तुमची Google Maps योगदाने कोण शोधू शकेल ते नियंत्रित करणे

महत्वाचे: Google Maps मध्ये परीक्षणे, फोटो आणि रेटिंग सार्वजनिक असतात. Maps वर तुम्ही परीक्षणे, फोटो किंवा रेटिंग खाजगीरीत्या पोस्ट करू शकत नाही. परीक्षणे कशी लिहायची आणि ठिकाणाची रेटिंग कशी जोडायची ते जाणून घ्या.

योगदानांबद्दल

कोणीही तुमच्या प्रोफाइलवर तुमची सार्वजनिक योगदाने शोधू शकते.

Maps वरील सार्वजनिक माहितीमध्ये पुढील गोष्टी असतात:

  • नाव, फोटो आणि स्वतःची माहिती
  • तुम्ही Maps वर जोडलेली परीक्षणे, फोटो, प्रकाशित केलेल्या सूची आणि रेटिंग
  • तुमच्या योगदानांवरील लाइक आणि व्ह्यूची संख्या
  • स्थानिक मार्गदर्शक पातळी, पॉइंट, बॅज आणि योगदानांची संख्या

टीप: तुमची सार्वजनिक योगदाने तुमच्या प्रोफाइलवर आपोआप सापडतात. तुमची प्रोफाइल सेटिंग्ज तुम्ही कधीही बदलू शकता.

तुमची प्रोफाइल सेटिंग्ज अपडेट करून, Google Maps वरील तुमची प्रकाशित झालेली योगदाने आणि पोस्ट तुम्ही निर्बंधित करू शकता. तुम्ही तुमची योगदाने निर्बंधित केल्यावर, तुम्हाला नवीन फॉलोअरना त्यांनी तुमची परीक्षणे, फोटो आणि तुमच्या सार्वजनिक प्रोफाइलवरील इतर आशय पाहण्याआधी मंजुरी द्यावी लागेल.

प्रोफाइल दृश्यमानता सेटिंग्ज अपडेट करणे

  1.  तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर वैयक्तिक आशय आणि त्यानंतर प्रोफाइल गोपनीयता वर टॅप करा
  4. तुमची प्रोफाइल निर्बंधित करण्यासाठी हा स्विच वापरा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8138884879659399850
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false