉलो करत आहे वर टॅप करा.
  3. फॉलो करण्यासाठी सुचवलेले लोक दाखवणाऱ्या कार्डकरिता खाली स्क्रोल करा. फॉलो करा वर टॅप करा.

टीप: तुम्हाला Maps कंट्रिब्युटरला थेट फॉलो करता येण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही एक्सप्लोर करा टॅबवर त्यांच्या पोस्टमधून फॉलो करा वर टॅप करू शकता.

तुम्ही Maps कंट्रिब्युटर किंवा पडताळणी केलेले खाते फॉलो केल्यानंतर, तुम्हाला "फॉलो करत आहे" या टॅबमध्ये त्यांची परीक्षणे, रेटिंग, फोटो आणि Google Maps वरील इतर सार्वजनिक योगदाने दिसतील. तुम्ही कमाल १०,००० कंट्रिब्युटरना किंवा खात्यांना फॉलो करू शकता.

तुमच्या शिफारशी बदलणे

तुमच्या भागाची प्राधान्ये आणि तुम्ही सुचवलेल्या संपर्कांवर आधारित आम्ही शिफारस कॅरावसलमध्ये लोकांची शिफारस करतो. संपर्क म्हणून कोणाला सेव्ह केले आहे आणि सुचवले आहे ते कसे बदलावे ते जाणून घ्या.

वेगळ्या भागामधील शिफारशी मिळवण्यासाठी, तुमची भागांशी संबंधित प्राधान्ये अपडेट करा:

  1. तुमच्या Android फोनवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, अपडेट Updates वर टॅप करा.
  3. शिफारशी कार्डवर खाली स्क्रोल करा, त्यानंतर आणखी आणखी आणि त्यानंतर तुमचे भाग व्यवस्थापित करा वर टॅप करा.
    टीप: तुम्हाला स्वारस्य असलेल्या किंवा ज्यामध्ये स्वारस्य नाही अशा भागांची सूची तुम्ही तयार करू शकता.
  4. पर्याय निवडा:
    • या सूचीमधून भाग काढून टाकण्यासाठी, काढून टाका काढून टाका वर टॅप करा.
    • नवीन भाग जोडण्यासाठी, भाग जोडा वर टॅप करा आणि नकाशा हलवा.
    • भाग निवडा वर टॅप करा.
महत्त्वाचे: Gmail आणि Photos यांसारख्या Google सेवांवर तुम्ही कोणाशी संवाद साधला आहे याच्या आधारे आम्ही तुम्ही कदाचित ओळखत असलेल्या लोकांसंबंधित सूचना देतो. सुचवलेल्या संपर्कांबद्दल अधिक जाणून घ्या.
 

तुमची इतरांना शिफारस केली जावी का ते बदला

आम्ही शिफारशी कॅरावसलमध्ये सुसंवादांनुसारदेखील लोकांची शिफारस करतो. तुम्हाला कोण फॉलो करू शकते आणि तुमची शिफारस कोणत्या लोकांना केली जावी हे मर्यादित करण्यासाठी, तुमच्या प्रोफाइलची दृश्यमानता बदला. तुमची प्रोफाइल तुम्ही निर्बंधित यावर सेट केल्यास, तुमच्या प्रोफाइलची शिफारस इतरांना केली जात नाही आणि तुम्ही कोणाला फॉलो करत आहात हे लोक पाहू शकत नाही. तुमच्या प्रोफाइलची दृश्यमानता कशी बदलावी ते जाणून घ्या

तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांची अपडेट मिळवणे

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, अपडेट वर टॅप करा.

टीप: "फॉलो करत आहे" हा टॅब आधीपासून निवडलेला असेल आणि तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांची अपडेट तुम्हाला दिसतील.

महत्त्वाचे: आशय हा आमची आशय धोरणे किंवा लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आम्हाला आढळल्यास, Google तो काढून टाकू शकते. शिफारशींवर इतर कंपन्यांच्या पेमेंटचा परिणाम होत नाही. Google Maps मधील सशुल्क आशयाला लेबल लावले जाते.

Google Maps मध्ये प्रोफाइल अनफॉलो करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची प्रोफाइल वर टॅप करा.
  3. फॉलो करत आहे वर टॅप करा.
  4. तुम्हाला अनफॉलो करायच्या असलेल्या प्रोफाइलच्या बाजूला, फॉलो करत आहे वर टॅप करा.

Google Maps मध्ये व्यवसायाला अनफॉलो करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. 
  3. तळाशी, फॉलो करत आहे वर टॅप करा. तुम्ही फॉलो करत असलेल्या ठिकाणांची संपूर्ण सूची दिसेल.
  4. सूचीमध्ये, तुम्हाला अनफॉलो करायच्या असलेल्या ठिकाणावर टॅप करा त्यानंतर बॉक्समधील खूण काढून टाका.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5843421849843260076
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false