Google Maps वर लाइव्ह व्ह्यू वापरणे

लाइव्ह व्ह्यू च्या मदतीने प्रत्यक्ष जगातील ठिकाणे शोधा आणि नेव्हिगेट करा. 

लाइव्ह व्ह्यू उपलब्धता

मार्ग दृश्य आधीपासून कव्हर करत असलेल्या भागांमध्ये तुम्हाला लाइव्ह व्ह्यू Maps AR सापडू शकते.

टीप: तुम्ही पहिल्या वेळी लाइव्ह व्ह्यू वापरून पाहता तेव्हा, तुमच्या कॅमेराचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी मेसेज पॉप अप होतो.

लाइव्ह व्ह्यू सह नेव्हिगेट करणे

पादचारी नेव्हिगेशनसाठी Google Maps दोन व्ह्यू देऊ करते: 2D नकाशा आणि लाइव्ह व्ह्यू. लाइव्ह व्ह्यू सह, तुम्हाला प्रत्यक्ष जगात ठेवलेले आणि तुमच्या स्क्रीनच्या तळाशी मिनी नकाशावर ठेवलेले दिशानिर्देश मिळतात. कोणत्याही प्रकारच्या प्रवासाच्या पायी जाण्याच्या टप्प्यादरम्यान तुम्ही लाइव्ह व्ह्यू नेव्हिगेशन वापरू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. शोध बारमध्ये, गंतव्यस्थान एंटर करा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. दिशानिर्देश Directions Blue वर टॅप करा.
  4. प्रवास मोड टूलबारमध्ये नकाशाच्या वर, पायी चालत वर टॅप करा.
  5. तळाशी मध्यभागी, लाइव्ह व्ह्यू Maps AR वर टॅप करा.
  6. तुमचे स्थान शोधण्यात Maps ला मदत करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
    टीप: तुमच्या फोनचा कॅमेरा हा झाडे आणि लोकांऐवजी, इमारतींच्या व रस्त्यावरील पाट्यांच्या दिशेने धरा.
  7. तुम्ही कुठे आहात हे Maps ला कळल्यावर, तुमच्या स्क्रीनवरील कॅमेरा व्ह्यूद्वारे तुम्हाला दिशानिर्देश दिसतील.
    टीप: सुरक्षिततेसाठी आणि बॅटरीची बचत करण्यासाठी, आम्ही सुचवतो, की कुठे जायचे आहे हे तुम्हाला कळल्यानंतर तुमच्या फोनचा वापर करू नका.
  8. पुढील नेव्हिगेशन पायरीवर किंवा गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर तुमचा फोन व्हायब्रेट होईल.
  9. तुम्हाला लाइव्ह व्ह्यू वर परत यायचे असेल तेव्हा फक्त तुमचा फोन टिल्ट करून उभ्या स्थितीत आणा किंवा लाइव्ह व्ह्यू बटण दाबा.

महत्त्वाचे: लाइव्ह व्ह्यू हे चालत्या वाहनात वापरण्यासाठी उद्देशित नाही. 

2D नकाशा दृश्यावर स्विच करणे

तुम्ही तुमचा फोन उभ्यावरून आडव्या स्थितीत हलवता, तेव्हा लाइव्ह व्ह्यू आणि 2D नकाशा दृश्य यांपैकी एक वापरू शकता. टिल्ट वैशिष्ट्य बाय डीफॉल्ट सुरू होते, परंतु सेटिंगमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही या पायर्‍या फॉलो करू शकता:

  1. In the top right, tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Settings आणि त्यानंतर Navigation settings.
  2. "पायी जाण्याचे पर्याय" अंतर्गत, लाइव्ह व्ह्यू Maps AR बंद करा.
  3. टिल्ट पर्याय बंद करा. 
Orient yourself with Live View

तुमच्या आसपासचा परिसर आणि जवळपासच्या खुणांसोबत लाइव्ह व्ह्यू मध्ये स्वतःचे स्थान झटपट निर्धारित करा. ठरावीक खुणा तुमच्यापासून किती दूर आहेत आणि तेथे कसे पोहोचायचे हेदेखील तुम्ही शोधू शकता. या खुणांमध्ये प्रेक्षणीय ठिकाणांचा समावेश असू शकतो, जसे की, न्यूयॉर्क शहरातील एंपायर स्टेट बिल्डिंग किंवा स्थानिक उद्याने आणि प्रवासी आकर्षणे यांसारखी सहजपणे ओळखता येणारी ठिकाणे.

खुणेच्या जागांचा वापर करून लाइव्ह व्ह्यू मध्ये स्वतःचे स्थान निर्धारित करण्याचे दोन मार्ग आहेत: 

  • एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा. त्यानंतर, तळाशी उजवीकडे, लाइव्ह Maps AR वर टॅप करा.
  • “रेस्टॉरंट” किंवा “शॉपिंग मॉल” यासारखी वर्गवारी शोधा, त्यानंतर नकाशा पहा वर टॅप करा.
    • ठिकाणांच्या निवडीवर स्क्रोल करा, त्यानंतर एक ठिकाण निवडा.
    • लाइव्ह Maps AR वर टॅप करा.

तुम्ही लाइव्ह व्ह्यू मध्ये आल्यावर:

  1. तुमचे स्थान शोधण्यात Maps ला मदत करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
    टीप: झाडे आणि लोकांऐवजी तुमचा कॅमेरा इमारतींवर आणि रस्त्यावरील पाट्यांवर रोखा.
  2. तुम्ही कुठे आहात हे Maps ला कळल्यावर, तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंतचे अंतर मिळेल. तुम्ही लाइव्ह व्ह्यू पादचारी नेव्हिगेशनदेखील एंटर करू शकता.
लाइव्ह व्ह्यू सह तुमच्या स्थानाची अचूकता वाढवणे
  1. तुम्ही बाहेर असताना तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps अ‍ॅप Google Maps उघडा.
  2. निळा बिंदू माझे स्थान आणि त्यानंतर लाइव्ह व्ह्यू सह कॅलिब्रेट करा Maps AR वर टॅप करा.
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

टिपा: 

  • तुमच्या फोनचा कॅमेरा हा झाडे आणि लोकांऐवजी, इमारतींच्या व तुमच्या आसपासच्या पाट्यांच्या दिशेने धरा.
  • मार्ग दृश्य च्या उपलब्धतेनुसार, Maps हे लाइव्ह व्ह्यू कॅलिब्रेटर कदाचित उघडेल किंवा उघडणार नाही.
  • तुमच्या स्थानाविषयी आणखी डेटा गोळा केल्याने तुमचे Maps वरील स्थान हे आणखी अचूक होते.

वर्गवारीनुसार लाइव्ह व्ह्यू मध्ये ठिकाणे शोधणे

हे वैशिष्ट्य फक्त लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क शहर, पॅरिस, सॅन फ्रान्सिस्को आणि टोकियो येथे उपलब्ध आहे.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. शोध बारमध्ये, कॅमेरा वर टॅप करा.
  3. "तयार आहे!" असा मजकूर दिसेपर्यंत तुमचा फोन इमारती किंवा पाट्यांवर पॅन करून रोखा.
    • जवळपासच्या ठिकाणांची भाष्ये दिसतील.
  4. स्थानाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी भाष्यावर कर्सर फिरवा किंवा टॅप करा.

    टीप: तुम्ही स्क्रीनच्या तळाशी असलेले शोध पर्यायदेखील वापरू शकता. विशिष्ट वर्गवारी मिळवण्यासाठी टॅप करा.

लाइव्ह व्ह्यू काम करत आहे का हे कसे जाणून घ्यावे

तुम्ही लाइव्ह व्ह्यू Maps AR वर टॅप करता तेव्हा, तुमच्या स्क्रीनवर मेसेज पॉप अप होतो. मेसेज तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा इमारती, रस्त्यावरील पाट्या किंवा Google Maps ला त्या भागातील मार्ग दृश्य डेटाच्या तुलनेत ओळखता येणार्‍या दृश्याच्या कोणत्याही घटकावर रोखण्यास सांगतो. तुम्ही कुठे आहात ते Google Maps ने ओळखल्यावर, ते तुमच्या फोनवर नेव्हिगेशनसंबंधी सूचना दाखवते.

लाइव्ह व्ह्यू तरीही काम करत नसल्यास

तुम्ही लाइव्ह व्ह्यू पुढील ठिकाणी वापरत आहात याची खात्री करा:

  • बऱ्यापैकी प्रकाशित असलेले भाग
  • खुली ठिकाणे
  • तुमच्या फोनचा कॅमेरा तुम्हाला इमारती आणि रस्त्यावरील पाट्यांवर रोखता येईल अशी ठिकाणे
  • मार्ग दृश्य उपलब्ध असलेली ठिकाणे

तुम्ही लाइव्ह व्ह्यू वापरत असताना तुमच्या सुरक्षिततेसाठी

तुमचा प्रवास सुरू करणे, एखाद्या वळणावर किंवा तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचणे यांसारख्या गोष्टींसाठी सर्वाधिक आवश्यकता असेल, तेव्हाच तुम्ही लाइव्ह व्ह्यू वापरावे अशी आम्ही शिफारस करतो.

महत्त्वाचे: तुम्हाला यापुढे दिशानिर्देशांची गरज नसल्यास तुमचा फोन खाली ठेवावा असे आम्ही सुचवतो.

फीडबॅक देणे

पादचारी नेव्हिगेशनसाठी लाइव्ह व्ह्यू वापरण्याबद्दलच्या तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगा.

  1. फीडबॅक Feedback Blue Icon वर टॅप करा.
  2. आलेल्या समस्येच्या प्रकाराबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर द्या.
  3. तुमचा फीडबॅक एंटर करा. 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2295385805481021254
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false